मल्लिकार्जुन मंदिर

घोटण, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर

शेवगाव तालुक्यातील घोटण येथे मल्लिकार्जुन हे महादेवाला समर्पित मंदिर आहे. यादवकालीन स्थापत्य कलेचा सुंदर नमुना म्हणून हे स्थान प्रसिद्ध आहे. मंदिराचे वैशिष्ट्य असे की येथील गाभारा हा सभामंडपापासून सुमारे १५ फूट खोल असून तेथे असलेल्या शिवलिंगाजवळ पाण्याचा जिवंत झरा आहे. असे सांगितले जाते की मल्लिक ऋषींच्या आज्ञेने अर्जुनाने येथे तपश्चर्या केली होती, म्हणून या स्थानालामल्लिकार्जुननाव पडले.

या मंदिराची आख्यायिका अशी की धृतराष्ट्र पुत्र कौरव आणि मगध देशाचा राजा जरासंध यांनी अर्जुन पुत्र अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिचे वडील विराट राजा यांच्याकडील गोधन पळविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सर्व गायी भयभीत होऊन दंडकारण्यात पळत सुटल्या. तेथे असणाऱ्या मल्लिक ऋषींनी या गायींना आश्रय दिला. त्यामुळे या ठिकाणालागो ठाणअसे नाव पडले. पुढे त्याचा अपभ्रंश होऊनघोटणझाले. कौरव पांडवांचे युद्ध होण्यापूर्वी या ठिकाणी अर्जुनाने या गायींच्या संरक्षणासाठी कौरवांबरोबर एक युद्ध केले होते. त्यात कौरवांचा पराभव करून विराट राजाला गोधन परत मिळवून दिले होते. तेव्हापासून येथे मल्लिकार्जुन मंदिर आहे.

सध्या असलेले मंदिर हे १००० ते १२०० वर्षांपूर्वीचे असून चारही बाजूंनी त्याला तटबंदी आहे. मंदिराच्या प्रांगणात दीपमाळा आहेत. सभामंडप, अंतराळ आणि गाभारा अशी मंदिराची रचना आहे. या मंदिराच्या सभामंडपात २४ खांब असून त्यावर विविध शिल्पे कोरलेली आहेत. त्यात युद्धाचे प्रसंग, मल्लयुद्ध, तसेच काही मैथुन शिल्पे आहेत. सभागृहात एक गद्धेगळ (एक प्रकारची शापवाणी किंवा शिवी. पूर्वीच्या काळी अनेकांना लिहिता वाचता येत नसे म्हणून अशा प्रकारची शिल्परचना केली जात असे, ज्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा बोध होई) आणि त्यावर देवनागरी लिपीतील मजकूर आहे. हा सभामंडप खुला असून अशा रचनेलारंगमंडपअसे संबोधले जाते.

या मंदिराचे वेगळेपण म्हणजे येथील गर्भगृह. साधारणतः शिवमंदिराचा गाभारा हा ते फूट खाली असतो; परंतु येथील गाभारा हा १५ फूट खाली असून तो टप्प्यांत विभागलेला आहे. गाभाऱ्याच्या दरवाजाजवळ दोन्ही बाजूंना कुबेरमूर्ती कोरलेल्या आहेत. येथील द्वारशाखाही अनेक कोरीव शिल्पांनी सजलेली दिसते. त्यामध्ये विविध फुले, वेली यांचा समावेश आहे. या दरवाजाच्या ललाटबिंबावर (गर्भगृहाच्या दाराच्या वरील बाजूस मधोमध मूर्ती असते ती जागा) धनुष्यधारी महादेवांची मूर्ती आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला विद्याधर (महादेवांचे सोबती, उपदेव) हातात पुष्पमाळा घेऊन महादेवांना वंदन करताना दिसतात. साधारणतः प्राचीन महादेवांच्या मंदिरांमध्ये ललाटबिंबावर गणपती अथवा शंकराची प्रतिमा पाहायला मिळते, पण अशा प्रकारचे ललाटबिंब अन्यत्र कुठे दिसत नाही. या ललाटबिंबाच्यावर अनेक ऋषींच्या ध्यानस्थ मूर्ती कोरलेल्या दिसतात.

गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारातून शिवपिंडीपर्यंत जाण्यासाठी टप्पे आहेत. पायऱ्या उतरल्यानंतर पहिला टप्पा पूर्ण होतो. येथे खांब असून त्यावर विविध शिल्पे आहेत. तेथे खाली असलेल्या शिवपिंडीच्या समोरील बाजूस पार्वतीची मूर्ती आहे. येथून १० पायऱ्या खाली उतरल्यावर प्राचीन शिवपिंडी दिसते. या पायऱ्यांवरही अनेक शिल्पे कोरलेली आहेत. या शिवपिंडीजवळ जिवंत झरा असून तेथे कायम पाणी असते. अशा प्रकारच्या शिवलिंगालापाताळलिंगम्हणून ओळखले जाते.

श्रावणातील तिसऱ्या सोमवारी मल्लिकार्जुनाचा मोठा उत्सव असतो. यावेळी तेथे जत्रा असते. पहाटे वाजल्यापासून रात्री १० पर्यंत भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी असते. यावेळी मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात येते. भजन, कीर्तन यांसोबतच नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा फड या दिवशी येथे रंगतो. रात्री फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. महाशिवरात्रीलाही येथे हजारो भाविक दर्शनाला येतात. दररोज सकाळी संध्याकाळी वाजता आरती होते. भाविकांना सकाळी वाजल्यापासून सायंकाळी पर्यंत मल्लिकार्जुन महादेवाचे दर्शन घेता येते

उपयुक्त माहिती:

  • अहिल्यानगरपासून ७६ तर, शेवगावपासून . किमी अंतरावर
  • शेवगावपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही

मल्लिकार्जुन मंदिर

घोटण, तह. शेवगाँव, जि. अहिल्यानगर

शेवगाँव तहसील के घोटण में भगवान शिव को समर्पित मल्लिकार्जुन मंदिर है। यह स्थान यादवकालीन वास्तुकला के एक मनोहर उदाहरण के रूप में प्रसिद्ध है। मंदिर की विशेष बात यह है कि यहाँ का गर्भगृह सभामंडपा से लगभग 15 पद गहरा है और वहाँ शिवलिंग के पास पानी का एक जीवित झरना है। कहा जाता है कि ऋषि मल्लिक के आदेश पर अर्जुन ने यहाँ तपस्या की थी, इसलिए इसका नाम ‘मल्लिकार्जुन’ पड़ा।

इस मंदिर की जनश्रुति है कि धृतराष्ट्र के पुत्र कौरव और मगध के राजा जरासंध ने अर्जुन के पुत्र अभिमन्यु की पत्नी उत्तरा के पिता राजा विराट से गोधन चुराने की कोशिश की थी। तब सभी गाएँ डरकर दंडकारण्य भाग गईं। वहाँ उपस्थित ऋषि मल्लिक ने इन गायों को आश्रय दिया। इसलिए इस स्थान का नाम ‘गो ठान’ पड़ा। बाद में इसका अपभ्रंश होकर ‘घोटण’ हो गया। कौरव-पांडव युद्ध से पहले अर्जुन ने इन गायों की रक्षा के लिए कौरवों से यहीं युद्ध लड़ा था। इसमें उन्होंने कौरवों को हराकर राजा विराट को गोधन लौटा दिया था। तब से यहाँ मल्लिकार्जुन मंदिर है।

वर्तमान मंदिर 1000 से 1200 साल पुराना है और चारों तरफ से दीवार से घिरा हुआ है। मंदिर प्रांगण में 3 दीपस्तंभ हैं। मंदिर में एक सभामंडप, अंतराल और गर्भगृह है। इस मंदिर के सभामंडप में 24 स्तंभ हैं और उन पर विभिन्न मूर्तियाँ उकेरी गई हैं। जिसमें युद्ध प्रसंग, कुश्ती के साथ-साथ कुछ मिथुन शिल्प हैं। सभामंडप में गधेगल और इस पर देवनागरी लिपि में लेखन मिलता है। यह खुला सभामंडप है और ऐसी संरचना को ‘रंगमंडप’ कहा जाता है।

इस मंदिर की विशेषता यहाँ का गर्भगृह है। आमतौर पर शिव मंदिर का गर्भगृह 4 से 5 पद नीचे होता है, लेकिन यहाँ का गर्भगृह 15 पद नीचे है और 2 चरणों में विभाजित है। गर्भगृह के प्रवेश द्वार के पास दोनों तरफ कुबेर की मूर्तियाँ उकेरी गई हैं। यहाँ की द्वार शाखाएँ भी कई नक्काशीदार मूर्तियों से सुसज्जित हैं। इनमें विभिन्न फूल और लताएँ शामिल हैं। इस द्वार के ऊपर मध्यभाग में धनुष धारण किए हुए महादेव की मूर्ति है। इस मूर्ति के दोनों ओर विद्याधर (महादेव के साथी, उप-देव) हाथों में माला लिए महादेव को प्रणाम करते हुए दिखाई देते हैं। आमतौर पर प्राचीन महादेव मंदिरों में प्रवेश द्वार पर गणपति या शंकर की छवि दिखाई देती है। इस प्रवेश द्वार पर कई ऋषियों की ध्यानमग्न मूर्तियाँ उकेरी गई हैं। गर्भगृह के प्रवेश द्वार से शिवपिंड तक पहुँचने के लिए 2 चरण हैं। 5 सीढ़ियाँ उतरने के बाद पहला चरण पूरा होता है। यहाँ 4 स्तंभ हैं जिन पर विभिन्न मूर्तियाँ बनी हुई हैं। नीचे शिवपिंड के सम्मुख पार्वती की मूर्ति है। यहाँ से 10 सीढ़ियाँ उतरने के बाद प्राचीन शिवपिंड दिखाई देता है। इन सीढ़ियों पर भी कई मूर्तियाँ बनी हुई हैं। इस शिवपिंड के पास एक प्राकृतिक झरना है और वहाँ स्थायी जल है। ऐसे शिवलिंग को ‘पाताललिंग’ के नाम से जाना जाता है।
श्रावण के तीसरे सोमवार को मल्लिकार्जुन का बड़ा उत्सव होता है। वहाँ मेला लगता है। यहाँ सुबह 3 बजे से रात 10 बजे तक दर्शन के लिए श्रद्धालुओं की भीड़ उमड़ती है। इस समय मंदिर पर आकर्षक रोशनी की जाती है। इस दिन यहाँ भजन-कीर्तन के साथ-साथ प्रसिद्ध पहलवानों की कुश्ती भी होती है। रात में आतिशबाजी की जाती है। महाशिवरात्रि पर भी हज़ारों श्रद्धालु यहाँ दर्शन के लिए आते हैं। हर सुबह और शाम 6 बजे आरती होती है। भक्त सुबह 6 बजे से शाम 7 बजे तक मल्लिकार्जुन महादेव के दर्शन कर सकते हैं।

प्रमुख विशेषताएँ

  • अहिल्यानगर से 76 कि.मी., शेवगाँव से 9.5 कि.मी.
  • शेवगाँव से राज्य परिवहन सुविधा
  • निजी वाहन मंदिर की पार्किंग तक जा सकते हैं
  • परिसर में कोई आवास और जलपान की सुविधा नहीं है
Back To Home