हरिहरेश्वर मंदिर 

तोंडोळी, ता. पाथर्डी, अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील निसर्गसमृद्ध तोंडोळी गावात असलेले प्राचीन हरिहरेश्वर मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. असे सांगितले जाते की श्रीविष्णू महादेव यांची या ठिकाणी भेट झाली होती येथून ते दोघे कैलास पर्वतावर गेले. त्यामुळे हे मंदिरहरिहरेश्वर कैलास गमन मंदिरम्हणून ओळखले जाते. येथील गाभाऱ्यामध्ये असलेल्या पिंडीवर दोन लिंग असून ते महादेव श्रीविष्णूंचे प्रतीक समजले जातात.

मंदिराची आख्यायिका अशी की भस्मासुर नावाच्या राक्षसाने घोर तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न करून घेतले. ‘मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म होईलअसा वर त्याने मागून घेतला. महादेवांनीतथास्तुम्हटल्यावर त्या वराचा खरेपणा तपासण्यासाठी त्याने महादेवांच्याच डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महादेवांनी दंडकारण्याचा भाग असलेल्या या तोंडोळी भागात धाव घेतली. त्यावेळी पार्वतीने भस्मासुरापासून महादेवांचे रक्षण करण्याची विनंती श्रीविष्णूंकडे केली. महादेवांवर आलेले संकट निवारण्यासाठी श्रीविष्णूंनी मोहिनी (सुंदर स्त्री) रूप धारण करून भस्मासुराला मोहित केले त्याच्यासोबत नृत्य करू लागले. भस्मासुर नृत्यात मग्न झाल्याने श्रीविष्णू ज्या प्रकारे नृत्य करीत होते त्याप्रमाणे तोही करीत होता. तो पूर्ण मोहित झाला आहे, हे पाहून विष्णूरूपी मोहिनीने स्वत:च्या डोक्यावर हात ठेवला. भस्मासुरानेही तिचे अनुकरण करून नृत्य करताना क्षणाचाही विलंब करता स्वत:च्या डोक्यावर हात ठेवला. डोक्यावर हात ठेवताच भस्मासुराचे जागीच भस्म झाले. त्यानंतर महादेव आणि श्रीविष्णू तोंडोळी येथील या स्थानावर काही काळ थांबले येथून त्यांनी कैलास गमन केले, तेव्हापासून हे स्थान हरिहरेश्वर कैलास गमन मंदिर, असे ओळखले जाऊ लागले. ‘शिवलिलामृतग्रंथाच्या १२व्या अध्यायात या स्थानाचा उल्लेख आहे. त्यानुसार या मंदिर परिसरात प्राचीन काळापासून अनेक ऋषीमुनी तपश्चर्या करीत असत

तोंडोळी गावापासून जवळ डोंगराच्या पायथ्याशी एका तलावाकाठी शांत निसर्गसमृद्ध परिसरात हे प्राचीन देवस्थान आहे. मंदिराच्या प्रांगणात अनेक प्राचीन वृक्ष असून तेथे शनिदेव, विठ्ठलरुक्मिणी, गणपती यांची मंदिरे आहेत. या मंदिरांचे बांधकाम पूर्णपणे दगडांत आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नंदी असून त्यामागे फुटी चौथऱ्यावर काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनारूढ शिल्प बसविण्यात आले आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला प्राचीन गणेशमूर्ती आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराची रचना सभामंडप गर्भगृह अशी आहे. सभामंडपात अनेक दगडी खांब असून त्यावर विशेष नक्षीकाम दिसत नाही. येथील गर्भगृह वैशिष्ट्यपूर्ण असून ते सभामंडपाहून मोठे आहे. या गर्भगृहातही दगडी खांब असून त्यांच्यामध्ये मोठी पिंडी आहे. या पिंडीवर लिंग असून ते महादेव विष्णूंचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते. महादेवांच्या प्राचीन मंदिरांमध्ये गर्भृहात सहसा खांब दिसत नाहीत

श्रावणातील दुसर्‍या सोमवारी येथे यात्रा भरते. महाशिवरात्रीच्या दिवशीही येथे हजारो भाविक हरिहरेश्वराच्या दर्शनासाठी येतात. या दिवशी सकाळपासून भजन, कीर्तन असे विविध धार्मिक विधी येथे होतात. मंदिरात सकाळी वाजल्यापासून रात्री पर्यंत भाविकांना दर्शन घेता येते. दररोज सकाळी वाजता आरती होते. महाशिवरात्री आणि श्रावणातील दुसऱ्या सोमवारी येथे महाआरती होते.

उपयुक्त माहिती:

  • पाथर्डीपासून २३ किमी तर, अहमदनगरपासून ७४ किमी अंतरावर आहे.
  • पाथर्डीपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home