बायजाबाई मंदिर

जेऊर, ता. / जि. अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातील गर्भगिरी डोंगररांगेला मोठी धार्मिक परंपरा लाभलेली आहे. राज्यातील महत्त्वाच्या देवस्थानांपैकी असलेले मोहटादेवी देवस्थान या डोंगररांगेत विराजमान आहे. नाथ संप्रदायाचा उदय याच पट्टयात झाल्याचे सांगितले जाते. राष्ट्रसंत तनपुरे महाराज, भगवानबाबा, भृंगऋषी, वामनभाऊ, गव्हाणेबाबा, खंडुजीबाबा आदींच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी आहे. अशा या पवित्र भूमीत अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर या गावी डोंगर कड्यावर असलेले बायजाबाईचे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर जेऊरचे आराध्य दैवत मानले जाते.

पूर्वीच्या काळात अनेक ऋषीमुनींचे गर्भगिरी डोंगरावर वास्तव्य होते. एका आख्यायिकेनुसार गोरक्षनाथांनी हा डोंगर सोन्याचा केला होता. आता मात्र हा डोंगर सोन्याचा नसला तरी येथील बायजाबाई मंदिर पायापासून कळसापर्यंत सोनेरी रंगात आहे. त्यामुळे डोंगरकड्यावरील हे मंदिर किमीच्या परिघातून सहज दिसते. बायजाबाई ही अन्नपूर्णा देवी म्हणूनही प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की या देवीने भुकेलेल्यांना अन्न दिले म्हणून गावालाजेऊरनाव पडले. आजही गावातून जाणाऱ्या शेकडो पालख्यांना गावकरी जेवायला देतात. ‘नवसाला पावणारीअशी देवीची ख्याती असल्यामुळे दररोज देवीच्या दर्शनाला शेकडो भाविक येत असतात.

मंदिराची आख्यायिका अशी की बायजाबाई नावाची एक मुलगी लग्न झाल्यावर सासरी नांदायला आली. एके दिवशी सासऱ्याला शेतावर जेवण घेऊन जात असताना तिला वाटेत काही सैनिक भेटले. या भुकेलेल्या सैनिकांनी बायजाबाईकडे जेवण देण्याची विनंती केली. सैनिकांच्या विनंतीवरून बायजाबाईने त्यांना आपल्याकडील भाजीभाकरी दिली. सैनिकांच्या घोड्यांनाही तिने वैरण दिले. सगळे सैनिक मनसोक्त जेवूनही तिच्याकडील जेवण तसेच शिल्लक होते. (जेवून उरले म्हणून गावाचे नाव जेऊर पडले) इकडे सूनबाई जेवण घेऊन आल्याने सासऱ्यांनी तिची शोधाशोध सुरू केली. घडलेला प्रकार सासऱ्यांना समजला तर ते रागावतील, या कल्पनेने घाबरलेल्या बायजाबाईने डोंगरावर आश्रय घेतलातिला शोधत जेव्हा सासरे डोंगरावर आले तेव्हा ती दगडात लुप्त झाली. त्यानंतर काही वर्षांनी बायजाबाईने गावकऱ्यांना दृष्टांत देऊन डोंगरावरील दगडांमध्ये असलेल्या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना करण्यास सांगितले. त्यानंतर गावकऱ्यांनी बायजाबाईचे गर्भगिरीच्या डोंगरावर मंदिर बांधले.

अहिल्यानगर जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर येथे जाताना वाटेत जेऊर गाव लागते. निसर्गाच्या सानिध्यात उंच डोंगरावर उभारलेल्या बायजाबाई मंदिरापर्यंत जाण्यासाठी आता रस्ता आहे. त्यामुळे वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत थेट जाऊ शकतात. याशिवाय पायथ्यापासून पूर्वीचा पायरी मार्गही अस्तित्वात आहे. डोंगरावरील एका लहानशा पठारावर हे मंदिर स्थित आहे.

काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे. मंदिरावरील वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकामामुळे त्याचे सौंदर्य खुलून. मंदिराचा कळस अंदाजे ९० फूट उंच ( मजली इमारतीच्या उंचीचे) आहे. भव्य कळसावर प्रत्येक थरावर वेगवेगळ्या शिल्पाकृती आहेत. हे शिल्पकाम आंध्र प्रदेशमधील कुशल कारागीरांनी केले आहे.

भिंती कळसावर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर असून संपूर्ण मंदिर सोनेरी रंगाने रंगविले आहे. सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडप प्रशस्त असून त्यात तीनही बाजूंना भाविकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हा सभामंडप खुल्या प्रकारातील असून त्याला सर्व बाजूंनी अर्धभिंती आहेत. सभामंडपातून गाभाऱ्यात प्रवेश करताच बायजाबाईच्या प्रसन्न मूर्तीचे दर्शन होते. संगमरवरी देव्हाऱ्यात बायजाबाईची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. देवीवर चांदीचा मुखवटा असून साजशृंगाराने तिला सजवलेले असते.

वैशाख पौर्णिमेला येथे भरणारी यात्रा प्रसिद्ध आहे. दिवस चालणाऱ्या या यात्रेत दिवस कुस्ती स्पर्धा असतात. यावेळी राज्यातून अनेक नामांकित मल्ल त्यात सहभागी होतात. यात्रेसाठी आलेल्या भाविकांना ग्रामस्थांकडून वांगीभाकरीचा महाप्रसाद दिला जातो. तिसऱ्या दिवशी प्रवरासंगम येथील पाणी आणून देवीला अभिषेक केला जातो. दुपारी पुरणपोळीचा नैवेद्य आणि महाआरती होते. संध्याकाळी बायजाबाईच्या मुखवट्याची पालखीतून मिरवणूक (छबिना) काढली जाते.

उपयुक्त माहिती:

  • अहिल्यानगरपासून १७ किलोमीटर अंतरावर 
  • अहिल्यानगरपासून संभाजीनगरकडे जाणाऱ्या एसटीला जेऊरला थांबा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही 

बायजाबाई मंदिर

जेऊर, तह. / जि. अहिल्यानगर

अहिल्यानगर जिले में गर्भगिरि पर्वत श्रृंखला की एक महान धार्मिक परंपरा है। राज्य के महत्वपूर्ण मंदिरों में से एक मोहटादेवी मंदिर इसी पर्वत श्रृंखला में स्थित है। कहा जाता है कि नाथ संप्रदाय का उदय इसी क्षेत्र में हुआ था। यह भूमि राष्ट्रीय संत तनपुरे महाराज, भगवान बाबा, भृंग ऋषि, वामनभाऊ, गव्हानेबाबा, खंडूजी बाबा आदि के चरण स्पर्श एवं निवास से पवित्र हुई है। ऐसी पवित्र भूमि में अहिल्यानगर तहसील के जेऊर गाँव में पर्वत श्रृंखला पर स्थित बायजाबाई मंदिर प्रसिद्ध है। इस मंदिर को जेऊर की आराध्य देवी माना जाता है।

पूर्व में गर्भगिरि पर्वत पर अनेक ऋषि-मुनि निवास करते थे। एक पौराणिक कथा के अनुसार गोरक्षनाथ ने इस पर्वत को स्वर्णमय बना दिया था। अब हालाँकि यह पर्वत स्वर्णमय नहीं है, लेकिन यहाँ स्थित बायजाबाई मंदिर नीचे से लेकर ऊपर तक स्वर्णमय है। इसलिए पर्वत पर स्थित यह मंदिर 5-7 कि.मी. की परिधि से आसानी से दिखाई देता है।

बायजाबाई अन्नपूर्णा देवी के नाम से भी प्रसिद्ध हैं। कहा जाता है कि इस देवी ने भूखे लोगों को भोजन कराया, इस कारण ही इस गाँव का नाम ‘जेऊर’ पड़ा। आज भी गाँव के लोग गाँव से गुजरने वाली सैकड़ों पालकियों को भोजन कराते हैं। चूँकि देवी को मनोकामना पूर्ण करने वाली माता के रूप जाना जाता है, इसलिए प्रतिदिन सैकड़ों श्रद्धालु देवी के दर्शन के लिए आते हैं।

मंदिर की जनश्रुति है कि बायजाबाई नाम की एक लड़की विवाह के बाद अपने ससुराल आई। एक दिन जब वह खेत में अपने ससुर के लिए भोजन लेकर जा रही थी, तो रास्ते में उसे कुछ सैनिक मिले। इन भूखे सैनिकों ने बायजाबाई से भोजन देने का अनुरोध किया। सैनिकों के अनुरोध पर बायजाबाई ने उन्हें अपने पास से सब्जी और रोटी दी। उसने सैनिकों के घोड़ों को भी खिलाया। सभी सैनिकों के जी भरकर खाने के बाद भी उसका भोजन बच जाता था। (मराठी में भोजन बच जाने को ‘जेवण उरले’ कहा जाता है। इन दो शब्दों को मिलाकर ही ‘जेऊर’ शब्द बना और इसी नाम से गाँव को जाना जाता है।) जब बहू यहाँ भोजन लेकर नहीं आई, तो उसके ससुर ढूँढ़ने लगे। भोजन लाने में देरी के कारण ससुराल वाले नाराज़ हो जाएँगे, इस डर से बायजाबाई पहाड़ में छुप गई। जब उसके ससुराल वाले उसे ढूँढ़ते हुए पहाड़ पर आए, तो वह पाषाणों में अदृश्य हो गई। कुछ साल बाद बायजाबाई ने गाँव वालों को दर्शन दिए और पहाड़ पर पाषाणों में एक मंदिर में मूर्ति स्थापित करने को कहा। उसके बाद गाँव वालों ने गर्भगिरी पहाड़ पर बायजाबाई का मंदिर बनवाया।

अहिल्यानगर जिले से छत्रपति संभाजीनगर जाते समय जेऊर गाँव पड़ता है। प्रकृति के बीच ऊँचे पहाड़ पर बने बायजाबाई मंदिर तक पहुँचने के लिए अब सड़क बन गई है। इसलिए, वाहन सीधे मंदिर की पार्किंग में जा सकते हैं। इसके अलावा, तलहटी से पुराना पैदल रास्ता भी है। यह मंदिर पहाड़ पर एक छोटे से पठार पर स्थित है।

कुछ सालों पहले किए गए जीर्णोद्धार के बाद, मंदिर ने अपना वर्तमान स्वरूप ले लिया है। मंदिर पर की गई अनूठी नक्काशी से इसकी खूबसूरती का पता चलता है। मंदिर का शिखर लगभग 90 पद ऊँचा है। भव्य शिखर की प्रत्येक परत पर अलग-अलग मूर्तियाँ हैं। यह मूर्तियाँ आंध्र प्रदेश के कुशल कारीगरों द्वारा बनाई गई हैं। दीवारों और छत को अनूठी कलाकृति से सजाया गया है और पूरे मंदिर को सुनहरे रंग में रंगा गया है। मंदिर एक सभामंडप और एक गर्भगृह से बना है। सभामंडप विशाल है और तीनों ओर श्रद्धालुओं के बैठने की व्यवस्था है। यह सभामंडप खुला है और चारों ओर आधी दीवारें हैं। सभामंडप से गर्भगृह में प्रवेश करते ही बायजाबाई की मनोहर मूर्ति दिखाई देती है। बायजाबाई की मूर्ति संगमरमर के गर्भगृह में स्थापित है। देवी का मुखौटा चांदी का है और उन्हें आभूषणों से सजाया गया है। वैशाख पूर्णिमा पर यहाँ होने वाला मेला प्रसिद्ध है। 3 दिनों तक चलने वाले इस मेले में 2 दिनों तक कुश्ती प्रतियोगिताएँ होती हैं। इस दौरान राज्य के कई प्रसिद्ध पहलवान इसमें भाग लेते हैं। मेले के लिए आने वाले श्रद्धालुओं को ग्रामीणों द्वारा बैंगन की सब्जी और रोटी का महाप्रसाद दिया जाता है। तीसरे दिन प्रवरासंगम से जल लाया जाता है और देवी का अभिषेक किया जाता है। दोपहर में पूरणपोली का भोग और महाआरती की जाती है। शाम को बायजाबाई के मुखौटे को पालकी में रखकर एक जुलूस निकाला जाता है।

प्रमुख विशेषताएँ

  • अहिल्यानगर से 17 कि.मी.
  • अहिल्यानगर से संभाजीनगर जाने वाली राज्य परिवहन बस का जेऊर में ठहराव है
  • निजी वाहन मंदिर की पार्किंग तक जा सकते हैं
  • परिसर में कोई आवास और जलपान की सुविधा नहीं है
Back To Home