कोल्हूबाई माता गड

कोल्हार, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात कोल्हारजवळील गर्भगिरी पर्वतावर देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी माहुरच्या रेणुका देवीचे रूप मोहटादेवीची बहीण कोल्हूबाईचे स्थान आहे. सुमारे १५० वर्षांपासून असलेल्या या जागृत स्थानावर हजारो भाविकांची श्रद्धा असून हे ठिकाण कोल्हूबाई माता गड म्हणून प्रसिद्ध आहे. देवीच्या नावावरून गावाला कोल्हार हे नाव पडले आहे. हनुमान जयंतीच्या तिसऱ्या दिवसापासून भरणारी येथील दोन दिवसांची यात्रा प्रसिद्ध असून यावेळी निघणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात.

देवीची आख्यायिका अशी की शेकडो वर्षांपासून गर्भगिरी पर्वतावर एका झाडाच्या जाळीत कोल्हूबाई मातेचे वास्तव्य होते; परंतु त्याबाबत कोणाला कल्पना नव्हती. एकदा येथील धनिकाने गावात बहुमजली इमारत बांधली. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर देवीने त्याला दर्शन दिले. ‘मी कोल्हूबाई असून माझे या गावच्या डोंगरावर वास्तव्य आहे. या गावात कोणीही बहुमजली बांधकाम केलेले मला चालणार नाही,’ असे सांगून देवी गुप्त झाली. देवीने हा संदेश देताच ती इमारत तत्काळ रिकामी करण्यात आली पाहता पाहता ती इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. तेव्हापासून आजतागायत कोणीही या गावात दुमजली बांधकाम करीत नाही. ही वार्ता समजल्यावर गावकऱ्यांनी गर्भगिरी डोंगरात शोध घेतला असता एका झाडाखाली देवीची मूर्ती सापडली. तेव्हापासून हे स्थान कोल्हारचे ग्रामदैवत हजारो भाविकांचे श्रद्धास्थान बनले. त्यानंतर ग्रामस्थांनी या जागेवर मंदिर बांधून देवीची त्यात प्राणप्रतिष्ठा केली.

पाथर्डी तालुक्यातील कोल्हार गावात प्रवेश करताना स्वागताला देवीच्या नावाची सुंदर कमान लागते. येथून कोल्हूबाई गडाच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी गावातून रस्ता आहे. पूर्वी गडावर जाण्यासाठी डोंगरातून पायवाट होती. आता गडाच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत गाडीरस्ता बनविण्यात आला आहे. येथे मोठा सभामंडप बनविण्यात आला आहे. तेथून १०८ पायऱ्या चढून मंदिरापर्यंत जाता येते. या संपूर्ण पायरी मार्गाला भाविकांच्या सोयीसाठी शेड बसविण्यात आली आहेपायऱ्या चढून गडाच्या टोकावर प्रवेश होतो. तेथे सुरुवातीला सखूबाईचे मंदिर, त्यानंतर नव्याने बांधलेला प्रशस्त सभामंडप कोल्हूबाई मातेचे प्राचीन दगडी मंदिर आहे.

छोटेखानी असलेल्या या मंदिरात प्रवेशद्वारावर द्वारपाल रेखाटले असून संपूर्ण मंदिर हे सोनेरी रंगात रंगविले आहे. त्यामुळे खूप दूरवरूनही हे मंदिर नजरेस पडते. मंदिराच्या गाभाऱ्यात कोल्हूबाई मातेची शेंदुरचर्चित सुंदर मूर्ती असून तिच्या डोक्यावर सोनेरी मुकुट नाकात मोत्याची नथ असे अलंकार आहेत. तिने भरजरी वस्त्र परिधान केलेले आहेत. या देवी मूर्तीच्या मागे देवीचे वाहन असलेल्या सिंहाच्या दोन बाजूला दोन मूर्ती आहेत. या मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिराच्या समोर मोकळी जागा असून तेथून आजूबाजूच्या गावांचे विहंगम दृश्य दिसते. मंदिराशेजारी मोठी घंटा असून ती १०३ किलो वजनाची आहे. ती घंटा वाजविल्यावर परिसरातील ते किमी अंतरापर्यंत त्याचा आवाज जातो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मंदिराच्या समोर गाय वासरू यांची सुंदर शिल्पे आहेत.

कोल्हूबाई मातेच्या मंदिराजवळ असलेल्या सखूबाई मंदिराबाबत असे सांगितले जाते की सखूबाई नावाची सासुरवाशीण देवीची निस्सीम भक्त होती. देवीचे दर्शन घेण्यासाठी ती दररोज या गडावर येत असे; परंतु घरच्या मंडळींकडून तिला गडावर जाण्यास विरोध होत होता. सखूबाईच्या मनात देवीबद्दल अपार श्रद्धा होतीम्हणून ती रात्रीच्या वेळी सर्वजण झोपले आहेत याची खात्री करून गडावर देवीच्या दर्शनाला जात असे. काही दिवसांनी हा प्रकार घरच्यांना समजला त्यांनी तिचा पाठलाग केला. सखूबाई गडावर पोहचणार एवढ्यात तिच्या पतीने तिला हाक मारली. त्यावेळी सखूबाई घाबरली, आता सासरची मंडळी आणखी त्रास देतील म्हणून तिने गडावरून खाली उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला; परंतु तेवढ्यात कोल्हूबाई प्रकट झाली सखूबाईला साक्षात्कार देऊन त्याच ठिकाणी आपल्यात सामावून घेतले. सकाळी सर्वत्र सखूबाईचा शोध घेण्यात आला; परंतु ती कुठेच सापडली नाही. त्याचवेळी तेथे असणारी पुजारी महिला गंगूबाईने रात्री झालेला सर्व प्रकार ग्रामस्थांना सांगितला सखूबाईची भक्ती श्रेष्ठ असल्यामुळे देवीने तिला समाधी देऊन आपल्यात सामावून घेतल्याचे सांगितले. देवीने समाधी देताना सखूबाईला आश्वासन दिले की माझ्या दर्शनाआधी जे भाविक तुझे दर्शन घेतील मी त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करेन. ग्रामस्थांनी येथे सखूबाईचे मंदिर बांधले. तेव्हापासून येथे प्रथम सखूबाईचे दर्शन नंतर देवीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.

हनुमान जयंतीच्या तिसऱ्या दिवसापासून येथे दोन दिवस देवीचा जत्रोत्सव असतो. यामध्ये पहिल्या दिवशी होणाऱ्या पालखी सोहळ्याला पंचक्रोशीतील हजारो भाविक सहभागी होतात. या दिवशी येथे महाप्रसाद दिला जातो. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी येथे होणाऱ्या कुस्ती स्पर्धाही प्रसिद्ध आहेत. या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यासह पुणे, औरंगाबाद, नाशिक येथील मल्लही सहभागी होतात. या कुस्ती स्पर्धेने यात्रेची सांगता होते. दररोज सकाळी ते सायंकाळी पर्यंत भाविकांना मंदिरातील देवीचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • अहमदनगरपासून २७ किमी, तर पाथर्डीपासून ३८ किमी अंतरावर
  • अहमदनगर पाथर्डीपासून कोल्हार गावात येण्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने गडाच्या अर्ध्या वाटेपर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home