
संगमनेरपासून भंडारदऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सह्याद्रीच्या कुशीत ऐतिहासिक वारसा लाभलेले पेमगिरी गाव वसले आहे. भीमगड, शहागड या नावांनी प्रसिद्ध असलेला पेमगिरी किल्ला याच गावात आहे. या किल्ल्यावर असलेले पेमाई मातेचे मंदिर येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. याशिवाय गावात संपूर्ण सागवानी लाकडात बांधलेले दुमजली हनुमंताचे भव्य मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारी सुमारे २१ फूट उंचीची गदा उभारण्यात आली आहे. देशातील ही सर्वात मोठी गदा असल्याचे सांगितले जाते. या गावाच्या सीमेवर महाराष्ट्रातील महावटवृक्ष म्हणजेच सुमारे साडेतीन एकरावर पसरलेला एक विशाल वटवृक्षही आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एकमेव किल्ला म्हणजे पेमगिरी. शहाजीराजे भोसले यांच्या कर्तृत्वाची निशाणी म्हणून या किल्ल्याची ओळख आहे. या किल्ल्यावर शहाजीराजे व जिजाऊ यांचे अनेक वर्षे वास्तव्य होते. असे सांगितले जाते की शिवबांचे बालपणातील काही दिवस या किल्ल्यावर गेले होते. पेमगिरी किल्ल्यावर जाण्यासाठी गावातून रस्ता व पायरी असे दोन्ही मार्ग उपलब्ध आहेत. गावाकडून किल्ल्याकडे जाताना काही अंतरावर पेमाई देवीचे नवीन मंदिर गावकऱ्यांनी बांधले आहे. याशिवाय किल्ल्यावरही पेमाई देवीचे प्राचीन लहानसे मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची शस्त्रसज्ज मूर्ती आहे. मूर्तीशेजारी देवीचा मूळ तांदळा आहे. मंदिराच्या शेजारी ४ आयताकृती कोरीव टाक आहेत. ते सातवाहन काळातील असल्याचे सांगितले जाते. या टाकांमध्ये कायमच पाणी असते. हे दगडी टाक आतून एकमेकांना जोडण्यात आले आहेत. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला येथे देवीची यात्रा भरते.
पेमगिरी गावाच्या मध्यभागी हनुमंताचे एक संपूर्ण सागवानी लाकडांचा वापर करून बांधण्यात आलेले सुंदर मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील बांधकामासाठी केवळ दगड व सागवानी लाकडांचा वापर करण्यात आला आहे. एखादा भव्य राजवाडा वाटावा, अशी या मंदिराची रचना आहे. मंदिर परिसराला सर्व बाजूंनी तटबंदी आहे. मंदिराचा आवार प्रशस्त असून त्यात सुंदर उद्यान विकसित करण्यात आले आहे. त्यात अनेक शोभेची व फुलझाडे लावण्यात आल्यामुळे हा परिसर सुंदर व शांत भासतो. मंदिराशेजारी सुमारे २१ फूट उंचीची वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर असलेली गदा आहे. जमिनीपासून ६ ते ७ पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप दुमजली असून तेथून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे.
सभामंडपाच्या मध्यभागी एका चौथऱ्यावर शेंदूरचर्चित गदाधारी मारुतीची मूर्ती स्थापित असून या मूर्तीच्या मागे २ गदा कोरलेल्या आहेत. या संपूर्ण चौथऱ्यावर लाकडी नक्षीकाम आहे. चौथऱ्याच्या बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. सभामंडपातच प्रदक्षिणा मार्गावर आणखी २ मंदिरे असून त्यामध्ये श्रीदत्त व विठ्ठल–रुख्मिणी यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपाच्या खालच्या व वरच्या
मजल्यावर या गावातील ऐतिहासिक वास्तू प्रतिमारूपाने येथील भिंतींवर लावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पेमगिरी किल्ला, तेथे सापडलेल्या पुरातन मूर्ती, शस्त्रास्त्रे, गावातील पुरातन दगडी बारव याशिवाय गावाच्या सीमेवर असलेले महावटवृक्ष यांचा समावेश आहे. मंदिराच्या प्रांगणात एका चौथऱ्यावर शनिदेवांची शिळा आहे. गंगाराम तात्याबा डुबे पाटील यांच्या प्रेरणेने १९४२ मध्ये या मंदिराचे काम पूर्ण झाले. त्यासाठी कोकणातून सागवानी लाकडे आणण्यात आली होती. आज ८० वर्षांनंतरही मंदिर जैसे थे असल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्याला अद्याप कोणतीही डागडुजी करण्याची गरज भासली नाही.
या मंदिरापासून अडीच ते तीन किमी अंतरावर मोरदरा भागात महाराष्ट्रातील सर्वात मोठा वटवृक्ष आहे. हा विशाल वटवृक्ष साधारणतः साडेतीन एकरावर पसरला असून त्याच्या बुंध्याचा घेर हा ५० ते ६० फूट व एकूण पारंब्या १०० पेक्षा जास्त आहेत. (त्या जमिनीला टेकून पुन्हा त्याचे खोडात रूपांतर झाले आहे) ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार २५० वर्षांपूर्वीचा हा वटवृक्ष असून त्याच्या हजारो पारंब्या जमिनीत जाऊन त्याचा घेर दिवसेंदिवस आणखी मोठा होत आहे.
या शेकडो पारंब्यांमधून वटवृक्षाच्या मूळ खोडापर्यंत जाता येते. या खोडाच्या बुंध्याजवळ जाखाई–जाकमतबाबा ही दैवते आहेत.
या दैवतांबद्दल अशी आख्यायिका आहे की रामोशी समाजातील जाकमतबाबा शेळ्यांना चरण्यासाठी या जागेवर आले होते. त्यावेळी एका वाघाने शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला. शेळ्यांना वाचविण्यासाठी जाकमतबाबाही वाघाशी भिडले. जाकमतबाबांची आरडाओरड ऐकून त्यांची बहीण जाखाई तेथे आली. वाघाच्या तावडीत भाऊ सापडल्याचे लक्षात येताच जाखाईने स्वतः वाघाशी लढा दिला. या संघर्षात वाघ, जामकतबाबा व जाखाई हे तिघेही गतप्राण झाले. या दोघांनी वाघाशी लढताना हत्यार म्हणून वापरलेल्या कुऱ्हाडीचा दांडा आजही या वृक्षात पाहायला मिळतो. पुढे या जागेवर ग्रामस्थांनी जाकमतबाबा व जाखाई यांच्या मूर्तींची स्थापना केली. या झाडाच्या फांद्या जाणीवपूर्वक कोणी तोडल्या तर जाकमतबाबा त्याला शिक्षा करतो, अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे. त्यामुळे झाडाच्या पानालाही कोणी हात लावत नाही. त्यामुळे या झाडाचे रूपांतर विशाल वटवृक्षात झाले आहे. या महाकाय वटवृक्षावर गावकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे. गावातील या सर्व वैशिष्ट्यांमुळे भटकंती करणारे पर्यटक, इतिहास अभ्यासक, वनस्पती अभ्यासक व भाविक येथे कायम येत असतात.

संगमनेर से भंडारदरा की ओर जाने वाले मार्ग पर सह्याद्रि की गोद में ऐतिहासिक धरोहर से समृद्ध पेमगिरी गाँव बसा हुआ है। भीमगढ़ और शहागढ़ के नामों से प्रसिद्ध पेमगिरी किला भी इसी गाँव में स्थित है। इस किले पर स्थित पेमाई माता का मंदिर ग्रामवासियों का प्रमुख आस्था केंद्र है। इसके अतिरिक्त गाँव में पूर्णतः सागवान की लकड़ी से निर्मित भव्य दोमंजिला हनुमान मंदिर भी है। इस मंदिर के समीप लगभग 21 पद ऊँची गदा स्थापित की गई है। ऐसा कहा जाता है कि यह देश की सबसे बड़ी गदा है। गाँव की सीमा पर महाराष्ट्र का महावटवृक्ष स्थित है। यह लगभग साढ़े तीन एकड़ में फैला एक विशाल वटवृक्ष है।
अहिल्यानगर जिले की संगमनेर तहसील का एकमात्र किला पेमगिरी है। इसे शहाजी राजे भोसले की वीरता की पहचान माना जाता है। इस किले पर शहाजी राजे और जीजाबाई ने कई वर्षों तक निवास किया था। ऐसा कहा जाता है कि बालक शिवाजी के भी कुछ दिन इस किले पर बीते थे। पेमगिरी किले तक पहुँचने के लिए गाँव से सड़क और सीढ़ी, दोनों मार्ग उपलब्ध हैं। गाँव से किले की ओर जाते समय कुछ दूरी पर ग्रामवासियों द्वारा बनाया गया नया पेमाई देवी मंदिर स्थित है। इसके अतिरिक्त किले पर भी पेमाई देवी का एक प्राचीन छोटा मंदिर है। इस मंदिर के गर्भगृह में शस्त्रधारी देवी की पाषाण मूर्ति है। पाषाण मूर्ति के समीप देवी की प्रतीक स्वरूप शिला है। मंदिर के समीप 4 आयताकार नक्काशीदार जलकुंड हैं। ये सातवाहन काल के माने जाते हैं। इन जलकुंडों में सदैव पानी भरा रहता है। ये सभी जलकुंड अंदर से एक-दूसरे से जुड़े हुए हैं। चैत्र माह की पूर्णिमा पर यहाँ देवी का मेला आयोजित होता है।
पेमगिरी गाँव के मध्य में हनुमान जी का एक मनोहर मंदिर है। यह पूरी तरह सागवान की लकड़ी से बनाया गया है। इस मंदिर की विशेषता यह है कि इसके निर्माण में केवल पत्थर और सागवान की लकड़ी का उपयोग हुआ है। मंदिर की बनावट ऐसी है कि यह किसी भव्य राजमहल जैसा प्रतीत होता है। मंदिर परिसर को चारों ओर से प्राचीर (दुर्ग शैली में) से घेरा गया है। इसके आँगन में एक मनोहर बगीचा विकसित किया गया है। वहाँ कई सजावटी और फूलों के पौधे लगाए गए हैं। इससे यह परिसर शांत और रमणीय लगता है। मंदिर के समीप स्थित लगभग 21 पद ऊँची विशेष नक्काशीदार गदा दर्शनीय है। मंदिर में प्रवेश के लिए 6–7 सीढ़ियाँ चढ़कर सभामंडप में जाना होता है। सभामंडप दोमंजिला है और ऊपर जाने के लिए सीढ़ियाँ भी बनी हैं।
सभामंडप के मध्य में एक चबूतरे पर सिंदूर चढ़ी गदाधारी हनुमान जी की पाषाण मूर्ति स्थापित है। इस पाषाण मूर्ति के पीछे दो गदाएँ उकेरी गई हैं। इस पूरे चबूतरे पर लकड़ी की मनोहर नक्काशी की गई है। चबूतरे के चारों ओर प्रदक्षिणा मार्ग है। इसी सभामंडप में प्रदक्षिणा मार्ग पर दो और मंदिर हैं।
इनमें श्रीदत्त और विठ्ठल-रुक्मिणी की पाषाण मूर्तियाँ स्थापित हैं। सभामंडप की ऊपरी और निचली मंजिल की दीवारों पर गाँव की ऐतिहासिक धरोहरों की चित्रात्मक प्रतिकृतियाँ लगाई गई हैं। इनमें पेमगिरी किला, वहाँ प्राप्त पुरातन पाषाण मूर्तियाँ, शस्त्र, गाँव की प्राचीन बावड़ी तथा गाँव की सीमा पर स्थित महावटवृक्ष सम्मिलित हैं। मंदिर परिसर में एक चबूतरे पर शनिदेव की शिला है। गंगाराम तात्याबा दुबे-पाटिल की प्रेरणा से वर्ष 1942 में इस मंदिर का निर्माण कार्य पूर्ण हुआ था। इसके लिए सागवान की लकड़ी कोंकण क्षेत्र से लाई गई थी। आज 80 वर्षों के बाद भी यह मंदिर ज्यों का त्यों बना हुआ है। ग्रामवासियों के अनुसार अब तक इसकी किसी मरम्मत की आवश्यकता नहीं पड़ी है।
इस मंदिर से लगभग 2.5 से 3 किलोमीटर की दूरी पर मोरदरा क्षेत्र में महाराष्ट्र का सबसे बड़ा वटवृक्ष स्थित है। यह विशाल वटवृक्ष लगभग साढ़े तीन एकड़ में फैला है। इसका तना 50 से 60 पद के घेरे का है। इसकी जड़ से निकली हुई जटाएँ 100 से अधिक हैं। इनमें से कई जटाएँ जमीन से जुड़कर पुनः तने में परिवर्तित हो गई हैं। ग्रामवासियों के अनुसार यह वटवृक्ष लगभग 250 वर्ष पुराना है।
इसकी हज़ारों जटाएँ ज़मीन में फैलकर वृक्ष का विस्तार निरंतर बढ़ा रही हैं। इन सैकड़ों जटाओं के बीच से होकर मूल तने तक पहुँचा जा सकता है। इस तने के समीप ही जाखाई-जाकमत बाबा नामक ग्राम देवता विराजमान हैं।
इस देवता से जुड़ी लोककथा के अनुसार, रामोशी समाज के जाकमत बाबा बकरियों को चराने इस स्थान पर आए थे। उसी समय एक बाघ ने बकरियों के झुंड पर हमला किया। बकरियों को बचाने के लिए जाकमत बाबा बाघ से भिड़ गए। उनकी पुकार सुनकर उनकी बहन जाखाई वहाँ पहुँच गई। जब उसने देखा कि उसका भाई बाघ के चंगुल में है, तो उसने भी बाघ से युद्ध किया। इस संघर्ष में बाघ, जाकमत बाबा और जाखाई—तीनों की मृत्यु हो गई। उन्होंने बाघ से लड़ते समय जिस कुल्हाड़ी के हत्थे का उपयोग किया था, वह आज भी उस वृक्ष में दिखाई देता है। बाद में ग्रामवासियों ने वहाँ जाकमत बाबा और जाखाई की पाषाण मूर्तियाँ स्थापित कीं। ऐसी मान्यता है कि यदि कोई जानबूझकर इस वृक्ष की शाखाएँ तोड़ता है, तो जाकमत बाबा उसे दंड देते हैं। इसलिए यहाँ कोई भी व्यक्ति वृक्ष के पत्तों तक को नहीं छूता। इसी कारण यह वृक्ष एक विशाल वटवृक्ष में परिवर्तित हो गया है। इस महाकाय वटवृक्ष के प्रति ग्रामवासियों की अत्यंत श्रद्धा है। गाँव की इन विशेषताओं के कारण पर्यटक, इतिहास और वनस्पति के शोधकर्ता और श्रद्धालुगण यहाँ नियमित रूप से आते रहते हैं।