घोडेश्वरी देवी

घोडेगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या तालुक्यामध्ये देशविदेशात प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र शनिशिंगणापूर, राज्यातील एकमेव मोहिनीराज मंदिर, लाखो दत्तभक्तांचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र देवगड, ज्ञानेश्वरी लिहिली गेली ते ठिकाण पैस खांब, वृद्धेश्वर मंदिर अशी अनेक तीर्थस्थाने आहेत. याच पंक्तीत येथील घोडेगाव गावातील घोडेश्वरी मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे ही देवी अश्वरुपी म्हणजेच घोड्याच्या आकाराची आहे. या देवीची राज्यात वा देशात कुठेच प्रतिकृती नाही, असा येथील ग्रामस्थांचा दावा आहे.

मंदिराची आख्यायिका अशी की नेवासे तालुक्यातील सध्याच्या घोडेगावाचे पूर्वीचे नाव वडगाव होते; परंतु ते निपाणी वडगाव म्हणून प्रसिद्ध होते. त्याला कारणही तसेच होते, ते म्हणजे येथे भेडसावणारी सततची पाणीटंचाई. साधारणतः १२ व्या शतकात गावकऱ्यांनी निर्णय घेऊन गावात विहीर खोदण्याचे ठरविले. एका मुहूर्तावर काम सुरू करून ग्रामस्थांनी १० परस विहीर खणली. (परस हे खोली मोजण्याचे एक परिमाण आहे. या शब्दाची व्युत्पत्तीपुरुषया शब्दापासून झाली आहे. साधारणतः विहिरीची खोली, पाण्याचे कुंड वा जमिनीची खोली मोजण्यासाठी परस हे परिमाण वापरले जातेत्यामुळे परस म्हणजे फूट असे मानले जाते; परंतु काही ठिकाणी हेच माप ते . फुटांपर्यंत गृहीत धरले जाते) इतके खोदकाम करून एक थेंबही पाणी लागत नसल्याने ग्रामस्थ निराश झाले त्यांनी विहिरीचा नाद सोडून दिला. पाणीटंचाईमुळे अनेक लोकांनी गावातून स्थलांतर केले.

या घटनेनंतर गावातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरात एक तेजस्वी साधू आले. ते या मंदिरात तासनतास तप करीत असत. ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी वेळोवेळी ते मदतही करीत असत. एकेदिवशी ग्रामस्थांनी या साधूंसमोर आपली पाणीटंचाईची कैफियत मांडली. त्यावर साधूंनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या बाजूला एक जागा दाखवून तेथे विहीर खणण्याबाबत ग्रामस्थांना सांगितले. साधूंनी सांगितल्याप्रमाणे तुळजाभवानीची पूजा करून ग्रामस्थांनी विहिरीचे काम सुरू केले. परस खाली खणूनही पाणी लागण्याची चिन्हे दिसत नव्हती. तरीही ग्रामस्थांचा त्या साधूंच्या बोलण्यावर विश्वास होता. त्यांनी जोमाने आपले काम सुरू ठेवलेविहिरीची खोली परसांवर आली असताना अचानक जमिनीत त्यांना एक अश्वरूपी म्हणजे घोड्याचा आकार असलेली दगडी मूर्ती दिसली. ग्रामस्थांनी ती मूर्ती मातीतून काढून तुळजाभवानी मंदिराच्या प्रांगणात ठेवली सायंकाळ झाली म्हणून काम थांबवून ते आपापल्या घरी परतले. तरी प्रत्येकाच्या मनात मात्र या मूर्तीचेच विचार घोळत होते.

त्याच रात्री गावच्या पाटलाला देवीने स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले, ‘मी घोडेश्वरी देवी आहे, माझी प्राणप्रतिष्ठा तुळजाभवानी मातेच्या मंदिरात करा. यापुढे गावाला कधीच पाणी कमी पडणार नाही या गावाची कीर्ती सर्वदूर पसरेल.’ दुसऱ्या दिवशी पाटलांनी हा दृष्टांत ग्रामस्थांना सांगितला. ग्रामस्थांनी शुभमुहूर्त पाहून अश्वरुपी देवी मूर्तीची तुळजाभवानी मंदिरात प्राणप्रतिष्ठापना केली. त्या दिवशी ग्रामस्थांनी पुन्हा त्या साधूंकडे पाण्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी ग्रामस्थांना आणखी एक परस खाली खणण्यास सांगितले. त्याप्रमाणे खणण्याचे काम सुरू असतानाच अचानक पाण्याचा मोठा फवारा जमिनीतून वर आला आणि पाहता पाहता विहीर पाण्याने भरून गेली.

विहिरीतून प्रकट झालेल्या घोडेश्वरी मातेच्या कृपेने गावातील पाणीटंचाई संपली म्हणून गावाचे निपाणी वडगाव हे नाव जाऊन देवीच्या नावावरूनघोडेगावअसे रूढ झाले. या पाण्यामुळे हा परिसर सुजलाम सुफलाम बनला. एवढेच नव्हे तर शेतमालाची मोठी बाजारपेठ म्हणूनही आता घोडेगाव प्रसिद्ध आहे. अहमदनगरऔरंगाबाद मार्गावर असलेल्या घोडेगाव येथील घोडेश्वरी देवीचे मूळ मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीचे होते. त्याचे बांधकाम कधी झाले याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी स्ववर्गणीतून सुमारे कोटी रुपये खर्चून या मंदिराचे नूतनीकरण केल्यानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे.

घोडेश्वरी मंदिराचा परिसर प्रशस्त असून या संपूर्ण परिसराला फरसबंदी आहे. प्रवेशद्वारातून आत येताच प्राचीन दीपमाळ नजरेस पडतेया दीपमाळेला खालच्या बाजूने दरवाजा असून त्यातून पायरी मार्गाने दीपमाळेच्या वरच्या टोकावर जाता येते. दीपमाळेच्या शेजारी शंकराचे मंदिर आहे.

घोडेश्वरी मंदिराचे स्वरूप हे दर्शन मंडप, सभामंडप गर्भगृह असे आहे. दर्शन मंडपाच्या वरील भागात महिषासुरमर्दिनीची भलीमोठी मूर्ती आहे. मंदिराच्या समोर धनुष्यधारी राम गदाधारी हनुमंत यांच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या भिंतीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे आहेत. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संस्कृतीची ओळख करून देणारी अनेक शिल्पे आहेत. त्यात गणपती, शेषशाही श्रीविष्णू, नृत्य करताना शिवपार्वती, राधाकृष्ण, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनार्दन स्वामी (मौनगिरी), भगवानबाबा यांच्या मूर्तींचा समावेश आहे. या सर्व शिल्पांना सुंदर रंगकाम केल्यामुळे मंदिराचे सौंदर्य खुलून दिसते. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून तेथे आधुनिक फरशीचा वापर केल्याने ते सुंदर भासते. गाभाऱ्यात दोन तांदळास्वरूप देवी असून त्यातील एक रेणुकामाता दुसरी घोडेश्वरी माता आहे.

चैत्र कृष्ण पंचमीला येथे देवीची यात्रा असते ती पाच दिवस चालते. यात्रेच्या आदल्या दिवशी कावडीने गोदावरी नदीचे पाणी आणण्यासाठी येथील ग्रामस्थ जातात. रात्रभर अनवाणी पायांनी चालून पहाटेच्या वेळी या कावड गावात पोचतात. गोदावरीच्या पाण्याने स्नान घालून घोडेश्वरी देवीची विधिवत पूजा केली जाते त्यानंतर यात्रोत्सवाला सुरुवात होते. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत देवीच्या पालखीची मिरवणूक, भजन, कीर्तनासारखे कार्यक्रम कुस्त्यांचा हंगामा (स्पर्धा) भरविला जातो. याशिवाय प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला येथे देवीचा अभिषेक केला जातो. अश्विन शुक्ल प्रतिपदा ते कोजागिरी पौर्णिमा असा १५ दिवसांचा शारदीय नवरात्रोत्सव साजरा होतो. या गावाचे वेगळेपण असे की देवी मंदिराच्या कळसाच्या उंचीपेक्षा जास्त उंचीचे (दुमजली) बांधकाम गावात केले जात नाही. याशिवाय कोणत्याच कार्यात घोड्यांचा वापर होत नाही.

उपयुक्त माहिती:

  • शनिशिंगणापूरपासून किमी, तर नेवासेपासून २६ किमी अंतरावर
  • शनिशिंगणापूर नेवासेपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home