
अहिल्यानगर शहरापासून काही अंतरावर आगडगाव नावाचे लहानसे गाव आहे. चैत्र पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारी येथील काळभैरवनाथांच्या मंदिरात मोठी जत्रा भरते. जागृत देवस्थान असल्यामुळे हजारो भाविक या दिवशी येथे दर्शनाला येतात; परंतु दूरवरून आलेले सर्व भाविक सायंकाळ झाली की त्वरेने आपापल्या घरी निघतात. गावातील मंडळीही गावाबाहेर असलेल्या मंदिर परिसरातून गावात परततात. दुसऱ्या दिवशी कोणीही भाविक या मंदिराकडे फिरकतही नाहीत, कारण त्या दिवशी येथे चक्क भुतांची जत्रा भरते. महाराष्ट्रातील हे एकमेव ठिकाण आहे, जेथे भुतांची जत्रा भरते, अशी मान्यता आहे.
आगडगाव येथील काळभैरवनाथांचे मंदिर प्राचीन असून या मंदिराच्या
बांधकामात मोठमोठ्या दगडांचा वापर झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक प्राचीन मंदिरांचे काम दगडांमध्ये झालेले आहे; परंतु बांधकामात अशा प्रकारचे मोठ्या आकाराचे दगड अभावानेच दिसतात. त्यामुळे हे मंदिर अफाट शक्ती असलेल्या राक्षसांनी वा भुतांनी बांधले असावे, असे मानले जाते. एका आख्यायिकेनुसार, आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांनी देवाच्या आज्ञेवरून एका रात्रीत या मंदिराचे बांधकाम केले आहे. मंदिर परिसरात आगडगाव, रतडगाव आणि देवगाव अशी तीन गावे शेजारी शेजारी आहेत. आणखी एक बाब म्हणजे या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांची मुंडकी कोरलेली आहेत. त्यावरूनही या मंदिराचे बांधकाम राक्षसांसारख्या अफाट शक्तींनी केलेले असावे, याला बळ मिळते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
चोहोबाजूंनी डोंगर आणि मधील दरीत काळभैरवनाथांचे मंदिर आहे. या परिसरात अनेक प्राचीन वृक्ष आहेत. चैत्र पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारी येथील जत्रा झाल्यावर सोमवारी येथे भुतांची जत्रा भरते, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी मंदिर परिसरात कोणी जाऊ नये, असा संकेत आहे. हा संकेत पाळण्यासाठी कोणावर सक्ती केली जात नसली तरी गावकरी अनेक पिढ्यांपासून हा संकेत पाळतात. भुतांची जत्रा म्हणजे नेमके काय, या उत्सुकतेपोटी अनेकदा
त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, विविध कारणांनी त्याला यश आले नाही.
आगडगावमधील भुतांची जत्रा नेमकी कधीपासून सुरू झाली याची माहिती उपलब्ध नसली तरी येथील वयोवृद्धांच्या म्हणण्याप्रमाणे, खूप वर्षांपूर्वी या गावातील गोपीनाथ कर्पे हे यात्रेच्या दिवशी काळभैरवनाथ मंदिरातील दीपमाळेजवळ तेलाची घागर विसरले. दुसऱ्या दिवशी रात्री आठवण झाल्यानंतर ते घागर आणण्यासाठी मंदिराजवळ गेले. तेव्हा त्यांना तेथे विचित्र आकृत्या नाचताना दिसल्या. त्यांनी ही माहिती त्यावेळी गावकऱ्यांना दिली होती. त्यांच्या पिढीतील अनेक जण या माहितीला दुजोरा देतात.
भुतांच्या यात्रेची आख्यायिका असली तरी हे स्थान जागृत तीर्थक्षेत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेमुळे पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथे दर रविवारी भाविकांची मोठी गर्दी होते. आलेल्या भाविकांना येथे दुपारी १२.१५ ते ३ वाजेपर्यंत आमटी–भाकरी दिली जाते. भुतांच्या यात्रेसोबतच हे मंदिर आमटी–भाकरीच्या महाप्रसादासाठीही प्रसिद्ध आहे.
येथे देण्यात येणाऱ्या महाप्रसादासाठी देणगी देणाऱ्या भाविकांसाठी प्रतीक्षा यादी आहे. महाप्रसादासाठी कोणा भाविकाला नव्याने देणगी द्यायची असेल तर त्यासाठीही त्याला अनेक महिन्यांची प्रतीक्षा करावी लागते.
खोलगट भागात असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करण्यासाठी काही पायऱ्या उतरून जावे लागते. मंदिराचा परिसर प्रशस्त असून त्यात भाविकांसाठी दुमजली अन्न छत्रालय, भक्त निवास, दर्शन रांगेची सुविधा व मंदिर कार्यालय आहे. मंदिर परिसरात फरसबंदी असून मुख्य मंदिराची रचना दर्शन मंडप, सभामंडप व गर्भगृह अशी आहे. दर रविवारी हजारो भाविकांची येथे गर्दी असल्यामुळे अनेक भाविक येथील दर्शन मंडपातून काळभैरवनाथांचे मुखदर्शन करतात. दर्शन मंडपाजवळ दीपमाळ आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस तीन मुंडकी कोरलेली आहेत. ती आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांची असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या काळ्या दगडातील प्राचीन अर्धमूर्ती आहेत.
मंदिराच्या शेजारी जुने कडुनिंबाचे झाड आहे. याचे वैशिष्ट्य असे की त्या झाडाची पाने गोड लागतात. त्याला बहर येतो, पण लिंबोळ्या लागत नाहीत. त्यामुळे कित्येक वर्षांपासून त्या वृक्षापासून एकही दुसरे रोपटे तयार झालेले नाही. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला या झाडाच्या पानांनी झाकून ठेवले असता त्याचे विष उतरते, अशी येथे श्रद्धा आहे.
या मंदिराचे बांधकाम केव्हा झाले हे निश्चित सांगता येत नसले तरी देवस्थानाजवळ असलेल्या २४ समाध्यांवरून २४ पिढ्यांपेक्षा जुना इतिहास याला असल्याचे मानले जाते. दररोज सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत या मंदिरातील काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेचे दर्शन घेता येते.

अहिल्यानगर शहर से कुछ दूर आगड़गाँव नाम का एक छोटा सा गाँव है। चैत्र पूर्णिमा के बाद आने वाले रविवार को यहाँ कालभैरवनाथ मंदिर में बड़ा मेला लगता है। चूँकि यह एक जागृत मंदिर है, इसलिए इस दिन हज़ारों की संख्या में श्रद्धालु दर्शन के लिए यहाँ आते हैं; लेकिन दूर-दूर से आए सभी श्रद्धालु शाम होते ही अपने-अपने घरों को चले जाते हैं। गाँव के लोग भी मंदिर क्षेत्र से गाँव लौट जाते हैं। अगले दिन कोई भी श्रद्धालु इस मंदिर में नहीं जाता, क्योंकि उस दिन यहाँ पिशाचों का मेला लगता है। ऐसा माना जाता है कि यह महाराष्ट्र का एकमात्र ऐसा स्थान है, जहाँ पिशाचों का मेला लगता है।
आगड़गाँव स्थित कालभैरवनाथ मंदिर प्राचीन है और इस मंदिर के निर्माण में विशाल पत्थरों का इस्तेमाल किया गया है। महाराष्ट्र में कई प्राचीन मंदिरों का निर्माण पत्थरों से किया गया है।
लेकिन निर्माण में इतने बड़े पत्थर बहुत कम देखने को मिलते हैं। इसलिए माना जाता है कि इस मंदिर का निर्माण अथाह शक्ति वाले राक्षसों या पिशाचों ने किया होगा।
एक जनश्रुति के अनुसार भगवान के आदेश पर राक्षस आगड़मल, रतड़मल और देवमल ने एक ही रात में इस मंदिर का निर्माण किया था। मंदिर क्षेत्र में आगड़गाँव, रतड़गाँव और देवगाँव नाम के तीन गाँव पास-पास स्थित हैं। एक और बात यह है कि इस प्रवेश द्वार पर तीन राक्षसों के सिर खुदे हुए हैं। ग्रामीणों का कहना है कि इस मंदिर का निर्माण राक्षसों जैसी अपार शक्तियों ने किया होगा, जो इसे मजबूती प्रदान करते हैं। चारों तरफ पहाड़ों और बीच में घाटी में कालभैरवनाथ का मंदिर है। इस क्षेत्र में कई प्राचीन वृक्ष हैं।
ग्रामीणों का मानना है कि चैत्र पूर्णिमा के बाद रविवार को यहाँ मेला होता है और सोमवार को यहाँ पिशाचों का मेला लगता है। इसलिए यहाँ एक संकेत है कि इस दिन किसी को भी मंदिर क्षेत्र में नहीं जाना चाहिए। हालाँकि इस संकेत का पालन करने के लिए किसी पर दबाव नहीं डाला जाता है,
लेकिन ग्रामीण कई पीढ़ियों से इस संकेत का पालन करते आ रहे हैं। जिज्ञासावश आखिर पिशाचों का मेला क्या होता है, इसके बारे में जानने के कई प्रयास किए गए। हालाँकि विभिन्न कारणों से उन्हें सफलता नहीं मिली। हालाँकि आगड़गाँव में पिशाच मेला कब से प्रारंभ हुआ, इसके बारे में कोई जानकारी नहीं है। लेकिन यहाँ के बुजुर्गों के अनुसार कई साल पहले इस गाँव के गोपीनाथ करपे मेले के दिन कालभैरवनाथ मंदिर में दीपस्तंभ के पास तेल का घड़ा भूल गए थे। अगली रात याद आने पर वे घड़ा लाने मंदिर गए। तभी उन्होंने वहाँ अजीबोगरीब आकृतियाँ नाचती देखीं। उन्होंने यह जानकारी उसी समय गाँव वालों को दी थी। उनकी पीढ़ी के कई लोग इस जानकारी की पुष्टि करते हैं।
भले ही पिशाच मेले की जनश्रुति है, लेकिन यह स्थान जागृत तीर्थक्षेत्र और अनूठी भौगोलिक संरचना के कारण पर्यटन स्थल के रूप में भी प्रसिद्ध है। यहाँ हर रविवार को श्रद्धालुओं की भारी भीड़ होती है। यहाँ आने वाले श्रद्धालुओं को दोपहर 12:15 बजे से 3 बजे तक दाल-ज्वार की रोटी का प्रसाद दिया जाता है।
पिशाच मेले के साथ-साथ यह मंदिर दाल-रोटी के महाप्रसाद के लिए भी प्रसिद्ध है। यहाँ पर परोसे जाने वाले महाप्रसाद के लिए दान देने वाले श्रद्धालुओं की प्रतीक्षा सूची रहती है। यदि कोई श्रद्धालु महाप्रसाद के लिए नई राशि दान करना चाहता है, तो उसके लिए भी उसे कई महीनों तक इंतज़ार करना पड़ता है।
सुदूर क्षेत्र में स्थित इस मंदिर के परिसर में प्रवेश करने के लिए कुछ सीढ़ियाँ उतरनी पड़ती हैं। मंदिर परिसर विशाल है और इसमें दो मंजिला भोजन मंडप, भक्तनिवास, दर्शन कतार सुविधा और मंदिर कार्यालय है। मंदिर परिसर पक्का है और मुख्य मंदिर दर्शन मंडप, सभामंडप और गर्भगृह के रूप में संरचित है। चूँकि हर रविवार को यहाँ हज़ारों श्रद्धालु आते हैं इसलिए कई श्रद्धालु यहाँ के दर्शन मंडप से कालभैरवनाथ का मुख देखते हैं।
दर्शन मंडप के पास एक दीपस्तंभ है। मंदिर के प्रवेश द्वार के ऊपर तीन सिर खुदे हुए हैं। कहा जाता है कि वे राक्षस अगड़मल, रतड़मल और देवमल के हैं। मंदिर के प्रांगण में काले पाषाण से बने कालभैरवनाथ और जोगेश्वरी माता के प्राचीन अर्ध-भित्तिचित्र हैं।
मंदिर के बगल में एक पुराना नीम का पेड़ है। इसकी विशेषता यह है कि पेड़ की पत्तियों का स्वाद मीठा होता है। यह खिलता है लेकिन फल नहीं देता। इसलिए कई सालों से उस पेड़ से कोई दूसरा पौधा नहीं निकला है। ऐसा माना जाता है कि अगर किसी व्यक्ति को नाग ने काट लिया हो, तो उसे इस पेड़ की पत्तियों से ढक दिया जाए, तो उसका विष उतर जाता है।
हालाँकि यह ठीक से पता नहीं है कि इस मंदिर का निर्माण कब हुआ था, लेकिन माना जाता है कि मंदिर के पास उपस्थित 24 समाधियों से इसका इतिहास 24 पीढ़ियों से भी पुराना है। आप इस मंदिर में हर दिन सुबह 6 बजे से रात 9 बजे तक कालभैरवनाथ और जोगेश्वरी माता के दर्शन कर सकते हैं।