
अहिल्यानगरजवळील भिंगार येथील प्राचीन शुक्लेश्वर मंदिर हे काशी विश्वेश्वराचे प्रतिरूप म्हणून ओळखले जाते. येथील शिवलिंग वालुकामय व स्वयंभू असून शिवलिंगाच्या बाजूने सतत पाणी वाहत असते. असे सांगितले जाते की गर्भगिरी डोंगरावर मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ वास्तव्याला असताना ते या शुक्लेश्वराच्या दर्शनाला येत असत. जे भाविक शुक्लेश्वराचे दर्शन घेतात त्यांचा वंश अखंडित राहतो, अशी या देवस्थानाबद्दल श्रद्धा आहे. ‘सूर्यपुराण’ व ‘काशिखंडात’ या स्थानाचा उल्लेख आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की ऋषी शुक्राचार्य यांनी या परिसरात तपश्चर्या करून काशी विश्वेश्वराला प्रसन्न केले व येथे वास्तव्य करण्याची विनंती केली. महादेवांनी ‘तथास्तु’ म्हणत भिंगार परिसरात वास्तव्य करण्याचे मान्य केले. त्यानंतर येथे स्वयंभू वालुकामय शिवपिंडी प्रकट झाली. तेव्हापासून हे स्थान ‘शुक्लेश्वर’ म्हणून प्रसिद्ध आहे. नवनाथांच्याही पूर्वीचे हे स्थान आहे. रामायण काळात भृगू ऋषींचे वास्तव्य लाभलेल्या भिंगारचे ‘भृगपूर’ असे नाव होते. शुक्लेश्वर महादेवाचे हे मंदिर गर्भगिरी डोंगररांगांतील नाथपंथीय शिवालय मानले जाते.
भिंगार येथील सिना नदीच्या तीरावर असलेल्या शुक्लेश्वर मंदिराचे बांधकाम आठव्या ते नवव्या शतकातील असावे. औदुंबर, पिंपळ, चिंच अशा वृक्षराजींमध्ये असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पूर्व व उत्तरेकडे २ प्रवेशद्वारे आहेत. नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या वास्तूची रचना आहे. पूर्वेकडील प्रवेशद्वाराशेजारी नंदीमंडप आहे. ही नंदीची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून नंदीच्या आयाळीत नारदाची वीणाधारी उभी मूर्ती आहे. नंदी व नारद या मूर्तींवर सुबक कोरीवकाम असून त्या एकाच दगडामधून तयार केलेल्या दिसतात. नंदीच्या कपाळावर श्रीयंत्र, गळ्यात घुंगरमाळ आणि पाठीवर दोरांच्या गाठींचे नक्षीदार वळण व घंटांची माळ कोरलेली आहे.
नंदी मंडपापुढे सभामंडप आहे. तेथून गाभाऱ्याकडे जाताना एका कमानीच्या
मध्यभागी असलेल्या कोनाड्यात साधूंची ध्यानाची जागा असल्याचे सांगितले जाते. आतमध्ये ४ फूट उंच आणि २० फूट बाय १० फुटांची ती खोली आहे. सभामंडपातून ५ पायऱ्या उतरल्यावर अंतराळात प्रवेश होतो. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर गणपती व दोन्ही बाजूला देवळ्या दिसतात.
येथून ६ पायऱ्या उतरून गाभाऱ्यात पोहोचल्यावर मध्यभागी वालुकामय शिवलिंग असून त्यासमोर असलेल्या भिंतीवरील कोनाड्यात हातात कमंडलू घेतलेला व आशीर्वाद देताना पार्वतीची मूर्ती आहे. तसेच पश्चिम व उत्तर बाजूच्या भिंतीत प्रत्येकी २ अशा ४ देवळ्या दगडामध्ये कोरलेल्या आहेत, जमिनीपासून सुमारे १५ फूट खाली असलेल्या या गाभाऱ्यात दररोज सकाळी व सायंकाळी सूर्यकिरणे पडतात. शाळुंका व पिंड यामध्ये पूर्व दिशेला अर्धवर्तुळाकार फट असून ती बरीच खोल असल्याचे सांगितले जाते. या फटीतून पाणी पाझरत असल्याने ती नेहमी भरलेली दिसते. पावसाळ्यात पार्वती मातेच्या पायास पाणी स्पर्श करते. त्यावेळी अनेक दिवस शिवपिंडी पाण्याखाली असते.
मंदिराजवळ पुरातन चौकोनी बारव असून तिच्यामध्ये असणारे ७ निमुळते कुंड उलट्या पिरॅमिडसारखे भासतात. मंदिराचे मुख्य शिखर १५ फूट उंचीचे असून त्याभोवती ४ मिनार आहेत. या शिखरावर विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शुक्लेश्वर मंदिराच्या परिसरात अनेक साधकांच्या समाध्या आहेत.
श्रावणातील तिसऱ्या सोमवारी प्रवरासंगम येथून कावडीने आणलेल्या पाण्याने शुक्लेश्वराला अभिषेक करण्यात येतो. या कावड यात्रेत शेकडो भाविक सहभागी होतात. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला येथे महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. दर महाशिवरात्रीला हरिनाम सप्ताह व महारुद्राभिषेक करण्यात येतो. दररोज शुक्लेश्वराच्या मंगलस्नानानंतर ५.३० वाजता व सायंकाळी ७ वाजता आरती होते. पहाटे ४ वाजल्यापासून रात्री १० पर्यंत मंदिरात जाऊन शुक्लेश्वराचे दर्शन घेता येते.

अहिल्यानगर के निकट भिंगार में स्थित प्राचीन शुक्लेश्वर मंदिर को काशी विश्वेश्वर की प्रतिकृति के रूप में जाना जाता है। यहाँ का शिवलिंग रेतीला और स्वयंभू है, तथा शिवलिंग के साथ-साथ निरंतर जल बहता रहता है। कहा जाता है कि मत्स्येंद्रनाथ और गोरक्षनाथ जब गर्भगिरी पर्वत पर रहते थे, तब इसी शुक्लेश्वर में आते थे। ऐसा माना जाता है कि शुक्लेश्वर में आने वाले श्रद्धालुओं का वंश अखंड रहता है। इस स्थान का उल्लेख ‘सूर्य पुराण’ और ‘काशीखंड’ में मिलता है।
मंदिर की जनश्रुति है कि ऋषि शुक्राचार्य ने इस क्षेत्र में तपस्या करके काशी विश्वेश्वर को प्रसन्न किया था और उनसे यहाँ निवास करने का अनुरोध किया था। भगवान शिव ने ‘तथास्तु’ कहकर भिंगार क्षेत्र में निवास करने के लिए सहमति जताई थी। उसके बाद यहाँ स्वयंभू रेतीली शिवपिंड प्रकट हुई थी। तभी से यह स्थान ‘शुक्लेश्वर’ के नाम से प्रसिद्ध है। यह नवनाथ का स्थान भी है। रामायण काल में भृगु ऋषि द्वारा बसाए गए भिंगार को ‘भृगपुर’ कहा जाता था। गर्भगिरी पर्वत श्रृंखला में शुक्लेश्वर महादेव का यह मंदिर नाथ पंथ का मंदिर माना जाता है।
भिंगार में सीना नदी के तट पर स्थित शुक्लेश्वर मंदिर का निर्माण आठवीं से नौवीं शताब्दी में हुआ होगा। औदुंबर, पीपल और इमली वृक्षों के बीच स्थित इस मंदिर में प्रवेश के लिए 2 प्रवेश द्वार हैं। इस भवन की संरचना में नंदीमंडप, सभामंडप, अंतराल और गर्भगृह का समावेश है। पूर्वी प्रवेश द्वार के बगल में एक नंदीमंडप है। यह नंदी मूर्ति अद्वितीय है और नंदी के बीच में वीणा पकड़े नारद की खड़ी मूर्ति है। नंदी और नारद की मूर्तियों में मनोहर नक्काशी है और वे एक ही पाषाण से बनी हुई प्रतीत होती हैं। नंदी के माथे पर श्रीयंत्र, गले में घुँघरू की माला और पीठ पर रस्सियों की गाँठों का जटिल घेरा और घंटियों की माला है। नंदी मंडप के सम्मुख सभामंडप है। वहाँ गर्भगृह की ओर जाते समय कहा जाता है कि एक मेहराब के बीच में एक देवकोष्टक में साधुओं के लिए ध्यान स्थल है। अंदर 4 पद ऊँचा और 20 पद गुणा 10 पद का एक कमरा है। सभामंडप से 5 सीढ़ियाँ उतरने के बाद अंतराल में प्रवेश करते हैं। गर्भगृह के प्रवेश द्वार पर गणपति दिखाई देते हैं और प्रवेश द्वार के दोनों ओर दो देवकोष्टक बने हुए हैं। यहाँ से 6 सीढ़ियाँ उतरकर गर्भगृह में पहुँचने पर बीच में रेत का शिवलिंग है और उसके
सम्मुख दीवार पर बने देवकोष्टक में हाथ में कमंडल लिए आशीर्वाद देती पार्वती की मूर्ति है। साथ ही पश्चिमी और उत्तरी दीवारों पर 2-2 पाषाण में तराशे गए 4 मंदिर हैं। जमीन से करीब 15 पद नीचे स्थित इस गर्भगृह में सुबह-शाम सूर्य की रोशनी आती है। जलाधारी और पिंड के बीच पूर्व दिशा में एक अर्धवृत्ताकार दरार है, जो बहुत गहरी बताई जाती है। चूँकि इस दरार से पानी रिसता रहता है, इसलिए यह हमेशा भरा हुआ दिखता है। मानसून के दौरान, पानी माता पार्वती के चरणों को छूता है। उस समय शिवपिंड कई दिनों तक पानी में डूबी रहती है।
मंदिर के पास एक प्राचीन चौकोर मंदिर है, जिसमें 7 शंक्वाकार तालाब हैं, जो उल्टे पिरामिड की तरह दिखते हैं। मंदिर का मुख्य शिखर 15 पद ऊँचा है और इसके चारों ओर 4 मीनारें हैं। इस शिखर पर विभिन्न देवताओं की मूर्तियाँ हैं। शुक्लेश्वर मंदिर के आसपास के क्षेत्र में साधकों की कई समाधियाँ हैं।
श्रावण के तीसरे सोमवार को प्रवरसंगम से कावड़ियों द्वारा लाए गए जल से शुक्लेश्वर का अभिषेक किया जाता है। इस कावड़ यात्रा में सैकड़ों श्रद्धालु भाग लेते हैं। हर महीने की पूर्णिमा के दिन यहाँ महाप्रसाद का कार्यक्रम होता है।
हर महाशिवरात्रि, हरिनाम सप्ताह और महारुद्राभिषेक किया जाता है। हर दिन शुक्लेश्वर के मंगलस्नान के बाद सुबह 5:30 बजे और शाम 7 बजे आरती की जाती है। आप सुबह 4 बजे से रात 10 बजे तक मंदिर में जाकर शुक्लेश्वर के दर्शन कर सकते हैं।