लेण्यांच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील समृद्ध राज्य मानले जाते. देशभरात एकूण १००० लेण्या असून त्यातील ८०० हून जास्त लेण्या या केवळ महाराष्ट्रात आहेत. त्यातील अजिंठा, वेरूळ व एलिफंटा या तीन लेण्यांचा जागतिक वारसा शिल्पस्थानात (UNESCO) समावेश झालेला आहे. राज्यातील सर्वाधिक लेण्या पुणे जिल्ह्यात असल्या तरी अहिल्यानगर जिल्ह्यातही काही वैशिष्ट्यपूर्ण लेण्या आहेत. त्यापैकीच पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर लेणी ‘गुहा मंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे महादेवाचे मंदिर व प्राचीन लेणी असा संगम पाहायला मिळतो.
कल्याण–नगर मार्गावर पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वर हे गाव आहे. या गावाबाहेर असलेल्या डोंगरात ही लेणी आहेत. इतिहास संशोधकांच्या मते ५व्या ते ६व्या शतकादरम्यान ती कोरली गेली असावीत. एका आख्यायिकेनुसार अज्ञातवासाच्या काळात पांडवांनी ही लेणी कोरली असून त्यांना येथे महादेवांची स्वयंभू पिंडी सापडली. तेव्हापासून हे स्थान श्री क्षेत्र ढोकेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. हे जागृत स्थान असून ढोकेश्वर नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
ढोकेश्वर गुहा मंदिर ज्या डोंगरात आहे तेथील विशेष बाब म्हणजे त्या डोंगराचा आकारही शिवलिंगासारखा आहे. स्थापत्यकलेचा सुंदर नमुना म्हणून हे मंदिर ओळखले जाते. मंदिरात जाण्यासाठी डोंगराच्या पायथ्यापासून पायरी मार्ग आहे. या मार्गाच्या बाजूला मुख्य प्रवेशद्वाराच्या अलीकडे २ समाधी मंदिरे असून तेथे एक शरभ शिल्प आहे. (शरभ म्हणजे एक प्रकारचा अक्राळविक्राळ प्राणी.
हिरण्यकश्यपूच्या वधानंतर नरसिंहाला शांत करण्यासाठी महादेवांनी शरभ प्राण्याचा अवतार घेतला होता, असे मानले जाते.)
पायरी मार्ग संपून तटबंदीच्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताना एखाद्या किल्ल्यात प्रवेश करीत असल्याचा भास होतो. मंदिराच्या प्रांगणात दीपमाळ आहे. ढोकेश्वर मंदिराच्या दालनासमोर दोन चौकोनी स्तंभ व दोन अर्धस्तंभ आहेत. तेथील भिंतीवर गजलक्ष्मी व हातात फुले घेतलेल्या दोन द्वारपालांची शिल्पे आहेत.
सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या मध्यभागी दगडी नंदी स्थानापन्न असून एका भिंतीवर वृक्षांखाली बसलेल्या सप्तमातृकांच्या मूर्ती त्यांच्या वाहनांसह कोरलेल्या आहेत. सप्तमातृका या विविध देवांच्या शक्ती होत. त्या मातृकांच्या हातात असलेल्या आयुधांवरून आणि पायाशी असलेल्या वाहनावरून त्या कोणत्या देवाच्या शक्ती आहेत हे समजते. हत्तीवरून ऐन्द्री (इंद्राची शक्ती),
वराहमुखावरून वाराही (विष्णूची शक्ती), नंदीवरून पार्वती (शिवाची शक्ती) अशी त्यांची ओळख आहे. या सप्तमातृकांच्या एका बाजूला गणपती व दुसऱ्या बाजूला वीरभद्र यांच्या मूर्ती आहेत. सप्तमातृकापटाच्या शेजारी काळाची नग्नप्रतिमा आहे. याशिवाय येथील भिंतीवर भैरव, नागदेवता, आयुधपुरुष आणि त्रिशूळ पुरुष या मूर्ती आहेत.
मंदिराचा गाभारा वैशिष्ट्यपूर्ण आहे. गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा मार्ग कोरलेला आहे. या मार्गात एक गुहा असून त्यातही अनेक शिल्पे आहेत. प्रदक्षिणा मार्गावर वीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोरण्यात आलेली वीरगळ, शिवलिंग आणि मोठा नंदी आहे. गर्भगृहातील चौथऱ्यावर शिवलिंग आहे. पुरातत्त्व खात्याने ढोकेश्वर मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
मंदिराच्या वरच्या बाजूने वाहत येणारे पाणी नैसर्गिकरीत्या एका दगडातील कुंडात साठवले जाते. पाणी साठवण्याची ही प्राचीन पद्धत आजच्या काळातही या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची तहान भागवण्यासाठी उपयुक्त ठरते. डोंगरावरील पाणी खालील कुंडात येण्यासाठी दगड कोरून त्यासाठी मार्ग तयार करण्यात आला आहे. या कुंडाच्या वरील बाजूला आणखी एक पाण्याचे टाक आहे, त्याला ‘सीता न्हाणी’ असे म्हटले जाते. या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी दगडांत पायऱ्या बनविण्यात आल्या आहेत. येथून टाकळी ढोकेश्वर व आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते.
श्रावण महिन्यात हा परिसर नयनरम्य भासतो. याच महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ढोकेश्वराची मोठी यात्रा भरते. यावेळी हजारो भाविक पहाटेपासून दर्शनाला येतात. पहाटे शिवलिंगाला अभिषेक करून यात्रा सुरू होते. दुपारी छबिन्याची (पालखी) मिरवणूक काढली जाते. त्यानंतर कुस्त्यांच्या स्पर्धा होतात. या स्पर्धेसाठी राज्यातील विविध भागांतून शेकडो मल्ल येतात. यात्रेसाठी आलेल्या भाविकांना खिचडीचा महाप्रसाद देण्यात येतो.
गुफाओं के मामले में महाराष्ट्र देश का एक समृद्ध राज्य माना जाता है। देश में कुल 1000 गुफाएँ हैं। इनमें से 800 से ज़्यादा अकेले महाराष्ट्र में हैं। इनमें से तीन अजंता, वेरुल और एलीफेंटा विश्व धरोहर स्थल (यूनेस्को) में शामिल हैं। हालाँकि राज्य में सबसे ज़्यादा गुफाएँ पुणे ज़िले में हैं। अहिल्यानगर ज़िले में भी कुछ अनोखी गुफाएँ हैं। इनमें पारनेर तहसील स्थित टाकली ढोकेश्वर गुफाएँ ‘गुफा मंदिर’ के नाम से प्रसिद्ध हैं। यहाँ महादेव के एक मंदिर और प्राचीन गुफाओं का संगम देखा जा सकता है।
कल्याण-अहिल्यानगर मार्ग पर पारनेर तहसील में टाकली ढोकेश्वर नामक एक गाँव है। ये गुफाएँ इसी गाँव के बाहर पहाड़ों में स्थित हैं। इतिहासकारों के अनुसार इनका निर्माण 5वीं और 6वीं शताब्दी के बीच हुआ होगा। एक पौराणिक कथा के अनुसार पांडवों ने अपने अज्ञातवास के दौरान इन गुफाओं का निर्माण किया था। उन्हें यहाँ महादेव का स्वयंभू शिवलिंग मिला था। तभी से यह स्थान श्री क्षेत्र ढोकेश्वर के नाम से प्रसिद्ध है। यह एक जागृत स्थल है। श्रद्धालुओं का मानना है कि ढोकेश्वर अर्जी पूरी करता है।
ढोकेश्वर गुफा मंदिर जिस पर्वत पर स्थित है। उसकी विशेषता यह है कि पर्वत का आकार भी शिवलिंग जैसा है। यह मंदिर वास्तुकला का एक मनोहर उदाहरण माना जाता है। मंदिर तक पहुँचने के लिए पर्वत की तलहटी से एक पैदल मार्ग है। इसी मार्ग के किनारे मुख्य द्वार के पास दो समाधि मंदिर हैं। वहाँ एक शरभ मूर्ति है।
शरभ एक प्रकार का पिशाच समान पशु है। ऐसा माना जाता है कि हिरण्यकश्यप का वध करने के बाद नरसिंह को शांत करने के लिए महादेव ने शरभ का अवतार लिया था। पगडंडी समाप्त होने के बाद जब आप मंदिर प्रांगण में प्रवेश करते हैं। आपको ऐसा लगता है जैसे आप किसी किले में प्रवेश कर रहे हों। मंदिर प्रांगण में दीपस्तंभ है। ढोकेश्वर मंदिर के सभामंडप के सम्मुख दो वर्गाकार स्तंभ और दो अर्धस्तंभ हैं। दीवार पर गजलक्ष्मी और हाथों में पुष्प लिए दो द्वारपालों की मूर्तियाँ हैं।
मंदिर एक सभामंडप और एक गर्भगृह के रूप में निर्मित है। सभामंडप के मध्य में एक पाषाण निर्मित नंदी स्थापित है। एक दीवार पर वृक्षों के नीचे बैठी सप्त मातृकाओं की मूर्तियाँ उनके वाहनों सहित उत्कीर्ण हैं। सप्त मातृकाएँ विभिन्न देवताओं की शक्तियाँ हैं। इन मातृकाओं के हाथों में धारण किए हुए शस्त्र और उनके चरणों में धारण किए हुए वाहन यह दर्शाते हैं कि वे किस देवता की हैं। इन्हें हाथी से ऐन्द्री (इंद्र की शक्ति), वराहमुख से वाराही (विष्णु की शक्ति) और नंदी से पार्वती (शिव की शक्ति) के रूप में जाना जाता है।
इन सप्त मातृकाओं के एक ओर गणपति और दूसरी ओर वीरभद्र की मूर्तियाँ हैं। सप्त मातृकाओं के बगल में कला की नग्न मूर्ति है। इसके अलावा दीवार पर भैरव, नाग देवता, आयुध पुरुष और त्रिशूल पुरुष की मूर्तियाँ भी हैं।
मंदिर का आंतरिक भाग अद्वितीय है। आंतरिक भाग के चारों ओर एक परिक्रमा पथ बना हुआ है। इस पथ में एक गुफा है। उसमें अनेक मूर्तियाँ हैं। परिक्रमा पथ पर वीरों की स्मृति में एक वीर-शिला, एक शिवलिंग और एक विशाल नंदी की पाषाण मूर्ति बनी हुई है। गर्भगृह में चौपाल पर एक शिवलिंग भी है। पुरातत्व विभाग ने ढोकेश्वर मंदिर को राष्ट्रीय संरक्षित स्मारक घोषित किया है।
मंदिर के ऊपर से बहने वाला जल प्राकृतिक रूप से एक पत्थर के कुंड में संग्रहित होता है। जल संग्रहण की यह प्राचीन पद्धति आज भी इस स्थान पर आने वाले श्रद्धालुओं की प्यास बुझाने के लिए उपयोगी है। पहाड़ से नीचे कुंड तक पानी लाने के लिए पत्थरों को तराशकर एक मार्ग तैयार किया गया है। इस कुंड के ऊपर एक और जल कुंड है। इसे ‘सीता न्हाणी’ कहा जाता है। इस स्थान तक पहुँचने के लिए पत्थरों में सीढ़ियाँ बनाई गई हैं। यहाँ से टाकली ढोकेश्वर और आसपास के क्षेत्र का विहंगम दृश्य दिखाई देता है।
श्रावण मास में यह क्षेत्र मनोहर लगता है। इस माह के तीसरे सोमवार को ढोकेश्वर का विशाल मेला आयोजित किया जाता है। इस दौरान सुबह से ही हजारों श्रद्धालु दर्शन के लिए आते हैं। मेला सुबह शिवलिंग के अभिषेक के साथ शुरू होता है। दोपहर में पालकी यात्रा निकाली जाती है। उसके बाद कुश्ती प्रतियोगिताएँ आयोजित की जाती हैं। इस प्रतियोगिता में राज्य के विभिन्न हिस्सों से सैकड़ों पहलवान आते हैं। मेले पर आए श्रद्धालुओं को खिचड़ी का भव्य प्रसाद दिया जाता है।