माहिती

About Us

जानकारी

Pilgrim Data Services

भारत ही लौकिकतेबरोबरच पारलौकिक विचारांची, अर्थ आणि काम या पुरूषार्थांबरोबरच अध्यात्माचीही भूमी आहे. मातृस्वरूप नद्या, पर्वत, तीर्थक्षेत्रे ही येथील अध्यात्मिक धरोहर आहे. नानाविध देवालयांमुळे या भूमीस परम पावित्र्य लाभलेले आहे. धार्मिक महत्त्व, तसेच वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य यांनी यांतील अनेक मंदिरे भाविकांना साद घालीत असतात. आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगातही या मंदिरांचे विविध पैलू अनेकांस अज्ञात आहेत.

ईश्वरी आशीर्वाद आणि दैवी शांततेच्या शोधात असणाऱ्या भाविकांना अशा खास देवस्थानांची, त्यांच्या धार्मिक महत्तेची आणि वैशिष्ट्यांची ओळख करून देणे हीसुद्धा एक ईश्वरसेवाच. याच भावनेने या संकेतस्थळावरून देशभरातील विविध धार्मिक वैशिष्ट्यांनी नटलेल्या मंदिरांची, तीर्थस्थानांची माहिती देण्याचा आमचा संकल्प आहे. सादर आहे त्यातीलच ही काही मंदिरांची माहिती…