संत शेख महाराज मंदिर

श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर

मुस्लिम संताचे स्थान एखाद्या शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणे हे तसे दुर्मिळ आहे; परंतु अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्याचे ग्रामदैवत म्हणून संत शेख महमंद महाराज मंदिर प्रसिद्ध असून वारकरी संप्रदायाचे ते श्रद्धास्थान आहे. हिंदूमुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून श्रीगोंदा येथील या मंदिराची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी शेख महंमद महाराज यांना श्रीगोंद्यात आणून त्यांच्या कार्यासाठी काही जमीन इनाम स्वरूपात दिली होती, असा इतिहासात उल्लेख आहे.

वारकरी संप्रदायातील थोर संत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे समकालीन म्हणून शेख महंमद महाराज ओळखले जातात. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार वारकरी, दत्त, नाथ सुफी या संप्रदायांचे महाराजांवर संस्कार घडले होते. कादरी संप्रदायातील भारतात आलेले पहिले कादरी सुफी म्हणून महंमद गौस मानले जातात. त्यापुढे राज महंमदकादरी चाँदसाहेब (चंद्रभट ऊर्फ चाँद बोधले) कादरी महंमद साहेब म्हणजेच शेख महंमद अशी गुरू परंपरा आहेचाँद बोधले यांचे जनार्दन स्वामी शेख महंमद हे शिष्य. त्यामुळे हे दोघे संत गुरुबंधू म्हणून ओळखले जातात. जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज अशी ही गुरू परंपरा प्रख्यात आहे.

तो काळ इस्लामी राजवटीचा होता. दिल्लीची मुघलशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, पोर्तुगीज याबरोबरच अनेक लहानलहान राज्ये अस्तित्वात होती. आपापले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी होणाऱ्या सततच्या लढायांमध्ये जनता भरडली जात होती. समाजात अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीभेद, धर्मभेद विकोपाला गेला होता. देशात बहुतांश ठिकाणी मुस्लिमांची सत्ता होती, तर बहुसंख्य जनता मात्र हिंदू होती. दोन्ही धर्मांमध्ये पूजाअर्चा, राहणीमान यात फरक होता. हिंदू मूर्तिपूजक, तर मुस्लिम अल्लास मानणारे. दोन्ही धर्मांमध्ये श्रेष्ठ, कनिष्ठ वाद फोफावत चालला होता. अशावेळी एका समाजसुधारकाची, समानतेची वागणूक देणाऱ्या महात्म्याची आवश्यकता होती, ती संत शेख महंमद महाराजांच्या रूपाने पूर्ण झाली, असे म्हटले जाते.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाहिरा या गावी राजमहंमद फुलाई या दाम्पत्याच्या पोटी शेख महंमदांचा जन्म झाला. राजमहंमद धारूरच्या किल्ल्यावर हवालदार म्हणून बादशहाकडे चाकरीस होते. शेख महंमदांच्या घरात गुरू परंपरा धार्मिक वातावरण असल्याने लहानपणापासूनच त्यांना चांगले शिक्षण मिळालेशेख महंमदांनी सामाजिक, राजकीय परिस्थिती जवळून पाहिली होती. समाजातील विषमता, जाती धर्मातील द्वेष, चातुर्वण्य व्यवस्था परिस्थितीला बळी पडलेला समाज त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला वैचारिक क्रांती करण्याचे बिजारोपण बालवयातच झाले. यानंतर श्रीगोंदा येथे आल्यानंतर वारकरी संप्रदायाची समतावादी, सर्वांना मिळून मिसळून घेणारी, सरळमार्गी भक्ती शेख महंमदांना भावली ते त्यात रमले. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदा भेद भ्रम अमंगळ॥किंवायारे यारे लहान थोर। याती भलती नारी नर। करावा विचार। नलगे चिंता कवणाशी॥या अशा त्यांच्या अभंगांच्या माध्यमातून वारकरी परंपरेतील विचार समाजापर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केले.

श्रीगोंदा शहराच्या मध्यवर्ती भागात संत शेख महंमद महाराज यांचे मंदिर आहे. मंदिर परिसाला तटबंदी असून हे मंदिर दगडी बांधणीचे, चौकोनी रचनेचे आहे. मंदिराच्या वरील बाजूने चार मिनार आहेत. निजामशाही कालखंडातील मठाच्या शैलीप्रमाणे हे मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणेशमूर्ती समोर शिवलिंग आहे. पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिराला जशी नामदेव पायरी आहे तशाच स्वरूपात शेख महाराजांचा भक्त मोदोबा तेली यांची येथे पायरी आहे. त्यांनी या पायरीवर अखेरचा श्वास घेतला, त्यांची आठवण म्हणून ही पायरी त्यांच्या नावाने ओळखली जातेजमिनीपासून काहीसे उंचावर असलेल्या या मंदिरात संत शेख महंमद महाराज आणि त्यांची पत्नी फातिमाबी यांच्या समाध्या आहेत.

या समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला भुयार असून त्याच्यावर मोठी दगडी फरशी आहे. असे सांगितले जाते की या भुयारात जाऊन बाबा त्यांच्या पत्नी फातिमाबी समाधीस्त झाले. फाल्गुन शुद्ध नवमीला संत शेख महाराज महंमद यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथे मोठा यात्रोत्सव असतो. यात्रेपूर्वी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात हिंदूंसोबत मुस्लिमांचाही सहभाग असतो. यात्रेच्या दिवशी महाराजांच्या समाधीला स्नान घालून त्यावर चंदनाचा लेप लावण्यात येतो. त्यानंतर संध्याकाळी छबिना मिरवणूक निघते. पालखीत बाबांच्या पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात येते. दुसऱ्या दिवशी कुस्त्यांच्या स्पर्धांनी यात्रोत्सवाची सांगता होते. या यात्रोत्सवासाठी हजारो भाविकांची उपस्थिती असते.

महाराजांच्या समाधीला वर्षातून पाच वेळा म्हणजे गुढीपाडवा, आषाढी एकादशी, विजया दशमी (दसरा), महाशिवरात्र फाल्गुन शुद्ध नवमी या महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी चंदनाचा लेप लावला जातो. चंदनलेप लावताना समाधीच्या एका बाजूला हिंदू एका बाजूला मुस्लिम समाजातील भाविक असतात. दोन्ही समाजातील भाविक मिळून हा लेप समाधीला लावतात. श्रीगोंद्यातील अनेक भाविक आपल्या दिवसाची सुरुवात महाराजांच्या दर्शनाने करतात. येथे कोणतीही मनोकामना व्यक्त केली तर महाराज ती पूर्ण करतात, अशी येथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे. दर गुरुवारी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येतात. सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत मंदिरात जाऊन शेख महंमद महाराजांचे दर्शन घेता येते

उपयुक्त माहिती:

  • श्रीगोंदा बस स्थानकापासून किमी, तर अहमदनगरपासून ६१ किमी अंतरावर
  • श्रीगोंद्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागांतून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराजवळ जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home