शेषनारायण मंदिर

कुंभेफळ, ता. अकोले,जि. अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कुंभेफळ गावात प्रवरा नदीच्या किनाऱ्यावर श्री शेषनारायणाचे प्राचीन मंदिर आहे. शेषनारायणाची मंदिरे ही देशात दुर्मिळ असून काशी येथील शेषनारायण मंदिरानंतर राज्यातील या मंदिराचे महत्त्व आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या ठिकाणालाप्रतिकाशीअसेही म्हटले जाते. या मंदिराची अक्षय तृतीयेपासून भरणारी दिवसांची यात्रा प्रसिद्ध आहे.

पुराणांतील उल्लेखानुसार, शेषनाग हा कश्यप ऋषींचा ज्येष्ठ पुत्र विष्णूचा परमभक्त होता. तो नागांचा राजाही होता; परंतु त्याने राज्य सोडून विष्णूसेवा करण्याचे व्रत घेतले. तेव्हापासून तो विष्णूंसाठी आपल्या वेटोळ्यांचे आसन फण्यांचे छत्र धरू लागला. विष्णूंनाही शेषनाग प्रिय असल्याने अनेकदा त्यांनी शेषनागासह पृथ्वीवर अवतार घेतले. त्रेतायुगात राम अवतारात शेषनाग हा लक्ष्मण, तर कृष्ण अवतारात बलराम झाला होता. वासुदेव जेव्हा बाळ कृष्णाला टोपलीत घेऊन नदी पार करत होते, तेव्हा शेषनागाने आपल्या फण्याने त्याचे पावसापासून रक्षण केले होते. यजुर्वेदातील नारायण सूक्तानुसार, विष्णू म्हणजेच नारायण हा विश्वाचा स्वामी असून तो स्वतःचा अधिपती आहे, तो सर्वोच्च आहे. त्यानुसार नागांमध्ये शेषनाग देवांमधील विष्णू वा नारायण श्रेष्ठ समजले जातात. असे सांगितले जाते की समुद्रमंथनातून मिळालेल्या अमृताच्या वाटपावरून देव राक्षसांमध्ये झालेल्या युद्धानंतर कुंभेफळ येथे श्रीविष्णू वास्तव्यास आले होते. त्यावेळी विष्णूंची सेवा करण्यासाठी शेषनागही येथे आला. तेव्हापासून या तीर्थस्थानाला शेषनारायण मंदिर हे नाव पडले.

अकोले येथून कुंभेफळ गावात प्रवेश करताना रस्त्याला लागून शेषनारायणाचे हे प्रसिद्ध मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडात असून अहिल्यादेवी होळकर यांनी त्याचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे. रस्त्यावर असणाऱ्या मंदिराच्या कमानीतून आत गेल्यानंतर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या प्रांगणात फरसबंदी असून परिसराला तारेचे कुंपण आहे. मंदिराच्या समोर असलेल्या दगडी चौथऱ्यावर श्रीरामांच्या पादुका प्रतिष्ठापित आहेत.

शेषनारायण मंदिर उंच जगतीवर (पाया) उभे आहे. दर्शन मंडप, सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. पायऱ्या चढून मंदिराच्या दर्शन मंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव शिल्पे आहेत. सभामंडप तुलनेने लहान असून गाभाऱ्यात विष्णूंची मूर्ती आहे. या मूर्तीवर शेषाने फणा धरला आहे. गाभाऱ्यात विष्णू मूर्तीच्या दोन्ही बाजूला घोड्यावर बसलेला खंडोबा म्हाळसा यांच्या मूर्ती आहेत.

दरवर्षी अक्षय तृतीयेपासून दिवस शेषनारायणाची यात्रा असते. यावेळी देवाच्या काठीची मिरवणूक काढली जातात. ढोलताशांच्या गजरात निघणाऱ्या या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होतात. याशिवाय मंदिरात दिवाळी, देवदिवाळी हे उत्सवही साजरे होतात. मंदिरात दररोज सकाळी वाजता आरती होते. भाविकांना सकाळी ते रात्री १० पर्यंत शेषनारायणाचे दर्शन घेता येते.

कुंभेफळ हे गाव ऐतिहासिक धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जातेया गावात अनेक मंदिरे आहेत. त्यामध्ये गावाचे श्रद्धास्थान असलेल्या शेषनारायण मंदिरासह वीरभद्र, काशाई, शंभू महादेव मारुती या मंदिरांचा समावेश आहे. या गावाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे शेषनारायण मंदिरापासून जवळच अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली बारव (दगडी विहीर). अनेक पर्यटक तसेच येथे दर्शनासाठी आलेले भाविक आवर्जून ही वैशिष्ट्यपूर्ण बारव पाहायला जातात.

राणी अहिल्यादेवी होळकर पुण्याहून इंदोरकडे जाताना या मार्गाने जात असत. त्यामुळे या मार्गावर त्यांनी अनेक ठिकाणी बारव बांधल्या, पण कालौघात त्या नष्ट झाल्या. मात्र या बारवेचा चिरा अन् चिरा आजही शाबूत आहे. या बारवेची खोली ५८ फूट (१० पुरुष खोल) असून तळापर्यंत जाण्यासाठी सुमारे ४७ पायऱ्या आहेत. या बारवेचे वैशिष्ट्य असे की यामध्ये कमानी असून त्यात श्रीगणेशाची मूर्ती अहिल्यादेवींच्या हस्ते प्रतिष्ठापित केलेली आहे. अहिल्यादेवींनी महाराष्ट्रात जेथे जेथे बारव बांधल्या तेथे तेथे त्यांनी आवर्जून त्यामध्ये देवांच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या होत्या. ज्यामुळे तेथील पावित्र्य कायम राखले जाईल. त्र्यंबकेश्वरसाठी आळंदीहून निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकरी दिंड्यांचा या बारवेजवळच थांबा असतो.

उपयुक्त माहिती:

  • अकोलेपासून किमी, तर अहिल्यानगरपासून १२५ किमी अंतरावर
  • अकोलेपासून एसटी खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय

शेषनारायण मंदिर

कुंभेफल, तह. अकोले, जि. अहिल्यानगर

अहिल्यानगर जिले की अकोले तहसील में स्थित कुंभेफल गाँव में प्रवरा नदी के तट पर श्री शेषनारायण का एक प्राचीन मंदिर स्थित है। शेषनारायण के मंदिर देश भर में बहुत ही दुर्लभ हैं। काशी के शेषनारायण मंदिर के पश्चात महाराष्ट्र में यह मंदिर अत्यंत प्रमुख माना जाता है। श्रद्धालु इसे ‘प्रति-काशी’ कहकर भी संबोधित करते हैं। अक्षय तृतीया से प्रारंभ होने वाला इस मंदिर का तीन दिवसीय मेला विशेष रूप से प्रसिद्ध है।

पुराणों के अनुसार, शेषनाग कश्यप ऋषि के ज्येष्ठ पुत्र और भगवान विष्णु के परम भक्त थे। वे नागों के राजा थे। उन्होंने राजपद त्यागकर विष्णु-सेवा का व्रत लिया। तब से वे अपने फनों से छत्र और अपने शरीर की शय्या बनाकर विष्णु की सेवा करते आ रहे हैं। भगवान विष्णु भी उन्हें अत्यंत प्रिय मानते हैं। त्रेतायुग में रामावतार के समय शेषनाग ने लक्ष्मण रूप में तथा द्वापरयुग में कृष्णावतार के समय बलराम रूप में जन्म लिया। जब वासुदेव ने बालकृष्ण को टोकरी में रखकर नदी पार करवाई थी, तब शेषनाग ने अपने फनों से वर्षा से उनकी रक्षा की थी। यजुर्वेद के नारायण सूक्त में कहा गया है कि नारायण ही विश्व के स्वामी और सर्वश्रेष्ठ हैं। उसी के अनुसार नागों में शेषनाग और देवों में विष्णु को सर्वोच्च माना गया है। ऐसी मान्यता है कि समुद्र मंथन के पश्चात अमृत के वितरण को लेकर देवों और दैत्यों में युद्ध हुआ था। तब भगवान विष्णु कुंभेफल में विराजमान हुए। उनकी सेवा हेतु शेषनाग भी वहीं आए। तभी से इस तीर्थस्थल का नाम शेषनारायण मंदिर पड़ा।

अकोले से कुंभेफल गाँव में प्रवेश करते ही सड़क किनारे यह प्रसिद्ध शेषनारायण मंदिर स्थित है। पूरा मंदिर पाषाणों से निर्मित है। इसका जीर्णोद्धार अहिल्याबाई होलकर द्वारा करवाया गया था। मंदिर के मुख्य द्वार की कमान से प्रवेश करने पर मंदिर प्रांगण में पहुँचा जाता है। इस प्रांगण में पत्थर का फर्श है। साथ ही चारों ओर तारबंदी की गई है। मंदिर के सम्मुख एक पत्थर के चबूतरे पर श्रीराम की पादुका प्रतिष्ठित हैं।

शेषनारायण मंदिर एक ऊँचे चबूतरे पर निर्मित है। मंदिर की रचना दर्शनमंडप, सभामंडप और गर्भगृह जैसी है। पाँच सीढ़ियाँ चढ़ने के बाद दर्शनमंडप में प्रवेश होता है। सभामंडप के प्रवेशद्वार की दीवारों पर विशिष्ट शिल्पकारी दिखाई देती है। सभामंडप अपेक्षाकृत छोटा है। गर्भगृह में विष्णु की पाषाण मूर्ति प्रतिष्ठित है। उनके ऊपर शेषनाग ने फन फैलाया हुआ है। गर्भगृह में विष्णु पाषाण मूर्ति के बाईं और दाईं ओर घोड़े पर आरूढ़ खंडोबा और म्हालसा की पाषाण मूर्तियाँ स्थित हैं।

हर साल अक्षय तृतीया से प्रारंभ होने वाले तीन दिवसीय मेले में भगवान की लाठी की भव्य शोभायात्रा निकाली जाती है। इसमें हजारों श्रद्धालु ढोल-ताशों की गूंज के साथ सम्मिलित होते हैं। दीपावली और देव दीपावली के पर्व भी यहाँ धूमधाम से मनाए जाते हैं। मंदिर में प्रतिदिन सुबह ७ बजे आरती होती है। श्रद्धालु सुबह ७ बजे से रात १० बजे तक दर्शन कर सकते हैं।

कुंभेफल गाँव ऐतिहासिक और धार्मिक दृष्टि से अत्यंत प्रमुख माना जाता है। यहाँ अनेक मंदिर हैं। इनमें शेषनारायण मंदिर के अतिरिक्त वीरभद्र, काशाई, शंभू महादेव और मारुति मंदिर प्रमुख हैं। इस गाँव की एक और विशेषता है। शेषनारायण मंदिर के निकट स्थित अहिल्याबाई होलकर द्वारा निर्मित एक विशाल पाषाण बावड़ी है। यहाँ आने वाले श्रद्धालु इस विशिष्ट बावड़ी को देखने अवश्य जाते हैं।

रानी अहिल्याबाई होलकर पुणे से इंदौर जाते समय इसी मार्ग से यात्रा करती थीं। इसलिए उन्होंने मार्ग में कई स्थानों पर बावड़ियाँ बनवाईं। समय के साथ अधिकांश बावड़ियाँ नष्ट हो गईं। कुंभेफल की यह बावड़ी आज भी अक्षुण्ण है। इसकी गहराई लगभग ५८ पद (लगभग १० पुरुष गहराई) है। तल तक पहुँचने हेतु ४७ सीढ़ियाँ बनी हुई हैं। इस बावड़ी की विशेषता यह है कि इसमें दो कमानें हैं। इनमें श्रीगणेश की पाषाण मूर्ति अहिल्याबाई के हाथों प्रतिष्ठित की गई थी। अहिल्याबाई ने जहाँ-जहाँ बावड़ियाँ बनवाईं, वहाँ देवताओं की मूर्तियाँ भी अवश्य स्थापित कीं। इससे इन स्थानों की पवित्रता बनी रहे। त्र्यंबकेश्वर की ओर जाने वाली आलंदी से रवाना होने वाली निवृत्तीनाथ की दिंडी यात्रा इसी बावड़ी के पास पड़ाव करती है।

मुख्य विशेषताएँ:

  • अकोले से ४ किमी तथा अहिल्यानगर से १२५ किमी की दूरी पर
  • अकोले से राज्य परिवहन बस और निजी वाहनों की सुविधा उपलब्ध
  • निजी वाहन मंदिर के परिसर तक पहुँच सकते हैं
  • परिसर में निवास व जलपान के लिए कई विकल्प उपलब्ध
Back To Home