मंगळाचा गणपती

गणेशखिंड, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर शहरापासून जवळ गणेशखिंड येथे गणपतीचे एक आगळेवेगळे स्थान आहे. हे स्थानमंगळाचा गणपतीम्हणून प्रसिद्ध आहे. ज्या व्यक्तीला मंगळ दोष आहे, त्या व्यक्तीने या गणपतीला अभिषेक केल्यास त्याचा ग्रहदोष नाहीसा होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. राज्यात या नावाचे हे एकमेव स्थान असल्याचे सांगितले जाते. या स्थानाला धार्मिकतेसोबतच ऐतिहासिक किनारही आहे. थोर समाजसुधारक क्रांतिकारक सेनापती बापट यांनी इंग्रजांना हुलकावणी देण्यासाठी या मंदिरात अनेक दिवस वास्तव्य केले होते, अशी नोंद आहे.

मंदिराची आख्यायिका अशी की भारद्वाज नावाचे वेदशास्त्रसंपन्न ऋषी स्नानासाठी नदीवर गेले असता तेथे जलक्रीडा करणारी अप्सरा त्यांना दिसली. तिचे सौंदर्य पाहून त्यांचे मन मोहित झाले. ऋषींकडून पापकर्म घडू नये, यासाठी त्यांचे तेज पृथ्वीने आपल्या उदरात गर्भरूपाने धारण केले. योग्य वाढ झाल्यानंतर पृथ्वीच्या उदरातून ते बाळ प्रकट झाले. पृथ्वीच्या उदरातून प्रकट झाला म्हणून त्याचे नावभूमिपुत्रअसे पडले. या रक्तवर्णीय गोंडस पुत्राचा पृथ्वीने वर्षे सांभाळ केला. नंतर तिने त्याला त्याची जन्मकथा सांगून पिता भारद्वाज ऋषींकडे नेले. ऋषींनीही त्याचा स्वीकार केला. त्याच्यावर योग्य संस्कार करूनगणाना त्वाया गणेश मंत्राची दीक्षा देऊन त्याचे अनुष्ठान करण्यास सांगितले.

पित्याच्या उपदेशाप्रमाणे भूमिपुत्राने एका वनात राहून गणपतीची आराधना केली. १००० वर्षांच्या तपश्चर्येनंतर गणपती त्याच्यासमोर प्रकट झाले त्यास वर मागण्यास सांगितले. ‘तुमच्या भक्तीत मला अढळपद लाभावे. चतुर्थीच्या दिवशी आपण दर्शन दिलेत म्हणून ही तिथी महापुण्यप्रद व्हावी. मला अमृतपान घडावे माझ्या नावाची कीर्ती त्रिभुवनात व्हावीअसा भूमिपुत्राने वर मागितल्यावर गणपतीने ‘‘तथास्तु भक्ता, यापुढे तुलामंगळनावाने ओळखले जाईल. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीचे अधिक महत्त्व असेल. ही चतुर्थी मंगल, सुखकर, धन, आनंद इच्छिलेले सर्व काही देणारी होईल. तुझा वर्ण अग्नीप्रमाणे तेजस्वी असल्यामुळे तुलाअंगारक या चतुर्थीलाअंगारकी चतुर्थीम्हणतील. अंगारकी चतुर्थीचा उपवास केल्यास १२ चतुर्थींचे पुण्य लाभेल’’, असे अनेक आशीर्वाद देऊन गणपती तेथून अंतर्धान पावले. हा भूमिपुत्र मंगळ म्हणजेच नवग्रहामधील मंगळ ग्रह होय.

असे सांगितले जाते की या भुमिपुत्र मंगळाने गणेशाचे मंदिर बांधले, तेच हे गणेशखिंडीतीलमंगळाचे मंदिरम्हणून प्रसिद्ध आहे. राशीत मंगळ असणाऱ्या व्यक्तींनी येथील गणपतीची विधिवत पूजा करून मूर्तीला अभिषेक केल्यास त्यांचा मंगळ दोष निघून जातो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

पारनेरआळकुटी रस्त्यावर चिंचोली घाट सुरू होण्यापूर्वी गणेशखिंडीकडे जाणारा मार्ग आहे. तेथून जवळच असणारे मंगळाचा गणपती हे मंदिर शांत

निसर्गरम्य परिसरात डोंगराच्या कपारीत वसले आहे. मंदिराच्या कमानीवजा प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर काही पायऱ्या उतरून मंदिर परिसरात प्रवेश होतो. मोठमोठ्या वृक्षांच्या छायेत असणारे हे प्राचीन मंदिर संपूर्ण दगडी हेमाडपंती शैलीचे आहे. सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात भलामोठा नंदी असून गाभाऱ्यात शेंदूरचर्चित गणेशाची अर्धमूर्ती आहे. या मूर्तीतील गणेशाचे कान सोंड भव्य आहे. मंदिराच्या प्रांगणात एक विहीर भुयारी मार्ग आहे. दर मंगळवारी संकष्टी चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी असते. अंगारकी चतुर्थीला मोठा उत्सव होतोत्यावेळी हजारो भाविक गणेशखिंडीतील या मंदिरात दर्शनाला येतात.

पांडुरंग महादेव बापट ऊर्फ तात्या ऊर्फ सेनापती बापट यांचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथे झाला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे १९७७ मध्ये प्रसिद्ध झालेल्यासेनापती बापट : वाड्‌मय समग्र ग्रंथामधील उल्लेखानुसार सेनापती बापट यांचे वडील महादेव आई गंगाबाई बापट हे दाम्पत्य गणेशखिंडीतील या गणपतीचे निस्सीम भक्त. ते या मंदिरात गणपतीची सेवा करीत असत. १९०३ साली तात्यांना मुंबई विद्यापीठाच्या बी. . परीक्षेत शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले; परंतु ब्रिटिशांविरोधात केलेल्या एका भाषणामुळे त्यांची शिष्यवृत्ती रद्द करण्यात आली. त्यामुळे त्यांना भारतात परतावे लागले. तोपर्यंत परदेशातील वास्तव्य काळात त्यांनी बॉम्ब बनविण्याची कला अवगत केली होती. तेव्हापासून इंग्रजांची त्यांच्यावर नजर होती. अनेकदा त्यांना इंग्रजांकडून अटकही झाली; परंतु पुरेशा पुराव्यांअभावी त्यांची सुटका होत होती

असे सांगितले जाते की मंगळाचा गणपती मंदिरापासून सेनापती बापटांच्या पारनेर शहरातील घरापर्यंत भुयारी मार्ग आहे. या भुयारामध्ये अनेक लहानमोठ्या खोल्या आहेत. इंग्रजांचा ससेमिरा चुकविण्यासाठी अनेकदा सेनापती बापट गणेशखिंडीतील या गणपती मंदिरात वा येथील भुयारात आश्रय घेत असत. त्या खोल्यांमध्ये सेनापती बापट त्यांच्या सहकाऱ्यांकडून बॉम्ब दारूगोळा बनविण्याचे काम होत असे. या भुयारी मार्गाची सध्या पडझड झाली असली तरी मंदिरापासून काही अंतरापर्यंत भुयारात जाऊन तेथील खोल्या पाहता येतात.

उपयुक्त माहिती:

  • पारनेरपासून किमी, तर अहिल्यानगरपासून ४० किमी अंतरावर
  • पारनेरपासून पुणेवाडीपर्यंत एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही

मंगल का गणपति

गणेशखिंड, तह. पारनेर, जि. अहिल्यानगर

अहिल्यानगर जिले के पारनेर शहर के निकट स्थित गणेशखिंड में गणपति का एक अनोखा स्थान है। यह ‘मंगल का गणपति’ के नाम से प्रसिद्ध है। जिन व्यक्तियों की कुंडली में मंगल दोष होता है, वे यदि यहाँ भगवान गणपति का विधिपूर्वक अभिषेक करें, तो उनका ग्रहदोष शांत हो जाता है। ऐसी श्रद्धालुओं की मान्यता है। यह बताया जाता है कि संपूर्ण राज्य में इस नाम का यह एकमात्र देवस्थान है। इस स्थान का धार्मिक महत्व तो है ही, साथ ही इसका ऐतिहासिक संदर्भ भी उल्लेखनीय है। प्रसिद्ध क्रांतिकारी सेनापति बापट ने अंग्रेजों से छिपने के लिए इस मंदिर में कई दिन निवास किया था। इस बात का ऐतिहासिक उल्लेख भी मिलता है।

इस मंदिर से जुड़ी एक कथा है कि भारद्वाज नामक एक वेदज्ञ ऋषि एक बार नदी में स्नान हेतु गए। वहाँ उन्हें जलक्रीड़ा करती एक अप्सरा दिखाई दी। उसके सौंदर्य से मोहित होकर उनके मन में विकार उत्पन्न हुआ। उनके द्वारा कोई पापकर्म न हो, इसलिए पृथ्वी ने उनके तेज को अपने गर्भ में समाहित कर लिया। उचित समय पर उस तेज से एक मनोहर बालक जन्मा। चूँकि वह पृथ्वी के गर्भ से जन्मा था, इसलिए उसका नाम ‘भूमिपुत्र’ पड़ा। यह मनोहर, रक्तवर्णीय बालक पृथ्वी ने सात वर्षों तक पाला। फिर वह उसे उसकी जन्मकथा बताकर उसके पिता भारद्वाज ऋषि के पास ले गई। ऋषि ने उसे अपनाया और उसका उचित शिक्षण-संस्कार किया। उन्होंने उसे ‘गणाना त्वा’ इस गणेश मंत्र की दीक्षा देकर तपस्या करने को कहा।

पिता के उपदेश के अनुसार भूमिपुत्र वन में रहकर भगवान गणेश की आराधना में लीन हो गया। एक हजार वर्षों की तपस्या के उपरांत गणपति उसके सामने प्रकट हुए और उसे वर माँगने को कहा। तब भूमिपुत्र ने प्रार्थना की, “आपकी भक्ति में मुझे अडिग स्थान प्राप्त हो। चतुर्थी के दिन आपने मुझे दर्शन दिए, इसलिए यह तिथि पुण्यदायिनी बने। मुझे अमृतपान प्राप्त हो और मेरा नाम तीनों लोकों में प्रसिद्ध हो।” इस पर गणपति ने प्रसन्न होकर कहा, “तथास्तु! भक्त, अब से तुम ‘मंगल’ के नाम से जाने जाओगे। मंगलवार की चतुर्थी विशेष पुण्यदायी होगी। यह चतुर्थी मंगलमय, सुखदायी, धन-समृद्धि और इच्छित फल प्रदान करनेवाली होगी। तुम्हारा तेज अग्नि के समान है, इसलिए तुम्हें ‘अंगारक’ कहा जाएगा। इस चतुर्थी को ‘अंगारकी चतुर्थी’ के रूप में जाना जाएगा। अंगारकी चतुर्थी का व्रत करने पर 12 चतुर्थियों के बराबर पुण्य मिलेगा।” ऐसा कहकर गणपति अंतर्धान हो गए। यही भूमिपुत्र मंगल नवग्रहों में से एक ‘मंगल ग्रह’ है।

कहा जाता है कि इस भूमिपुत्र मंगल ने ही गणपति का यह मंदिर बनवाया था। यह आज ‘मंगल का गणपति’ मंदिर (गणेशखिंड) के रूप में प्रसिद्ध है। जिनकी कुंडली में मंगल दोष होता है, वे श्रद्धापूर्वक यहाँ गणेश मूर्ति का अभिषेक करते हैं। इससे उनका दोष दूर होता है, ऐसा श्रद्धालुओं का दृढ़ विश्वास है।

पारनेर से आलकुटी मार्ग पर चिंचोली घाट आरंभ होने से पहले गणेशखिंड की ओर जाने वाला रास्ता है। पास ही स्थित मंगल का गणपति मंदिर एक शांत, हरियाली से भरे और पर्वतीय परिसर में स्थित है। मंदिर के कमानीदार प्रवेशद्वार से भीतर जाने के बाद कुछ सीढ़ियाँ उतरने पर मंदिर का परिसर आता है। विशाल वृक्षों की छाया में स्थित यह प्राचीन मंदिर पूर्णतः पत्थर का बना हुआ है।

यह हेमाडपंती स्थापत्य शैली का उदाहरण है। मंदिर में सभामंडप और गर्भगृह हैं। सभामंडप में विशाल नंदी विराजमान है। गर्भगृह में सिंदूरलेपित गणपति की पाषाण निर्मित अर्धमूर्ति है। इसमें भगवान के विशाल कान और सूंड विशेष रूप से ध्यान आकर्षित करते हैं। मंदिर परिसर में एक प्राचीन कुआँ और एक भूमिगत गुफा है। प्रत्येक मंगलवार और संकष्टी चतुर्थी पर यहाँ श्रद्धालुओं की भीड़ रहती है। विशेषकर अंगारकी चतुर्थी पर यहाँ विशाल उत्सव होता है और हज़ारों श्रद्धालु दर्शन के लिए गणेशखिंड पहुँचते हैं।

पंडुरंग महादेव बापट उर्फ़ तात्या उर्फ़ सेनापति बापट का जन्म पारनेर (अहिल्यानगर जिला) में हुआ था। महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडल द्वारा 1977 में प्रकाशित ‘सेनापति बापट : वाङ्मय समग्र ग्रंथ’ के अनुसार, उनके माता-पिता महादेव और गंगाबाई बापट गणेशखिंड के गणपति के परम भक्त थे और इस मंदिर में नियमित सेवा करते थे। 1903 में सेनापति बापट को मुंबई विश्वविद्यालय की बी.ए. परीक्षा में छात्रवृत्ति प्राप्त हुई और वे आगे की पढ़ाई हेतु इंग्लैंड गए। परंतु वहाँ ब्रिटिश-विरोधी भाषण देने के कारण उनकी छात्रवृत्ति रद्द कर दी गई और उन्हें भारत लौटना पड़ा। विदेश में उन्होंने बम निर्माण की विधियाँ सीखी थीं और इसी कारण वे ब्रिटिश सरकार की दृष्टि में आ गए। कई बार उन्हें गिरफ्तार किया गया, परंतु पर्याप्त साक्ष्य न होने के कारण उन्हें छोड़ दिया गया।

ऐसा कहा जाता है कि गणेशखिंड स्थित मंदिर से सेनापति बापट के पारनेर स्थित घर तक भूमिगत गुफा है। इस गुफा में कई छोटी-बड़ी कोठरियाँ हैं। अंग्रेजों से बचने के लिए कई बार सेनापति बापट ने गणेशखिंड के इसी गणपति मंदिर या गुफा में शरण ली। इन्हीं कोठरियों में वे और उनके सहयोगी बम और बारूद बनाने का कार्य करते थे। यह गुफा अब क्षतिग्रस्त हो चुकी है। आज भी मंदिर से कुछ दूरी तक इस गुफा में जाकर वहाँ की कोठरियाँ देखी जा सकती हैं।

मुख्य विशेषताएँ:

  • पारनेर से 8 किमी, अहिल्यानगर से 40 किमी दूरी
  • पारनेर से पुणेवाड़ी तक राज्य परिवहन बस सेवा उपलब्ध
  • निजी वाहन सीधे मंदिर परिसर तक जा सकते हैं
  • क्षेत्र में कोई विश्राम या जलपान की सुविधा नहीं है
Back To Home