महाराष्ट्राचा इतिहास अनेक किल्ल्यांच्या अंगाखांद्यावर लिहिला गेला आहे. ‘स्वराज्याचे सार ते किल्ले’ या उक्तीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यांची दुरुस्ती केली व नव्यानेही बांधले. या किल्ल्यांमुळे स्वराज्याचा विस्तार झाला. त्यांच्या भिंतींनी कित्येक मोहिमांची नियोजने, लढाया व राजवटीही पाहिल्या. यापैकी काही किल्ले विशिष्ट घटनांसाठी ओळखले जातात. तानाजी मालुसरे यांचे बलिदान म्हटले की सिंहगड आठवतो, अफजलखान वधासाठी प्रतापगड, मुरारबाजींच्या पराक्रमासाठी पुरंदर, त्याचप्रमाणे एक दुर्दैवी आणि कठोर प्रसंग एका किल्ल्याने पाहिला तो किल्ला म्हणजे बहादूरगड! या किल्ल्यावर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला होता.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे भीमा नदीच्या काठावर बहादूरगड किल्ला आहे.
गावाच्या नावावरून त्याला ‘पेडगावचा किल्ला‘ असेही म्हटले जाते. छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने संगमेश्वर येथे पकडून या किल्ल्यात आणले होते. या ठिकाणी त्याने राजांचे प्रचंड हाल करून त्यांचे डोळे काढले व जीभ छाटली होती. तरीही राजांनी स्वाभिमान सोडला नाही. स्वराज्य अबाधित राखण्यासाठीचे राजांचे हे योगदान बहादूरगडाने अनुभवले आहे. राजांच्या या स्मृती जागविण्यासाठी अनेक शंभूप्रेमी या किल्ल्याला ‘धर्मवीरगड‘ असे संबोधतात.
बहादूरगड किल्ल्याची तटबंदी भीमा नदीला समांतर आहे. सध्या ती अनेक ठिकाणी ढासळली असली तरी या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील उत्कृष्ट स्थापत्य रचनेची सुरेख मंदिरे. या किल्ल्यावर लक्ष्मीनारायण, बालेश्वर, रामेश्वर आणि मल्लिकार्जुन अशी ४ प्राचीन मंदिरे आहेत. इतिहास संशोधकांच्या मते ही मंदिरे ५ व्या शतकातील चालुक्य शैलीतील असल्याने या राजवटीतील वास्तुस्थापत्याचा पगडा मंदिरांच्या बांधकामात दिसतो. यापैकी लक्ष्मीनारायण व बालेश्वर ही मंदिरे पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असून त्यांचे सौंदर्य जपण्याचे कार्य सध्या सरकारी पातळीवर सुरू आहे.
यातील लक्ष्मीनारायणाचे मंदिर त्यावरील शेकडो वैशिष्ट्यपूर्ण शिल्पांमुळे विशेष प्रसिद्ध आहे. या मंदिराला ‘चित्रमंदिर’ असे संबोधले जाते. मंदिराचे वेगळेपण म्हणजे त्याच्या अष्टदिशांवर त्या त्या दिशांच्या देवता कोरलेल्या आहेत. त्यानुसार पूर्वेस इंद्र, आग्नेयेस अग्नी, दक्षिणेस यम, नैऋत्येस निऋती, पश्चिमेला वरुण, वायव्येला वायू, उत्तरेला कुबेर आणि ईशान्य दिशेला ईशान या मूर्ती येथे आहेत. याशिवाय मंदिराच्या बाह्यभागावर नरसिंह अवतार, श्रीविष्णू, जटाधारी शंकर, बासरी वाजविणारा श्रीकृष्ण व राधा आणि सूर्यदेवता यांच्या मूर्ती आहेत. पारनेर तालुक्यातील पळशी येथील प्राचीन विठ्ठल मंदिरातही अशा प्रकारची सूर्यदेवतेची मूर्ती आहे. सूर्यदेवतेची अशी मूर्ती दुर्मिळ समजली जाते; परंतु अहिल्यानगर जिल्ह्यातील या दोन मंदिरांवर या मूर्ती पाहायला मिळतात.
लक्ष्मीनारायण मंदिराच्या अग्नेय दिशेला इंद्रदेव, वराह अवतार अशी शिल्पे आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी सूरसुंदरी कोरल्या आहेत. त्यामध्ये वादक व शृंगार करीत असलेल्या सूरसुंदरीची शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मंदिराच्या सर्वात खालच्या स्तरावर हत्ती (गजस्तर) व त्याच्या वरील भागात घोडे (अश्वस्तर) कोरलेले आहेत. या स्तराजवळ वाली आणि सुग्रीव यांची संपूर्ण मंदिराभोवती एका रेषेत गोलाकार पद्धतीने चित्रलिपी चितारली आहे.
पश्चिमाभिमुख असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी पश्चिम, उत्तर आणि दक्षिणेकडे प्रवेशद्वारे आहेत. हवा खेळती राहावी व मंदिरात प्रकाश येण्यासाठी सभामंडपातील भिंतींना अखंड दगडात कोरलेली नक्षीदार जाळी लावलेली आहे. या जाळीमुळे ऐन उन्हाळ्यातही मंदिरात थंडावा जाणवतो. अशा प्रकारे दगडात कोरलेली जाळी अभावानेच पाहायला मिळते. सभामंडपातील प्रत्येक खांबावर खालपासून वरपर्यंत विविध शिल्पे कोरलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक खांब दुर्मिळ कलाकुसरीचा नमुनाच भासतो. या खांबांच्या वरील बाजूस भारवाहक यक्ष कोरलेले आहेत. मंदिराच्या वितानावर (छत) चोचीत कमळ घेतलेल्या पक्ष्यांची अखंड माळ कोरलेली आहे. ही शिल्पकृती वैशिष्ट्यपूर्ण भासते.
सभामंडपातून गर्भगृहाकडे जाताना अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सनईवादक, ढोल वादक, सूरसुंदरी, पशू–पक्षी व वेलींची नक्षी कोरलेली आहे. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस गणेशपट्टी आहे. येथील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या प्रवेशद्वाराच्या खालील बाजूस जमिनीवर चक्क दगडी रांगोळी कोरलेली आहे. येथील गर्भगृह मोकळाच असून तेथे कोणतीही मूर्ती नाही.
दरवर्षी २१, २२ व २३ जून रोजी सूर्याची किरणे थेट या गाभाऱ्यात पडतात. हा किरणोत्सव पाहण्यासाठी अनेक भाविक व पर्यटक या ‘शिल्पमंदिरा’त येतात. गेल्या काही वर्षांपासून दिवाळीनिमित्त येथे भव्य दीपोत्सव साजरा करण्यात येतो. शिवदुर्ग संवर्धन व टीम धर्मवीरगड यांनी हा सोहळा सुरू केला आहे.
या किल्ल्यातील दुसरे प्रसिद्ध मंदिर म्हणजे बालेश्वर. लक्ष्मीनारायण मंदिराच्या समोर असलेले बालेश्वराचे मंदिरही उत्तम वास्तुशैलीचा नमुना आहे. सभामंडप, अंतराळ आणि गाभारा अशी रचना असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात मध्यभागी वर्तुळाकार दगड आहे. त्याला ‘नृत्यशिला’ असे म्हणतात. नृत्य करण्याकरिता या शिळेचा वापर पूर्वी कलाकार करीत असत. लक्ष्मीनारायण मंदिराप्रमाणेच येथील अंतराळातही दगडी रांगोळी कोरलेली दिसते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सूरसुंदरी, वादक, पशू–पक्षी यांची शिल्पे आहेत. येथील गाभाऱ्यात भलेमोठे दगडी शिवलिंग आहे. याशिवाय येथील रामेश्वर व मल्लिकार्जुन या प्राचीन मंदिरांची रचनाही काहीअंशी या दोन मंदिरांप्रमाणेच आहे.
महाराष्ट्र का इतिहास अनेक किलों से जुड़ा है। स्वराज्य की रक्षा के लिए छत्रपति शिवाजी महाराज ने कई किलों की मरम्मत करवाई। उन्होंने अनेक नए किले भी बनवाए। इन किलों के कारण स्वराज्य का विस्तार हुआ। इनकी दीवारों ने कई अभियानों की योजना, युद्ध और शासन देखा है। इनमें कुछ किले विशेष घटनाओं के लिए पहचाने जाते हैं। जैसे तानाजी मालुसरे के बलिदान के लिए सिंहगढ़, अफज़लखान वध के लिए प्रतापगढ़ और मुरारबाजी की वीरता के लिए पुरंदर। उसी प्रकार बहादुरगढ़ किला एक हृदयविदारक प्रसंग का साक्षी रहा है। इसी किले पर औरंगज़ेब ने छत्रपति संभाजी महाराज पर अमानवीय अत्याचार किए थे।
अहिल्यानगर जिले की श्रीगोंदा तहसील के पेडगांव में भीमा नदी के तट पर बहादुरगढ़ किला स्थित है। गाँव के नाम पर इसे ‘पेडगांव का किला’ भी कहा जाता है। औरंगज़ेब ने छत्रपति संभाजी महाराज को संगमेश्वर से बंदी बनाकर इसी किले में लाया था। यहाँ उसने महाराज पर अत्यंत क्रूरता की। उनकी आँखें निकाल ली गईं और जिह्वा काट दी गई। फिर भी उन्होंने अपना आत्मसम्मान नहीं त्यागा।
स्वराज्य को अक्षुण्ण रखने के लिए दिया गया उनका यह बलिदान बहादुरगढ़ ने स्वयं देखा है। इसी कारण संभाजी महाराज के भक्त इस किले को ‘धर्मवीरगढ़’ कहकर संबोधित करते हैं।
भीमा नदी के समानांतर बनी बहादुरगढ़ की किलेबंदी आज कई स्थानों पर क्षतिग्रस्त हो चुकी है। फिर भी इस किले की विशेषता यहाँ के मनोहर और उत्कृष्ट स्थापत्य के मंदिर हैं। इस किले में लक्ष्मीनारायण, बालेश्वर, रामेश्वर और मल्लिकार्जुन नामक चार प्राचीन मंदिर हैं। इतिहासकारों के अनुसार ये मंदिर पाँचवीं शताब्दी की चालुक्य शैली के हैं। इससे स्पष्ट होता है कि इन मंदिरों के निर्माण में उस काल की वास्तुकला का प्रभाव है। इनमें से लक्ष्मीनारायण और बालेश्वर मंदिर पुरातत्व विभाग के अधीन हैं। इनका संरक्षण कार्य सरकारी स्तर पर जारी है।
लक्ष्मीनारायण मंदिर अपनी मनोहर शिल्पकला के कारण ‘चित्रमंदिर’ के नाम से जाना जाता है। इसकी विशेषता है कि अष्टदिशाओं में उन दिशाओं के देवताओं की पाषाण मूर्तियाँ खुदी हुई हैं। जैसे पूर्व में इंद्र, आग्नेय में अग्नि, दक्षिण में यम, नैऋत्य में निऋति, पश्चिम में वरुण, वायव्य में वायु, उत्तर में कुबेर और ईशान में ईशान देवता की पाषाण मूर्तियाँ हैं। मंदिर के बाहरी भाग में नरसिंह अवतार, श्रीविष्णु, जटाधारी शंकर, बाँसुरी बजाते श्रीकृष्ण और राधा तथा सूर्यदेव की भी पाषाण मूर्तियाँ हैं। पारनेर तहसील के पळशी गाँव के प्राचीन विठ्ठल मंदिर में भी ऐसी दुर्लभ सूर्यदेव की पाषाण मूर्ति है। ऐसी पाषाण मूर्तियाँ बहुत कम देखने को मिलती हैं। अहिल्यानगर जिले के इन दो मंदिरों में ये स्पष्ट दिखाई देते हैं।
लक्ष्मीनारायण मंदिर की आग्नेय दिशा में इंद्रदेव और वराह अवतार की पाषाण मूर्तियाँ हैं। इसके अतिरिक्त मंदिर की दीवारों पर कई सुरसुंदरियाँ उकेरी गई हैं। इनमें वाद्य यंत्र बजाती और श्रृंगार करती पाषाण मूर्तियाँ विशेष रूप से आकर्षक हैं। मंदिर के निचले स्तर पर गजस्तर और उसके ऊपर अश्वस्तर को दर्शाया गया है। इस स्तर के पास वाली और सुग्रीव की चित्रलिपि एक रेखा में वृत्ताकार रूप से मंदिर के चारों ओर चित्रित है।
पश्चिमाभिमुख लक्ष्मीनारायण मंदिर का विन्यास सभामंडप, अंतराल और गर्भगृह से बना है। मंदिर में पश्चिम, उत्तर और दक्षिण दिशा में प्रवेशद्वार हैं। सभामंडप की दीवारों पर मनोहर पत्थर की जाली बनाई गई है। इससे हवा और रोशनी का संचार बना रहता है। इस विशेष जाली के कारण ग्रीष्मकाल में भी मंदिर के भीतर शीतलता का अनुभव होता है। पत्थर की ऐसी नक्काशीदार जाली मिलना दुर्लभ है। सभामंडप के प्रत्येक स्तंभ पर नीचे से ऊपर तक विविध शिल्पकारी की गई है। इससे हर स्तंभ स्वयं में अद्वितीय कला का उदाहरण बन गया है। इन स्तंभों के ऊपर भारवाहक यक्ष की आकृतियाँ हैं। मंदिर की छत पर कमल लिए पक्षियों की मालाएँ उकेरी गई हैं, जो दर्शनीय हैं।
सभामंडप से गर्भगृह की ओर जाने वाले अंतराल में सनईवादक, ढोलवादक, सुरसुंदरी, पशु-पक्षी और लताओं की नक्काशी है। गर्भगृह के प्रवेशद्वार के ऊपर गणेशपट्टी है। नीचे की ओर पत्थर पर रंगोली उत्कीर्ण है, जो इस मंदिर की एक विशेषता है। गर्भगृह इस समय रिक्त है। वहाँ कोई पाषाण मूर्ति नहीं है।
प्रत्येक वर्ष २१, २२ और २३ जून को सूर्य की किरणें सीधे इस गर्भगृह में प्रवेश करती हैं। इस सूर्य-किरण महोत्सव को देखने के लिए श्रद्धालु और पर्यटक बड़ी संख्या में इस शिल्पमंदिर में आते हैं। बीते कुछ वर्षों से दीपावली के अवसर पर यहाँ भव्य दीपोत्सव मनाया जाता है। इसकी शुरुआत शिवदुर्ग संवर्धन और टीम धर्मवीरगढ़ ने की थी।
इस किले का दूसरा प्रसिद्ध मंदिर बालेश्वर मंदिर है। लक्ष्मीनारायण मंदिर के सम्मुख स्थित यह मंदिर भी उत्कृष्ट वास्तुकला का नमूना है। इसका विन्यास भी सभामंडप, अंतराल और गर्भगृह के समान ही है। इसके सभामंडप के बीच में एक वृत्ताकार पत्थर है, जिसे ‘नृत्यशिला’ कहा जाता है। प्राचीन काल में कलाकार इसी पर नृत्य करते थे। इस मंदिर के अंतराल में भी लक्ष्मीनारायण मंदिर की तरह पत्थर की रंगोली दिखाई देती है। गर्भगृह के द्वार पर सुरसुंदरी, वादक और पशु-पक्षियों की पाषाण मूर्तियाँ हैं। गर्भगृह में विशाल पाषाण शिवलिंग है।इसी प्रकार रामेश्वर और मल्लिकार्जुन के प्राचीन मंदिरों की संरचना भी इन दोनों मंदिरों के समान है।