कानिफनाथ समाधी मंदिर 

मढी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी हे क्षेत्र नाथ संप्रदायात विशेष महत्त्वाचे मानले जाते. येथील गर्भगिरी पर्वताच्या दरीत असलेले वृद्धेश्वर मंदिर हे नाथ संप्रदायाचे आदिपीठ समजले जाते. मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथांनी सुवर्ण सिद्ध मंत्राचा वापर करत येथील गर्भगिरी डोंगर सोन्याचा केला होता. या गर्भगिरीच्या डोंगरावर वृध्देश्वर मंदिरापासून किमी अंतरावर असलेल्या सावरगाव येथे मच्छिंद्रनाथांची समाधी, तर तेथून जवळच मढी येथे कानिफनाथांचे समाधी मंदिर आहे. मढी येथील कानिफनाथ गड हे जागृत स्थान मानले जाते. या गडावर चैत्र कृष्ण पंचमी ते गुढीपाडवा या कालावधीत भरणारी यात्रा प्रसिद्ध आहे

ग्रंथांमधील उल्लेखांनुसार, श्रीकृष्णाच्या आदेशाने नारायणांनी नवनाथांच्या रूपाने पृथ्वीवर अवतार घेतले. यापैकी कानिफनाथांचा जन्म हिमालयात एका हत्तिणीच्या कानातून झाला. यावेळी सर्व देवांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून हत्तीच्या कानातून जन्म घेतला म्हणून त्यांचे नाव कानिफनाथ ठेवले. जालिंदरनाथांनी कानिफनाथांना आपले शिष्य बनवून मंत्र, तंत्र शस्त्रविद्या शिकविली. त्यानंतर दोघे गुरुशिष्य बद्रिकेला तप करण्यासाठी गेले. तेथे कानिफनाथांनी मनोभावे गुरुसेवा केली. यावेळी जालिंदरनाथ कानिफनाथांनी ४०,२०,००,००० (चाळीस कोटी वीस लाख) कविता करून महादेवांना ऐकविल्या. त्यावर महादेव प्रसन्न झाले नाथपंथ हा प्रबळ पंथ होईल, असा आशीर्वाद दिला. नाथपंथाचा प्रसार करून मानवजातीचा उद्धार करावा, असा महादेवांनी कानिफनाथांना आदेश दिला. त्यानुसार कानिफनाथांनी संपूर्ण भारतात फिरून नाथसंप्रदाय वाढविला. हे कार्य करीत ते हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील मढी या गावी फाल्गुन वद्य पंचमी (रंगपंचमी) या दिवशी संजीवनी समाधी घेतली. 

मंदिराची आख्यायिका अशी की राणी येसूबाई आणि युवराज शाहू महाराज (पहिले) मोघलांच्या वेढ्यामध्ये अडकले होतेत्यावेळी राणी येसूबाई यांनी कानिफनाथांना नवस केला की शाहू महाराजांची दिवसांत सुटका झाली, तर मी कानिफनाथ गडावर सभामंडप, नगारखाना बांधून देवाला पितळेचा घोडा अर्पण करीन. त्यांची ही हाक कानिफनाथांनी ऐकली आणि दिवसांत राणी येसूबाई युवराजांची सुखरूप सुटका झाली. त्यानंतर येसूबाईंनी या गडावर प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप आणि बारव यांची बांधकामे केली. समाधी मंदिरातील पितळी घोडा सदोदीत तेवणारा नंदादीप मराठे सरदार कान्होजी आंग्रे आणि त्यांचा मुलगा बापुराव आंग्रे यांनी अर्पण केलेले आहेत

कानिफनाथांचे मंदिर एका टेकडीवर असून ते किल्ल्याप्रमाणे भासते. येथे कानिफनाथांची संजीवन समाधी आहे. समाधी समोर कानिफनाथांची संगमरवरी मूर्ती असून बाजूला कान्होजी आंग्रे यांनी दिलेला पितळी घोडा आहे. सभामंडपाच्या एका बाजूला नाथांचे गादीघर आहे. असे सांगितले जाते की येथे नाथ विश्रांती करीत असत. मंदिर प्रांगणात श्रीविष्णू, मच्छिंद्रनाथ, गणपती विठ्ठलरुक्मिणी ही मंदिरे आहेत. या विठ्ठल मंदिराखाली कानिफनाथांचे ध्यानमंदिर असून तेथे जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. साधना मंदिरामध्ये शिवलिंग नंदी प्रतिष्ठापित आहे. या मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे सकाळची सूर्यकिरणे नाथांच्या समाधीवर, तर सायंकाळची किरणे ध्यानमंदिरातील शिवपिंडीवर पडतात

विठ्ठल मंदिराशेजारी नवनाथांचे मंदिर पारायण ठिकाण आहे. येथे असलेल्या भवानीमाता मंदिरासमोर एक डाळिंबाचे झाड आहे, त्यालाडाळीबाईनावाने संबोधतात. भाविक या झाडाला रंगीत धागा बांधून कानिफनाथांकडे नवस बोलतात. हा धागा बांधून मनातील इच्छा नाथांना सांगितल्यास त्या पूर्ण होतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. या मंदिराच्या कळसावर त्रिशूल आहे. उत्सवाच्या काळात या त्रिशूलाला भाविक मानाच्या काठ्या लावून कानिफनाथांचा जयघोष करतात

फ़ाल्गुन वद्य पंचमीला (रंगपंचमी) येथे कानिफनाथांची भव्य यात्रा भरते. १५ दिवस चालणाऱ्या या यात्रेच्या वेळी १० लाखांहून अधिक भाविक येथे दर्शनाला येतात, अशी नोंद आहे. भाविकांकडून यावेळी मंदिरावर रेवड्यांची उधळण केली जाते समाधीवर रेवडी आणि मलिद्याचा (चपाती, गूळ, तूप बडीशोप एकत्र केलेला) प्रसाद अर्पण केला जातो. नाथांच्या जयजयकाराने ढोलताशांच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून जातो. यात्रेच्या वेळी येथे भरणारा गाढवांचा बाजार प्रसिद्ध आहे. यात्रा कालावधीत अहमदनगर आणि पाथर्डी येथून मढीकरता प्रत्येक १५२० मिनिटांनी भाविकांसाठी एसटीची सुविधा असते. मंदिर ट्रस्टतर्फे येथे येणाऱ्या भाविकांसाठी अनेक सुविधा करण्यात आल्या आहेत.

उपयुक्त माहिती:

  • पाथर्डीपासून किमी, तर अहमदनगरपासून ४२ किमी अंतरावर
  • अहमदनगर जिल्ह्याच्या अनेक भागांतून मढी येथे एसटीची सुविधा
  • उत्सवकाळात पाथर्डी येथून प्रत्येक १५ मिनिटांनी एसटी
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जातात
  • मंदिर संस्थानतर्फे भक्तनिवास प्रसादाची व्यवस्था
Back To Home