विठ्ठल मंदिर 

पळशी, ता. पारनेर, जि. अहमदनर

राही रखुमाबाई राणीया सकळा।
ओवाळिती राजा विठोबा सावळा।। 

संत नामदेवांनी रचलेल्या या आरतीच्या ओळींमध्ये विठ्ठलासोबत राही रुक्मिणीचा उल्लेख येतो. संपूर्ण महाराष्ट्रात राही रुक्मिणीसोबत विठ्ठलाची मूर्ती असलेली मोजकीच मंदिरे आहेत. त्यामध्ये पारनेर तालुक्यातील पळशी येथील विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहे. वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या या राहीरखुमाई विठ्ठल मंदिरामुळे या गावाचीप्रति पंढरपूरअशी ख्याती आहे

अहिल्याबाई होळकर यांचे दिवाण रामाजी कांबळेपळशीकर हे याच पळशी गावचे. असे सांगितले जाते की अहिल्याबाई होळकर या देशभरातील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी बांधकामांसाठी दानधर्म करीत असत. त्यावेळी त्याचे आर्थिक नियोजन दिवाण पळशीकर हे करीत. त्यामुळे त्यांनी आपल्या पळशी गावासाठी मोठा निधी मिळवला. या निधीतून साधारणत: १७८० ते ९० या काळात येथील विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले. यासाठी उत्तर भारतातील खास कारागिरांची त्यांनी नेमणूक केली होती

पळशी किल्ल्याच्या पूर्व दरवाजाजवळ पळशी नदीचे पात्र आहे. येथे नदीला बांध घातल्यामुळे तयार झालेल्या जलाशयाच्या एका बाजूला विठ्ठल मंदिर आणि दुसऱ्या बाजूला रामेश्वर मंदिर आहे. जलाशयाच्या पार्श्वभूमीवर ही दोन्ही मंदिरे सुंदर दिसतात. त्यापैकी येथील १८ व्या शतकातील विठ्ठल मंदिर हेशिल्पमंदिरम्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या नखशिखांत वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे असून ती पाहण्यासाठी शिल्प अभ्यासक भाविकांचा कायमच येथे राबता असतो

विठ्ठल मंदिराला तटबंदी असून त्याच्या टोकांवर बुरूज आहेत. तटबंदीच्या प्रवेशद्वाराजवळ पुष्करणी आहे. त्यातील कोष्टकांमध्ये अष्टविनायकांच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. असे सांगितले जाते की तटबंदी आणि पुष्करणी यामधून भुयारी मार्ग आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपती, जयविजय इतर मूर्ती कोरलेल्या आहेत. दरवाजाच्या वरील बाजूस नगारखाना असून या संपूर्ण बांधकामावर इस्लामी स्थापत्याचा प्रभाव जाणवतो

प्रवेशद्वारातून आत शिरण्यासाठी पायऱ्या आहेत, त्या पंचमहाभुतांचे प्रतीक मानल्या जातात. दरवाजातून आत शिरल्यावर नजरेस पडतात ती या संपूर्ण दगडी मंदिरावर पायापासून शिखरापर्यंत असलेली शेकडो वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे. ही शिल्पे पाहताना केवळ छिन्नी हातोडीने त्यांना आकार दिला असेल, यावर विश्वास बसत नाही. तटबंदीच्या आतील बाजूस ओवऱ्या असून त्यांच्या वरील भागातही कोरीवकाम आहे. ओवऱ्यांमधून तटबंदीवर जाण्यासाठी मार्ग आहेत. येथून तटबंदीवर गेल्यास मंदिराच्या कळसावरील शिल्पकारी जवळून न्याहाळता येते

खुला सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात प्रवेश करण्यासाठी मार्ग असून या मार्गात पायऱ्या आहेत. या पायऱ्या नवविद्या भक्तीची प्रतीके, तर अष्टकोनी सभामंडपात फूट उंचीचे असलेले १८ खांब हे १८ पुराणांचे प्रतीक मानले जाते. सभामंडपाच्या या खांबांवर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम असून त्यावर पुराणकथा कोरलेल्या आहेत. सभामंडपात मध्यभागी भलामोठा दगडी कासव आहे. छतावर श्रीकृष्ण गोपिकांच्या रासविहाराच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. यात उजव्या बाजूला गणपती आणि डाव्या बाजूला श्रीकृष्णाची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर दोन्ही बाजूंना रिद्धिसिद्धी सहित गणपती, भैरवमूर्तीसह ६४ योगिनी उंबऱ्यावर कीर्तिमुखे आहेत

मंदिराच्या गाभाऱ्यात काळ्या पाषाणातील विठ्ठलाची मूर्ती आहे. या मूर्तीच्या प्रभावळीमध्ये दशावतार कोरलेले आहेत. याशिवाय विठ्ठलाच्या पायाजवळ नारद, तुंबर, गंधर्व, यक्ष किन्नरांच्या मूर्ती आहेत. विठ्ठल मूर्तीच्या दोन्ही बाजूंना राहीरुक्मिणी यांच्या शुभ्र संगमरवरी मूर्ती आहेत. या मूर्ती नंतरच्या काळात बसविल्या असाव्यात असे वाटते. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्याही येथे मूर्ती आहेत. मंदिराच्या बाह्य भिंतीवर गर्भगृहातील पाणी बाहेर पडण्याच्या ठिकाणी मकरमुख बसविलेले आहे. याशिवाय मोर, हत्तीमुख, झुंजणारे हत्ती, लढाईस निघालेले सैन्य कोरलेले दिसतात. दिशांना देवकोष्टके असून त्यात कृष्णबलराम, सूर्यदेव महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती आहेत. येथील सूर्यदेवाची मूर्ती अतिशय दुर्मिळ समजली जाते. कार्तिक स्वामी, गरुडदेव हनुमंत यांचीही येथे मंदिरे आहेत.

कळसावर देवकोष्टके असून त्यात श्रीविष्णूंच्या मूर्ती आहेत. लहानलहान कळस एकमेकांत गुंफून मुख्य कळसाची रचना करण्यात आल्याचे दिसते. या मंदिराच्या तटबंदीवरून पळशीचा प्रसिद्ध भुईकोट किल्ला नजरेच्या टप्प्यात येतो

दरवर्षी आषाढी एकादशीला येथे यात्रा भरते. त्या दिवशी पहाटेपासून स्नान, अभिषेक आरती असा महापूजेचा कार्यक्रम होतो. यावेळी परिसरातील अनेक भागांतून येथे दिंड्या येतात. याच दिवशी येथून देहू येथे दिंडी काढली जाते. त्यानंतर येणाऱ्या एकादशीच्या काळात दिवसांचा सप्ताह असतो. २००१ पासून मंदिरात अखंड वीणा वादन सुरू आहे. दररोज पहाटे .३० वाजता मंदिरात काकड आरती होते. संध्याकाळी वाजता हरिपाठ आरती होते. पहाटे .३० पासून रात्री पर्यंत भाविकांना मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेता येते

उपयुक्त माहिती:

  • पारनेरपासून ३६ किमी, तर अहमदनगरपासून ६० किमी अंतरावर 
  • पारनेरपासून पळशीसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home