दत्त मंदिर

सावेडी, ता. अहमदनगर, जि. अहमदनगर

महाराष्ट्रातील धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे स्थान विशेष आहे. या जिल्ह्यासह अहमदनगर शहरात अनेक लहानमोठी प्राचीन प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यापैकी स्थापत्यकलेच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले नवीन रचनेचे सावेडी येथील भव्य दत्त मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. शहराच्या मध्यभागी असलेले हे मंदिर अलीकडच्या काळातील असले तरी त्याचे सौंदर्य भारावून टाकणारे आहे. राज्यातील दत्त मंदिरांमध्ये हे सर्वात भव्य मंदिर असल्याचे सांगितले जाते.

अहमदनगरमधील महत्त्वाच्या १० पर्यटन धार्मिक स्थळांमध्ये सावेडी येथील या दत्त मंदिराचा समावेश आहे. मंदिराची विशेष बाब म्हणजे या मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानमधील भरतपूर तालुक्यातील बन्सी पहाडपूर येथील गुलाबी रंगाच्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. या दगडांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे आयुष्य हे १००० वर्षांहून जास्त मानले जाते. अतिशय महागडे दुर्मिळ होत चाललेले हे दगड दिसायला सुंदर असतात, याशिवाय यावर पाणी अथवा पाऊस पडला की ते खुलून दिसतात. (फार पूर्वीपासून आपल्या देशातील अनेक ऐतिहासिक इमारती बन्सी पहाडपूर येथील दगडांनी बांधल्या गेल्या आहेत. त्यामध्ये दिल्लीतील लाल किल्ला कुतुबमिनार यांचा समावेश आहे. अयोध्येमधील नव्याने उभारलेल्या राम मंदिराचे बांधकाम, तसेच पुणे जिल्ह्यातील देहूजवळील प्रसिद्ध भंडारा डोंगरावरील तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिराच्या बांधकामातही या दगडांचा वापर झाला आहे.)

या भव्य मंदिराचे श्रेय जाते ते सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांना. देहरूपाने आज त्यांचे वास्तव्य नसले तरी शक्तीरूपाने ते येथे वास करून आहेत, अशी भक्तांची श्रद्धा आहे. रामकृष्ण महाराजांचा जन्म १६ फेब्रुवारी १९३४ साली अहमदनगर जिल्ह्यातील रायतळे येथे झाला. लहानपणापासून ईश्वरभक्तीकडे त्यांचा ओढा होता. ‘गुरुवाणीआणिअमृत कलशया ग्रंथांमधील उल्लेखानुसार, वयाच्या व्या वर्षीच श्री दत्तात्रेयांनी रामकृष्ण महाराजांना दृष्टांत देऊन गाणगापूर येथे बोलावून घेतले. तेथे स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन त्यांना अनुग्रह दिला श्रीदत्तांची तपश्चर्या करण्यास सांगितले. २५ वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर स्वामी नृसिंहांनी पुन्हा त्यांना दर्शन दिले वेदविद्या दत्तगुरूंचे महात्म्य समाजाला समजावण्याचे कार्य त्यांच्यावर सोपविले.

श्रीनृसिंह सरस्वतींनी सोपविलेले कार्य महाराजांनी सुरू केले. त्यांच्या मुखातून ज्ञानगंगा वाहत असे. त्यांचे उपदेश ऐकण्यासाठी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली. महाराजांनी आपले सर्व कार्य शिष्यांकडून भिक्षेच्या माध्यमातून उभे केले. त्यांचे लाखो शिष्य बनले. महाराष्ट्रभर शेकडो सत्संग मंडळे त्यांनी तयार केली. १९७४ मध्ये त्यांनी अहमदनगरमध्येश्री दत्त देवस्थान ट्रस्टस्थापन केला. त्या अंतर्गत त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने मुलांना वेद शिकविण्यासाठीवेदान्तही वास्तू बांधली. या वास्तूत आजही सुमारे १०० मुले गुरुकुल पद्धतीने वेदाभ्यास शिकत आहेत. श्रावण वद्य चतुर्दशी शके १९२१ रोजी ( सप्टेंबर १९९९) सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर महाराज पंचतत्त्वात विलीन झाले.

मृत्यूपूर्वी महाराजांनी येथे भव्य दत्त मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता. त्यांचा हा संकल्प त्यांच्या शिष्यांनी पूर्ण केला. असे सांगितले जाते की या भव्य मंदिरासाठी लागणारा सर्व निधी हा महाराजांच्या शिष्यांनी भिक्षा मागून जमा केलायेथील दत्तमूर्ती संगमरवरी असून ती अत्यंत सुबक भासते. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना शृंगेरी मठाचे पीठाधिश्वर जगतगुरू श्री भारतीतीर्थ महास्वामींच्या हस्ते ११ जुलै २००७ मध्ये करण्यात आली.

कमानीवजा प्रवेशद्वारातून आत गेल्यावर परिसराचे पावित्र्य जपण्यासाठी हातपाय स्वच्छ धुऊनच मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करावा लागतो. कमरेचा पट्टा चामड्याच्या वस्तू या मंदिर परिसरात निषिद्ध असल्याने त्या बाहेर ठेवून पुढे जावे लागते. येथील परिसर प्रशस्त असून मधोमध श्री दत्तांचे भव्य मंदिर आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे गुलाबी दगडांच्या वापराने या भव्य मंदिराची उभारणी झाली आहे. या बांधकामाचे वैशिष्ट्य असे की या संपूर्ण बांधकामात कुठेही लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही. दगडांनाच विशिष्ट रचनेत खाचा पाडून ते एकमेकांमध्ये गुंफून (Interlock) हे बांधकाम झाले आहे. दुमजली असलेल्या या मंदिराच्या वरच्या मजल्यावरील गाभाऱ्यात दत्तगुरूंची संगमरवरी सुबक मूर्ती प्रतिष्ठापित आहे, तर तळमजल्यावर रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे ध्यानमंदिर आहे. सभामंडपाच्या प्रत्येक खांबांवर भिंतीवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर केलेली दिसते. मंदिराच्या पायापासून ते शिखराच्या टोकापर्यंत केलेल्या वैविध्यपूर्ण कलाकुसरीमुळे नखशिखांत तेशिल्पमंदिरभासते.

येथील आणखी एक विशेष बाब म्हणजे या मंदिरासमोर असलेलादेववृक्ष’. वड, पिंपळ औदुंबर या झाडांचा मिळून येथे मोठा वृक्ष तयार झाला आहे. त्यांचे खोड एकच असून वरच्या बाजूला ती झाडे वेगवेगळी झालेली दिसतात. अशाप्रकारे एकाच ठिकाणी तिन्ही पवित्र वृक्ष असणे दुर्मिळ मानले जाते. वडपिंपळऔदुंबर ही ब्रह्मा, विष्णू महेश यांची प्रतीके मानली जातात. श्री दत्तात्रेयही याच देवांचे रूप. त्यामुळे या पवित्र भूमीत असणाऱ्या या झाडाची पूजा येथे आलेले भाविक आवर्जून करतात.

येथील स्थानमहात्म्य वर्णनानुसार, १९८५ साली श्री स्वामी नृसिंह सरस्वती यांच्याचिंतामणी पादुकायेथे प्रकट झाल्या. गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, रामकृष्ण जयंती, गोकुळाष्टमी, रामनवमी आणि शंकराचार्य जयंती या दिवशी त्या पादुका भाविकांच्या दर्शनासाठी येथे ठेवल्या जातात. या मंदिरापासून किमी अंतरावर तपोवन येथे रामकृष्ण महाराजांचे समाधीस्थान आहे.

दत्त मंदिरात रुद्र, पवमान, पंचसूक्त आदी अभिषेक रोज केले जातात. भक्तांतर्फे दुधाचा अभिषेक, सहस्रनाम पाद्यपूजा, शाश्वत पूजा, लघुरुद्र केले जातात. याशिवाय देवस्थान ट्रस्टतर्फे वेळोवेळी नवचंडी, शतचंडी, महारुद्र, गणेश याग यांसारखी धार्मिक अनुष्ठानेही केली जातात. दत्त जयंतीला या मंदिरावर फुलांची विद्युत दिव्यांची रोषणाई केली जाते. दररोज सकाळी ते दुपारी ११.३० आणि दुपारी ते रात्री पर्यंत भाविकांना मंदिरात दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • अहमदनगर बस स्थानकापासून किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक भागांतून अहमदनगरसाठी 
  • एसटी रेल्वची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home