मोहटादेवी मंदिर

मोहटागड, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर

महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूरगडावरील रेणुका मातेचा अंशावतार मानल्या जाणाऱ्या जगदंबेचे पाथर्डी तालुक्यातील मोहटागडावरील मंदिर प्रसिद्ध आहे. मोहटागडावर वास्तव्य करणारी देवी म्हणून तिचीमोहटादेवीअशी ख्याती आहे. येथील देवीची मूर्ती स्वयंभू असून हे जागृत स्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. देवीचे हे मंदिर महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे

मंदिराची आख्यायिका अशी की पूर्वी या ठिकाणी दुष्काळ पडला होता, त्यामुळे सर्वांचे हाल होत होते. तेव्हा जगाच्या कल्याणासाठी नवनाथांनी महायज्ञ करून जगदंबा देवीची आराधना केली. त्यासाठी अनेक ऋषीमुनींनाही पाचारण करण्यात आले होते. या महायज्ञाद्वारे देवदेवता संतुष्ट झाल्या पर्जन्यवृष्टी सुरू झाली. पूर्णाहुती सोहळ्याच्या वेळी यज्ञकुंडात एक दिव्यशक्ती प्रकट झाली. तीच महाशक्ती जगदंबा रेणुका माता. देवीची यथासांग पूजाअर्चा झाल्यानंतर नवनाथांनी देवीला जगाच्या कल्याणासाठी येथेच राहण्याची विनंती केलीत्यावेळी योग्य वेळ आल्यावर मी पुन्हा प्रकट होऊन येथे वास्तव्य करेन, असा देवीने शब्द दिला. त्यानंतर काही वर्षांनी जगदंबा येथे प्रकट होऊन स्थानापन्न झाली. हीच जगदंबा पुढे मोहटादेवी या नावाने प्रसिद्ध झाली

दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, रेणुका मातेचे परमभक्त बन्सीबाबा दहिफळे हे दरवर्षी नित्यनेमाने श्री क्षेत्र माहूरगडाची वारी करायचे. रेणुका मातेची पूजाअर्चा, अभिषेक, साडीचोळी अर्पण करून महिन्यांनी ते मोहटा येथे परतायचे. पुढे वयोमानामुळे त्यांना पायी वारी करणे कठीण होऊ लागले. त्यांनी रेणुका मातेला आर्जव केले कीमाते, तुझा वियोग होऊ देऊ नको.’ त्यानंतर एके दिवशी बाबांची गाय हरवली, खूप शोधाशोध केली असता गाय डोंगरमाथ्यावर असल्याचे समजले. जेव्हा बाबांनी डोंगरावर जाऊन पाहिले तर गायीने पान्हा सोडला होता. तेथे पाहिले असता देवीचा तांदळा होता. त्यानंतर मोहटा ग्रामस्थांनी पैठण तीर्थक्षेत्री जाऊन कावडीमधून गंगोदक आणून त्या तीर्थाने देवीला अभिषेक केला. तो दिवस होता आश्विन शुक्ल एकादशीचा

फार पूर्वीपासून आश्विन शुक्ल एकादशीला ग्रामस्थ हजारो भक्तगण पायी पैठणला जाऊन कावडीमध्ये गंगातीर्थ आणतात देवीला अभिषेक करतात. ही परंपरा आजही सुरू आहे. या अभिषेकानंतर मोहटादेवीची यात्रा भरते. यावेळी मोहटा गाव ते मंदिर अशी पालखी निघते. या पालखीचे वैशिष्ट्य असे की पालखीमार्गात पालखीच्या पुढे हजारो महिला आपल्या पदराने रस्ता झाडत असतात. मोहटा गडावर शारदीय नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा होतो. हे जागृत स्थान असून देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे नवसपूर्तीसाठी येथे नवरात्रोत्सवात हजारो महिला घटी बसतात

या गावातील लोक दूध, दही तुपाची विक्री करीत नाहीत. याबाबत असे सांगितले जाते की मोघल काळात एकदा शेजारील गावांतून काही म्हशी वाट चुकून मोहटा गावात आल्या. त्या म्हशींचे मालक आल्यानंतर ते त्यांना घेऊन जातील, असे समजून त्यांना ग्रामस्थांनी येथे बांधून ठेवले; परंतु अनेक दिवस होऊनही म्हशींना नेण्यासाठी कुणी आले नाही. ही वार्ता मोघलांच्या नाकेदारांना कळली त्यांनी म्हशी चोरीच्या आरोपावरून ग्रामस्थांना अटक करण्याचे आदेश दिले. आपली चूक नसताना अटक होण्याच्या संकटातून मुक्त होण्यासाठी त्यांनी मोहटादेवीची आळवणी केली. ‘आम्ही गायीम्हशींचे दूध, तूप विकणार नाही तुला अर्पण केल्याशिवाय खाणारदेखील नाही; परंतु हे संकटनिवारण करही भक्तांची हाक, मोहटादेवीने ऐकली. दुसऱ्या दिवशी नाकेदार येथे आले असता त्यांना सर्व म्हशींचा काळा रंग हा पांढरा झाल्याचे दिसले. आदल्या दिवशी पाहिलेल्या म्हशी या नाहीत, हे नाकेदारांच्या लक्षात आले. त्यांनी अटकेचा आदेश रद्द केला. तेव्हापासून येथील ग्रामस्थ दूध, दही तूप विकत नाहीत. तसेच देवीस अर्पण केल्याशिवाय ते खातही नाहीत.

मोहटा देवी मंदिर परिसर दहा एकरांचा प्रशस्त आहे. देवीभक्तांनी दिलेल्या देणग्यांमधून २५ कोटी रुपये खर्च करून हे भव्य मंदिर बांधण्यात आले. त्यासाठी राजस्थानमधील जैसलमेर येथून विशिष्ट प्रकारचे दगड आणण्यात आले होते. दाक्षिणात्य पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराला मुख्य कळसासह २५ हून अधिक उपकळस आहेत. याशिवाय या मंदिरात विविध देवींच्या १०० हून अधिक मूर्ती आहेत. मुख्य सभामंडपात दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली असून गर्भगृहात मोठ्या चौथऱ्यावर मोहटादेवीची स्वयंभू मूर्ती प्रतिष्ठापित आहे.

देवस्थानाच्या आवारात असलेल्या पाच मजली इमारतीमध्ये भक्त निवास, भोजन कक्ष देवस्थान समिती कार्यालय आहे. कीर्तन, भजन यांसारख्या कार्यक्रमांसाठी येथे स्वतंत्र सभामंडप आहे. मंदिरात दररोज तीन वेळा आरती होते. पहाटे ते रात्री १० पर्यंत भाविक मंदिरात जाऊन मोहटादेवीचे दर्शन घेऊ शकतात. भाविकांना येथे दुपारी १२.२५ ते रात्री .४५ ते वाजेपर्यंत महाप्रसाद देण्यात येतो

उपयुक्त माहिती:

  • पाथर्डीपासून किमी, तर अहमदनगरपासून ६१ किमी अंतरावर
  • पाथर्डी बस स्थानकातून दर तासाला देवस्थानतर्फे बस
  • गडाच्या पायथ्यापर्यंत एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • मंदिराची वेबसाईट : https://www.shrimohatadevi.org
Back To Home