नंदिकेश्वर मंदिर
निरवांगी, ता. इंदापूर, जि. पुणे

इंदापूर तालुक्यात नीरा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या निरवांगी गावात नंदिकेश्वर महादेवाचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. दाट वनराईत असलेल्या या मंदिराचे वेगळेपण म्हणजे येथील भलीमोठी नंदीची मूर्ती. याच नंदीवरून हे स्थान नंदिकेश्वर म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर सुमारे सातशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी येथे भरणाऱ्या यात्रेवेळी राज्यातील विविध जिल्ह्यांतून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
महादेवाचे वाहन असलेला नंदी भक्ती आणि शक्तीचे प्रतीक समजले जाते. शिव दरबाराचा द्वारपाल समजला जाणारा हा नंदी महादेवाच्या खास गणांपैकी एक आहे. महादेवाने नंदीला वर दिला होता की ध्यानमग्न असताना एखाद्या भक्ताने आपली इच्छा तुझ्या कानात सांगितली तरी ती माझ्यापर्यंत पोहोचेल. त्यानुसार महादेव जेव्हा जेव्हा ध्यानमग्न असत तेव्हा पार्वती नंदीच्या कानात निरोप देत असे. म्हणून आजही अनेक भाविक आपल्या इच्छा
महादेवाच्या पिंडीसमोर बोलण्याऐवजी नंदीच्या कानात सांगतात. नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा महादेव पूर्ण करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे महादेवाच्या मंदिरात प्रवेश करताना आवर्जून नंदीची पुजा केली जाते.
नंदीकेश्वर मंदिराची अख्यायिका अशी की निरवांगी गावाजवळ शंभू महादेवाचे मूळ स्थान होते. या परिसरात असलेली हिरवाई व मळे यामुळे शंभू महादेवाचे वाहन असलेल्या नंदीलाही हा परिसर आवडत असे. अनेकदा येथील मळ्यांमध्ये हा नंदी चरण्यासाठी शिरत असे. नंदी मळ्यात शिरल्याने आपल्या भाजीपाल्याची नासाडी होईल, या भीतीने अनेकजण त्याला हुसकून लावत असत. नंदीचा सतत होणारा अपमान सहन न झाल्याने महादेव नंदीला घेऊन शिखर शिंगणापूर येथे गेले. पण निरवांगीचा परिसर भावल्यामुळे हा नंदी तेथून पुन्हा पुन्हा याच परिसरात येत असे. नंदीचे या परिसरावर असलेले प्रेम पाहून महादेवाने निरवांगीतच या नंदीसाठी राहण्याची व्यवस्था केली. हे स्थान म्हणजेच येथील नंदिकेश्वर मंदिर होय.
दुसऱ्या अख्यायिकेनुसार, या परिसरात आक्रमकांकडून विध्वंस सुरू होता. एकदा त्यांची नजर नंदीकेश्वर मंदिरावर पडली. या आक्रमाकांपैकी एकाने आपल्या हातातील हत्याराचा पहिला घाव या नंदीच्या मूर्तीवर घातला. या घावामुळे नंदीच्या पाठीवर जखमेसारखी खोक पडली आणि त्यातून रक्त वाहू लागले. पाषाणी मूर्तीतून येणारे ते रक्त पाहून आक्रमक घाबरले व तेथून त्यांनी काढता पाय घेतला. या कथेला आधार म्हणून नंदीच्या पाठीवर डाव्या बाजूला असलेला एक खोलगट खड्डा दाखवण्यात येतो. शिखर शिगणापूर येथील महादेवाच्या दर्शनाला जाण्याआधी येथील नंदीचे दर्शन घेऊन मगच पुढे जाण्याचा दंडक आहे.
या मंदिराचा लिखित स्वरूपातील इतिहास उपलब्ध नसला तरी येथील अस्पष्ट
शिलालेख व मंदिराची स्थापत्य रचना यावरून ते सुमारे आठशे वर्षांपूर्वीचे असल्याचा अभ्यासकांचा दावा आहे. भीमा, कऱ्हा आणि नीरा नदीच्या खोऱ्यांत चालुक्यकाळापासून अशा मंदिरांची निर्मिती होत आल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यापैकी पळसदेव येथील पळसनाथ मंदिराशी या मंदिराचे साम्य असल्याचे सांगितले जाते. या मंदिराप्रमाणेच पुरंदर, नारायणपूर व लोणी भापकर या परिसरात अशा स्थापत्यशैलीची मंदिरे आहेत.
निरवांगी गावापासून काहीसे दूरवर व गर्द झाडीत नंदिकेश्वर मंदिर स्थित आहे. प्रशस्त पटांगणात मध्यभागी असलेल्या या मंदिराची रचना खुला मंडप, नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. मुळ मंदिरासमोर अलिकडील काळात भाविकांच्या सोयीसाठी खुल्या स्वरूपाचा मंडप उभारलेला आहे. या मंडपातून नंदीमंडपात प्रवेश होतो. चार दगडी स्तंभ, त्यावर हस्त व छत असलेल्या या नंदीमंडपात मध्यभागी भलीमोठी नंदीची पाषाणातील मूर्ती आहे. नंदीमंडपाच्या समोरील बाजूस सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती व खालच्या बाजूला
शस्त्रधारी द्वारपाल आहेत. द्वारशाखांवर नक्षीकाम व खालील बाजूस स्वागतिका, अन्य स्त्री व पुरुषांची उठाव शिल्पे (म्युरल्स) आहेत.
या प्रवेशद्वारातून मंदिराच्या बंदिस्त सभामंडपात (गुढमंडप) प्रवेश होतो. सभामंडपात चार नक्षीदार दगडी स्तंभ आहेत. या स्तंभांच्या मध्यभागी कासवशिल्प आहे. सभामंडपात हवा खेळती राहावी यासाठी प्रवेशद्वाराच्या शेजारी असलेल्या भिंतींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण दगडी जाळीची रचना आहे. या जाळीमध्ये असलेल्या चौकोनांत दगडी फुले आहेत. सभामंडपाच्या भिंतींमध्ये असलेल्या देवकोष्टकांमध्ये गणपती व महादेव यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराप्रमाणेच येथील गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची रचना आहे. तेथे असलेल्या शिल्पांप्रमाणेच येथेही तशीच शिल्पे आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी आहे. येथील सभामंडपावर लहान शिखर व गर्भगृहावर मुख्य व उंच शिखर आहे. गर्भगृहावरील शिखर हे नव्याने उभारलेले आहे.
महाशिवरात्री व श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे उत्सव साजरे होतात. मंदिराचा यात्रोत्सव श्रावणातील शेवटच्या सोमवारी असतो. इंदापूर तालुक्यातील मोठ्या यात्रांमध्ये येथील यात्रेचा समावेश होतो. यावेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवसफेड करण्यासाठी येथे येतात.
उपयुक्त माहिती
- इंदापूरपासून २५ किमी, तर पुण्यापासून १४० किमी अंतरावर
- इंदापूर व नातेपुते येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Nandikeshwar Temple
Nirwangi, Taluka Indapur, District Pune

The ancient and famous temple of Nandikeshwar Mahadev is situated in the village of Nirwangi, located on the banks of the Nira River in Indapur Taluka. The uniqueness of this temple, nestled in dense forest, lies in the massive idol of Nandi found here. It is because of this Nandi that the place is famous among devotees as Nandikeshwar. This temple, a place of faith for thousands of devotees, is said to be about seven hundred years old. During the fair held here on the last Monday of the month of Shravan, thousands of devotees from various districts of the state come here for darshan.
Nandi, the vehicle of Mahadeva, is considered a symbol of devotion and strength. Regarded as the gatekeeper of Shiva’s court, this Nandi is one of the special attendants of Mahadeva. Mahadeva had granted a boon to Nandi that if a devotee whispered their wish into his ear while he was in deep meditation, it would reach Him. Accordingly, whenever Mahadeva was in deep meditation, Parvati would convey messages into Nandi’s ear. That is why, even today, many devotees whisper their wishes
Instead of speaking directly before the Shiva Linga, devotees whisper their wishes into the ear of Nandi. It is the firm belief of devotees that Lord Mahadeva fulfills the wishes whispered into the ear of Nandi. For this reason, it is customary to worship Nandi upon entering a temple of Lord Mahadeva.
The legend of the Nandikeshwar Temple states that the original abode of Shambhu Mahadev was near the village of Nirwangi. Due to the lush greenery and orchards in this area, Nandi, the vehicle of Shambhu Mahadev, was very fond of this region. Often, Nandi would enter these orchards to graze. Fearing that their vegetables would be destroyed by Nandi’s presence, many people would drive him away. Unable to bear the constant disrespect shown to Nandi, Mahadev took him and went to Shikhar Shingnapur. However, because Nandi was so enamored with the Nirwangi region, he would repeatedly return to this area. Seeing Nandi’s love for this place, Mahadev arranged for him to stay in Nirwangi itself. This very place is the Nandikeshwar Temple.
According to another legend, invaders were carrying out destruction in this area. Once, their eyes fell upon the Nandikeshwar Temple. One of these invaders struck the first blow with his weapon upon this idol of Nandi. Due to this strike, a wound-like gash appeared on Nandi’s back, and blood began to flow from it. Seeing that blood emerging from the stone idol, the invaders were terrified and fled from there. As evidence for this story, a deep depression on the left side of Nandi’s back is shown. It is a tradition to have darshan of this Nandi before proceeding for the darshan of Mahadev at Shikhar Shinganapur.
Although the written history of this temple is not available, the obscure
Based on the inscriptions and the architectural design of the temple, scholars claim that it dates back approximately eight hundred years. Evidence is available indicating that such temples have been constructed in the basins of the Bhima, Karha, and Nira rivers since the Chalukya era. It is said that this temple bears a resemblance to the Palasnath Temple at Palasdev. Similar to this temple, there are other temples of this architectural style in the areas of Purandar, Narayanpur, and Loni Bhapkar.
The Nandikeshwar Temple is situated at a short distance from Nirwangi village, amidst dense greenery. Located in the center of a spacious courtyard, the temple’s structure consists of an open mandapa, a Nandi mandapa, a sabha mandapa, an antarala, and a garbhagriha. In recent times, an open-style mandapa has been constructed in front of the original temple for the convenience of devotees. One enters the Nandi mandapa from this mandapa. In this Nandi mandapa, which features four stone pillars along with beams and a ceiling, there is a massive stone idol of Nandi in the center. The entrance to the sabha mandapa is on the side facing the Nandi mandapa. On the lalata-bimba of this entrance is an idol of Ganesha, and at the lower side
There are armed gatekeepers. The door frames feature intricate carvings, and at the base, there are relief sculptures (murals) of welcoming figures, along with other men and women.
This entrance leads into the enclosed assembly hall (Gudhamandapa) of the temple. The assembly hall features four intricately carved stone pillars. In the center of these pillars lies a tortoise sculpture. To ensure proper ventilation in the assembly hall, a unique stone lattice design has been incorporated into the walls adjacent to the entrance. Within the squares of this lattice are stone flowers. In the niches carved into the walls of the assembly hall, there are idols of Lord Ganapati and Lord Mahadeva. The design of the sanctum sanctorum’s entrance is similar to that of the assembly hall’s entrance. It features sculptures identical to those found there. In the center of the sanctum sanctorum floor, there is a Swayambhu Shiva Linga. The assembly hall is topped by a small spire, while the sanctum sanctorum is crowned by the main, taller spire. The spire above the sanctum sanctorum has been newly constructed.
Festivals are celebrated here on Mahashivratri and every Monday of the Shravan month. The temple’s annual fair takes place on the last Monday of Shravan. This fair is counted among the major pilgrimages in the Indapur taluka. During this time, thousands of devotees arrive here for the darshan of the deity and to fulfill their vows.
Useful Information
- At a distance of 25 km from Indapur and 140 km from Pune
- ST bus facility available from Indapur and Natepute
- Private vehicles can reach the temple.
- Accommodation and breakfast facilities are not available in the vicinity.
नंदिकेश्वर मंदिर
निरवांगी, ता. इंदापूर, जि. पुणे

इंदापूर तालुक्यात नीरा नदीच्या काठी वसलेल्या निरवांगी गावात नंदिकेश्वर महादेवाचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. घनदाट वनराईत असलेल्या या मंदिराचे वेगळेपण म्हणजे येथील नंदीची भव्य मूर्ती. याच नंदीवरून हे स्थान भाविकांमध्ये नंदिकेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर सुमारे ७०० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी येथे भरणाऱ्या यात्रेवेळी राज्यातील विविध जिल्ह्यांतून हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
महादेवाचे वाहन असलेला नंदी भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो. शिव दरबाराचा द्वारपाल समजला जाणारा हा नंदी महादेवाच्या खास गणांपैकी एक आहे. महादेवाने नंदीला वर दिला होता की, ध्यानमग्न असताना एखादा भक्त आपली इच्छा तुझ्या कानात सांगेल, तर ती माझ्यापर्यंत पोहोचेल. त्यानुसार महादेव जेव्हा जेव्हा ध्यानमग्न असत, तेव्हा पार्वती नंदीच्या कानात निरोप देत असे. म्हणूनच आजही अनेक भाविक आपल्या इच्छा
महादेवाच्या पिंडीसमोर बोलण्याऐवजी नंदीच्या कानात सांगतात. नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा महादेव पूर्ण करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे महादेवाच्या मंदिरात प्रवेश करताना आवर्जून नंदीची पूजा केली जाते.
नंदिकेश्वर मंदिराची आख्यायिका अशी की, निरवांगी गावाजवळ शंभू महादेवाचे मूळ स्थान होते. या परिसरातील हिरवळ व मळ्यांमुळे शंभू महादेवाचे वाहन असलेल्या नंदीलाही हा परिसर आवडत असे. अनेकदा येथील मळ्यांमध्ये हा नंदी चरण्यासाठी शिरत असे. नंदी मळ्यात शिरल्याने आपल्या भाजीपाल्याची नासाडी होईल, या भीतीने अनेकजण त्याला हुसकावून लावत असत. नंदीचा सतत होणारा अपमान सहन न झाल्याने महादेव नंदीला घेऊन शिखर शिंगणापूर येथे गेले. पण निरवांगीचा परिसर भावल्यामुळे हा नंदी तेथून पुन्हा पुन्हा याच परिसरात येत असे. नंदीचे या परिसरावर असलेले प्रेम पाहून महादेवाने निरवांगीतच या नंदीसाठी राहण्याची व्यवस्था केली. हे स्थान म्हणजेच येथील नंदिकेश्वर मंदिर होय.
दुसऱ्या आख्यायिकेनुसार, या परिसरात आक्रमकांकडून विध्वंस सुरू होता. एकदा त्यांची नजर नंदिकेश्वर मंदिरावर पडली. या आक्रमकांपैकी एकाने आपल्या हातातील शस्त्राचा पहिला घाव या नंदीच्या मूर्तीवर घातला. या घावामुळे नंदीच्या पाठीवर जखमेसारखी खोक पडली आणि त्यातून रक्त वाहू लागले. पाषाणी मूर्तीतून येणारे ते रक्त पाहून आक्रमक घाबरले व तेथून त्यांनी पळ काढला. या कथेला आधार म्हणून नंदीच्या पाठीवर डाव्या बाजूला असलेला एक खोलगट खड्डा दाखवण्यात येतो. शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी येथील नंदीचे दर्शन घेऊन मगच पुढे जाण्याचा दंडक आहे.
या मंदिराचा लिखित इतिहास उपलब्ध नसला तरी येथील अस्पष्ट
शिलालेख व मंदिराची स्थापत्य रचना यावरून ते सुमारे ८०० वर्षांपूर्वीचे असल्याचा अभ्यासकांचा दावा आहे. भीमा, कऱ्हा आणि नीरा नदीच्या खोऱ्यांत चालुक्य काळापासून अशा मंदिरांची निर्मिती होत आल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यापैकी पळसदेव येथील पळसनाथ मंदिराशी या मंदिराचे साम्य असल्याचे सांगितले जाते. या मंदिराप्रमाणेच पुरंदर, नारायणपूर व लोणी भापकर या परिसरात अशा स्थापत्यशैलीची मंदिरे आहेत.
निरवांगी गावापासून काहीसे दूरवर व गर्द झाडीत नंदिकेश्वर मंदिर स्थित आहे. प्रशस्त पटांगणात मध्यभागी असलेल्या या मंदिराची रचना खुला मंडप, नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. मूळ मंदिरासमोर अलीकडच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी खुल्या स्वरूपाचा मंडप उभारलेला आहे. या मंडपातून नंदीमंडपात प्रवेश होतो. चार दगडी स्तंभ, त्यावर हस्त व छत असलेल्या या नंदीमंडपात मध्यभागी नंदीची भव्य पाषाण मूर्ती आहे. नंदीमंडपाच्या समोरील बाजूस सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती व खालच्या बाजूला
शस्त्रधारी द्वारपाल आहेत. द्वारशाखांवर नक्षीकाम व खालील बाजूस स्वागतिका, अन्य स्त्री व पुरुषांची उठाव शिल्पे (म्युरल्स) आहेत.
या प्रवेशद्वारातून मंदिराच्या बंदिस्त सभामंडपात (गुढमंडप) प्रवेश होतो. सभामंडपात चार नक्षीदार दगडी स्तंभ आहेत. या स्तंभांच्या मध्यभागी कासवशिल्प आहे. सभामंडपात हवा खेळती राहावी यासाठी प्रवेशद्वाराच्या शेजारी असलेल्या भिंतींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण दगडी जाळीची रचना आहे. या जाळीमध्ये असलेल्या चौकोनांत दगडी फुले आहेत. सभामंडपाच्या भिंतींमध्ये असलेल्या देवकोष्टकांमध्ये गणपती व महादेव यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराप्रमाणेच येथील गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची रचना आहे. तेथे असलेल्या शिल्पांप्रमाणेच येथेही तशीच शिल्पे आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी आहे. येथील सभामंडपावर लहान शिखर व गर्भगृहावर मुख्य व उंच शिखर आहे. गर्भगृहावरील शिखर हे नव्याने उभारलेले आहे.
महाशिवरात्री व श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे उत्सव साजरे होतात. मंदिराचा यात्रोत्सव श्रावणातील शेवटच्या सोमवारी असतो. इंदापूर तालुक्यातील मोठ्या यात्रांमध्ये येथील यात्रेचा समावेश होतो. यावेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात.
उपयुक्त माहिती
- इंदापूरपासून २५ किमी, तर पुण्यापासून १४० किमी अंतरावर
- इंदापूर व नातेपुते येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
નંદિકેશ્વર મંદિર
નિરવાંગી, તા. ઇંદાપુર, જિ. પુણે

ઇંદાપુર તાલુકામાં નીરા નદીના કિનારે વસેલા નિરવાંગી ગામમાં નંદિકેશ્વર મહાદેવનું પ્રાચીન અને પ્રસિદ્ધ મંદિર છે. ગીચ વનરાઈમાં આવેલા આ મંદિરની વિશેષતા એટલે અહીંની વિશાળ નંદીની મૂર્તિ. આ નંદી પરથી જ આ સ્થાન ભક્તોમાં નંદિકેશ્વર તરીકે પ્રસિદ્ધ છે. હજારો ભક્તોનું શ્રદ્ધાસ્થાન ગણાતું આ મંદિર આશરે સાતસો વર્ષ જૂનું હોવાનું કહેવાય છે. શ્રાવણ મહિનાના છેલ્લા સોમવારે અહીં ભરાતા મેળા વખતે રાજ્યના વિવિધ જિલ્લાઓમાંથી હજારો ભક્તો અહીં દર્શન માટે આવે છે.
મહાદેવનું વાહન એવો નંદી ભક્તિ અને શક્તિનું પ્રતીક માનવામાં આવે છે. શિવ દરબારના દ્વારપાળ ગણાતા આ નંદી મહાદેવના ખાસ ગણો પૈકીના એક છે. મહાદેવે નંદીને વરદાન આપ્યું હતું કે ધ્યાનમગ્ન હોઉં ત્યારે કોઈ ભક્ત પોતાની ઈચ્છા તારા કાનમાં કહેશે તો તે મારા સુધી પહોંચી જશે. તે અનુસાર મહાદેવ જ્યારે જ્યારે ધ્યાનમગ્ન હોય ત્યારે પાર્વતી નંદીના કાનમાં સંદેશો આપતા હતા. તેથી આજે પણ ઘણા ભક્તો પોતાની ઈચ્છા
મહાદેવની પિંડી સામે બોલવાને બદલે નંદીના કાનમાં કહે છે. નંદીના કાનમાં કહેલી ઈચ્છા મહાદેવ પૂર્ણ કરે છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. તેથી મહાદેવના મંદિરમાં પ્રવેશતી વખતે અચૂક નંદીની પૂજા કરવામાં આવે છે.
નંદિકેશ્વર મંદિરની દંતકથા એવી છે કે નિરવાંગી ગામ નજીક શંભુ મહાદેવનું મૂળ સ્થાન હતું. આ વિસ્તારમાં રહેલી હરિયાળી અને વાડીઓને કારણે શંભુ મહાદેવના વાહન એવા નંદીને પણ આ વિસ્તાર ગમતો હતો. ઘણીવાર અહીંની વાડીઓમાં આ નંદી ચરવા માટે ઘૂસી જતો હતો. નંદી વાડીમાં ઘૂસવાથી આપણા શાકભાજીનો નાશ થશે, તે ડરથી ઘણા લોકો તેને હાંકી કાઢતા હતા. નંદીનો સતત થતો અપમાન સહન ન થવાથી મહાદેવ નંદીને લઈને શિખર શિંગણાપુર ગયા. પણ નિરવાંગીનો વિસ્તાર ગમી જવાથી આ નંદી ત્યાંથી વારંવાર આ જ વિસ્તારમાં આવતો હતો. નંદીનો આ વિસ્તાર પ્રત્યેનો પ્રેમ જોઈને મહાદેવે નિરવાંગીમાં જ આ નંદી માટે રહેવાની વ્યવસ્થા કરી. આ સ્થાન એટલે જ અહીંનું નંદિકેશ્વર મંદિર.
બીજી દંતકથા અનુસાર, આ વિસ્તારમાં આક્રમણખોરો દ્વારા વિનાશ શરૂ હતો. એકવાર તેમની નજર નંદિકેશ્વર મંદિર પર પડી. આ આક્રમણખોરોમાંથી એકે પોતાના હાથમાં રહેલા હથિયારનો પહેલો ઘા આ નંદીની મૂર્તિ પર કર્યો. આ ઘાને કારણે નંદીની પીઠ પર જખમ જેવો ખાડો પડી ગયો અને તેમાંથી રક્ત વહેવા લાગ્યું. પાષાણની મૂર્તિમાંથી નીકળતું તે રક્ત જોઈને આક્રમણખોરો ગભરાઈ ગયા અને ત્યાંથી ભાગી છૂટ્યા. આ કથાના આધાર તરીકે નંદીની પીઠ પર ડાબી બાજુએ રહેલો એક ઊંડો ખાડો બતાવવામાં આવે છે. શિખર શિંગણાપુર ખાતે મહાદેવના દર્શને જતા પહેલા અહીંના નંદીના દર્શન કરીને જ આગળ વધવાનો રિવાજ છે.
આ મંદિરનો લેખિત ઈતિહાસ ઉપલબ્ધ ન હોવા છતાં અહીંના અસ્પષ્ટ
શિલાલેખ અને મંદિરની સ્થાપત્ય રચના પરથી તે આશરે આઠસો વર્ષ જૂનું હોવાનો અભ્યાસુઓનો દાવો છે. ભીમા, કર્હા અને નીરા નદીના ખીણ પ્રદેશોમાં ચાલુક્યકાળથી આવા મંદિરોનું નિર્માણ થતું આવ્યું હોવાના પુરાવા ઉપલબ્ધ છે. તે પૈકી પળસદેવ ખાતેના પળસનાથ મંદિર સાથે આ મંદિરની સામ્યતા હોવાનું કહેવાય છે. આ મંદિરની જેમ જ પુરંદર, નારાયણપુર અને લોણી ભાપકર વિસ્તારમાં આવી સ્થાપત્યશૈલીના મંદિરો છે.
નિરવાંગી ગામથી થોડે દૂર અને ગીચ ઝાડીઓમાં નંદિકેશ્વર મંદિર સ્થિત છે. વિશાળ આંગણમાં મધ્યમાં આવેલા આ મંદિરની રચના ખુલ્લો મંડપ, નંદીમંડપ, સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી છે. મૂળ મંદિરની સામે તાજેતરના સમયમાં ભક્તોની સુવિધા માટે ખુલ્લા પ્રકારનો મંડપ બાંધવામાં આવ્યો છે. આ મંડપમાંથી નંદીમંડપમાં પ્રવેશ થાય છે. ચાર પથ્થરના સ્તંભ, તેના પર હસ્ત અને છત ધરાવતા આ નંદીમંડપમાં મધ્યમાં વિશાળ નંદીની પાષાણની મૂર્તિ છે. નંદીમંડપની સામેની બાજુએ સભામંડપનું પ્રવેશદ્વાર છે. આ પ્રવેશદ્વારના લલાટબિંબ પર ગણેશમૂર્તિ અને નીચેની બાજુએ
શસ્ત્રધારી દ્વારપાળ છે. દ્વારશાખાઓ પર નકશીકામ અને નીચેની બાજુએ સ્વાગતિકા, અન્ય સ્ત્રી અને પુરુષોની ઉપસેલી શિલ્પકૃતિઓ (મ્યુરલ્સ) છે.
આ પ્રવેશદ્વારથી મંદિરના બંધ સભામંડપ (ગૂઢમંડપ)માં પ્રવેશ થાય છે. સભામંડપમાં ચાર નકશીદાર પથ્થરના સ્તંભ છે. આ સ્તંભોની મધ્યમાં કાચબાનું શિલ્પ છે. સભામંડપમાં હવા અવરજવર કરી શકે તે માટે પ્રવેશદ્વારની બાજુમાં રહેલી દીવાલોમાં વિશિષ્ટ પથ્થરની જાળીની રચના છે. આ જાળીમાં રહેલા ચોરસમાં પથ્થરના ફૂલ છે. સભામંડપની દીવાલોમાં રહેલા દેવકોષ્ઠકોમાં ગણપતિ અને મહાદેવની મૂર્તિઓ છે. સભામંડપના પ્રવેશદ્વાર જેવી જ અહીંના ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની રચના છે. ત્યાં રહેલા શિલ્પોની જેમ જ અહીં પણ તેવા જ શિલ્પો છે. ગર્ભગૃહમાં જમીન પર મધ્યમાં સ્વયંભૂ શિવપિંડી છે. અહીંના સભામંડપ પર નાનું શિખર અને ગર્ભગૃહ પર મુખ્ય અને ઊંચું શિખર છે. ગર્ભગૃહ પરનું શિખર નવેસરથી બાંધવામાં આવ્યું છે.
મહાશિવરાત્રી અને શ્રાવણના દરેક સોમવારે અહીં ઉત્સવ ઉજવાય છે. મંદિરનો મેળાનો ઉત્સવ શ્રાવણના છેલ્લા સોમવારે હોય છે. ઇંદાપુર તાલુકાના મોટા મેળામાં અહીંના મેળાનો સમાવેશ થાય છે. આ સમયે હજારો ભક્તો દેવના દર્શન માટે અને માનતા પૂરી કરવા માટે અહીં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- ઇંદાપુરથી ૨૫ કિમી, તો પુણેથી ૧૪૦ કિમી અંતરે
- ઇંદાપુર અને નાતેપુતેથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
நந்திகேஸ்வரர் கோவில்
நிரவாங்கி, தா. இந்தாப்பூர், ஜி. புனே

இந்தாப்பூர் வட்டத்தில் நீரா ஆற்றங்கரையில் அமைந்துள்ள நிரவாங்கி கிராமத்தில் நந்திகேஸ்வர மகாதேவரின் பழமையான மற்றும் புகழ்பெற்ற கோவில் உள்ளது. அடர்ந்த வனப்பகுதியில் அமைந்துள்ள இந்த கோவிலின் தனிச்சிறப்பு, இங்குள்ள பிரம்மாண்டமான நந்தி சிலை ஆகும். இந்த நந்தியின் பெயராலேயே இந்த இடம் பக்தர்களிடையே நந்திகேஸ்வரர் என்று அழைக்கப்படுகிறது. ஆயிரக்கணக்கான பக்தர்களின் நம்பிக்கைக்குரிய இந்த கோவில் சுமார் எழுநூறு ஆண்டுகள் பழமையானது என்று கூறப்படுகிறது. சிராவண மாதத்தின் கடைசி திங்கட்கிழமையன்று இங்கு நடைபெறும் திருவிழாவின் போது, மாநிலத்தின் பல்வேறு மாவட்டங்களில் இருந்து ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் தரிசனத்திற்காக வருகை தருகின்றனர்.
மகாதேவரின் வாகனமான நந்தி, பக்தி மற்றும் சக்தியின் அடையாளமாகக் கருதப்படுகிறது. சிவபெருமானின் வாயிற்காவலராகக் கருதப்படும் இந்த நந்தி, மகாதேவரின் முக்கியமான கணங்களில் ஒருவர். மகாதேவர் தியானத்தில் இருக்கும்போது, ஒரு பக்தர் தனது விருப்பத்தை நந்தியின் காதில் கூறினால், அது தன்னிடம் வந்து சேரும் என்று நந்திக்கு வரம் அளித்திருந்தார். அதன்படி, மகாதேவர் தியானத்தில் இருக்கும்போதெல்லாம் பார்வதி தேவி நந்தியின் காதில் செய்திகளைத் தெரிவிப்பார். எனவேதான் இன்றும் பல பக்தர்கள் தங்கள் விருப்பங்களை
மகாதேவரின் சிவலிங்கத்திற்கு முன்னால் சொல்வதற்குப் பதிலாக நந்தியின் காதில் கூறுகின்றனர். நந்தியின் காதில் சொல்லப்படும் விருப்பங்களை மகாதேவர் நிறைவேற்றுவார் என்பது பக்தர்களின் நம்பிக்கை. இதனாலேயே மகாதேவர் கோவிலுக்குள் நுழையும் போது நந்திக்கு வழிபாடு செய்வது வழக்கமாக உள்ளது.
நந்திகேஸ்வரர் கோவிலின் தலபுராணம் என்னவென்றால், நிரவாங்கி கிராமத்திற்கு அருகில் சம்பு மகாதேவரின் மூலஸ்தானம் இருந்தது. இப்பகுதியில் இருந்த பசுமையும், தோட்டங்களும் மகாதேவரின் வாகனமான நந்திக்கு மிகவும் பிடித்திருந்தது. அடிக்கடி இந்த நந்தி தோட்டங்களுக்குள் மேய்வதற்குச் சென்றுவிடும். நந்தி தோட்டத்திற்குள் நுழைவதால் காய்கறிகள் நாசமடையும் என்ற பயத்தில், பலர் அதை விரட்டியடித்தனர். நந்திக்கு நேர்ந்த தொடர் அவமானத்தைத் தாங்க முடியாத மகாதேவர், நந்தியை அழைத்துக்கொண்டு சிகர் சிங்கப்பூருக்குச் சென்றார். ஆனால் நிரவாங்கி பகுதியின் மீது கொண்ட பற்றினால், நந்தி மீண்டும் மீண்டும் இப்பகுதிக்கே வந்தது. நந்தியின் இப்பகுதி மீதான அன்பைக் கண்ட மகாதேவர், நிரவாங்கியில் நந்திக்காகத் தங்குவதற்கு ஏற்பாடு செய்தார். இந்த இடமே நந்திகேஸ்வரர் கோவில் ஆகும்.
மற்றொரு கதையின்படி, இப்பகுதியில் படையெடுப்பாளர்கள் அழிவை ஏற்படுத்தி வந்தனர். ஒருமுறை அவர்களின் பார்வை நந்திகேஸ்வரர் கோவிலின் மீது விழுந்தது. அந்தப் படையெடுப்பாளர்களில் ஒருவன், தன் கையில் இருந்த ஆயுதத்தால் நந்தி சிலையின் மீது முதல் தாக்குதலை நடத்தினான். இந்தத் தாக்குதலால் நந்தியின் முதுகில் காயம் ஏற்பட்டு ரத்தம் வழிந்தது. பாறைச் சிலையிலிருந்து ரத்தம் வருவதைக் கண்டு பயந்த படையெடுப்பாளர்கள் அங்கிருந்து ஓடிவிட்டனர். இந்தக் கதைக்கு ஆதாரமாக நந்தியின் முதுகின் இடது பக்கத்தில் உள்ள ஒரு ஆழமான பள்ளம் காட்டப்படுகிறது. சிகர் சிங்கப்பூரில் உள்ள மகாதேவரைத் தரிசிக்கச் செல்வதற்கு முன்பு, இங்குள்ள நந்தியைத் தரிசித்துவிட்டுச் செல்வது மரபாகும்.
இந்தக் கோவிலின் வரலாறு எழுத்துப்பூர்வமாக இல்லாவிட்டாலும், இங்குள்ள தெளிவற்ற
கல்வெட்டுகள் மற்றும் கோவிலின் கட்டடக்கலை அமைப்பைக் கொண்டு, இது சுமார் எண்ணூறு ஆண்டுகள் பழமையானது என்று ஆய்வாளர்கள் கூறுகின்றனர். பீமா, கர்ஹா மற்றும் நீரா நதிப் படுகைகளில் சாளுக்கியர் காலத்திலிருந்தே இத்தகைய கோவில்கள் கட்டப்பட்டதற்கான சான்றுகள் உள்ளன. அவற்றில் பலஸ்தேவில் உள்ள பலஸ்தேவர் கோவிலுடன் இந்த கோவில் ஒத்திருப்பதாகக் கூறப்படுகிறது. இந்த கோவிலைப் போலவே புரந்தர், நாராயண்பூர் மற்றும் லோனி பாப்கர் ஆகிய பகுதிகளிலும் இத்தகைய கட்டடக்கலை பாணியிலான கோவில்கள் உள்ளன.
நிரவாங்கி கிராமத்திலிருந்து சற்று தொலைவில், அடர்ந்த மரங்களுக்கு இடையே நந்திகேஸ்வரர் கோவில் அமைந்துள்ளது. விசாலமான முற்றத்தின் நடுவில் அமைந்துள்ள இந்த கோவில், திறந்த மண்டபம், நந்தி மண்டபம், சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை ஆகிய அமைப்புகளைக் கொண்டுள்ளது. மூலக் கோவிலுக்கு முன்னால், சமீபகாலமாக பக்தர்களின் வசதிக்காகத் திறந்தவெளி மண்டபம் கட்டப்பட்டுள்ளது. இந்த மண்டபத்தின் வழியாக நந்தி மண்டபத்திற்குள் நுழையலாம். நான்கு கல் தூண்கள், அதன் மேல் கூரை கொண்ட இந்த நந்தி மண்டபத்தின் நடுவில் பிரம்மாண்டமான நந்தி சிலை உள்ளது. நந்தி மண்டபத்திற்கு முன்னால் சபா மண்டபத்தின் நுழைவாயில் உள்ளது. இந்த நுழைவாயிலின் மேல் பகுதியில் விநாயகர் சிலையும், கீழ் பகுதியில்
ஆயுதம் ஏந்திய வாயிற்காவலர்களும் உள்ளனர். நுழைவாயிலின் பக்கவாட்டில் செதுக்கல்கள் மற்றும் கீழ் பகுதியில் வரவேற்பாளர்கள், பிற ஆண் மற்றும் பெண் சிலைகள் (சுவர் சிற்பங்கள்) உள்ளன.
இந்த நுழைவாயில் வழியாக கோவிலின் உட்புற சபா மண்டபத்திற்குள் (கூட மண்டபம்) நுழையலாம். சபா மண்டபத்தில் நான்கு வேலைப்பாடுகள் கொண்ட கல் தூண்கள் உள்ளன. இந்தத் தூண்களின் நடுவில் ஆமைச் சிற்பம் உள்ளது. சபா மண்டபத்தில் காற்று வசதிக்காக நுழைவாயிலுக்கு அருகில் உள்ள சுவர்களில் தனித்துவமான கல் ஜன்னல் அமைப்பு உள்ளது. இந்த ஜன்னல்களில் உள்ள சதுரங்களில் கல் மலர்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. சபா மண்டபத்தின் சுவர்களில் உள்ள தேவகோஷ்டங்களில் கணபதி மற்றும் மகாதேவரின் சிலைகள் உள்ளன. சபா மண்டபத்தின் நுழைவாயிலைப் போலவே கருவறையின் நுழைவாயிலும் அமைக்கப்பட்டுள்ளது. அங்குள்ள சிற்பங்களைப் போலவே இங்கும் சிற்பங்கள் உள்ளன. கருவறையில் தரையின் நடுவில் சுயம்பு சிவலிங்கம் உள்ளது. சபா மண்டபத்தின் மேல் சிறிய கோபுரமும், கருவறையின் மேல் பிரதானமான மற்றும் உயரமான கோபுரமும் உள்ளன. கருவறையின் கோபுரம் புதிதாகக் கட்டப்பட்டதாகும்.
மகா சிவராத்திரி மற்றும் சிராவண மாதத்தின் ஒவ்வொரு திங்கட்கிழமையிலும் இங்கு விழாக்கள் கொண்டாடப்படுகின்றன. கோவிலின் திருவிழா சிராவண மாதத்தின் கடைசி திங்கட்கிழமையன்று நடைபெறுகிறது. இந்தாப்பூர் வட்டத்தில் நடைபெறும் பெரிய திருவிழாக்களில் இதுவும் ஒன்று. இந்த நேரத்தில் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இறைவனைத் தரிசிக்கவும், நேர்த்திக்கடன் செலுத்தவும் இங்கு வருகிறார்கள்.
பயனுள்ள தகவல்கள்
- இந்தாப்பூரிலிருந்து ௨௫ கி.மீ, புனையிலிருந்து ௧௪௦ கி.மீ தொலைவில்
- இந்தாப்பூர் மற்றும் நாதேபுதிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவு உண்பதற்கும் வசதிகள் இல்லை
నందికేశ్వర ఆలయం
నిర్వాంగి, తా. ఇందాపుర, జి. పుణె

ఇందాపుర తాలూకాలో నీరా నదీ తీరాన వెలసిన నిర్వాంగి గ్రామంలో నందికేశ్వర మహాదేవుని ప్రాచీన మరియు ప్రసిద్ధ ఆలయం ఉంది. దట్టమైన అడవిలో ఉన్న ఈ ఆలయం యొక్క ప్రత్యేకత ఏమిటంటే, ఇక్కడ ఉన్న భారీ నంది విగ్రహం. ఈ నంది కారణంగానే ఈ ప్రాంతం భక్తులలో నందికేశ్వరునిగా ప్రసిద్ధి చెందింది. వేలాది మంది భక్తుల శ్రద్ధా కేంద్రమైన ఈ ఆలయం సుమారు ౭౦౦ ఏళ్ల క్రితం నాటిదని చెబుతారు. శ్రావణ మాసంలోని చివరి సోమవారం ఇక్కడ జరిగే జాతర సమయంలో, రాష్ట్రంలోని వివిధ జిల్లాల నుండి వేలాది మంది భక్తులు దర్శనం కోసం వస్తారు.
మహాదేవుని వాహనమైన నంది భక్తికి మరియు శక్తికి ప్రతీకగా పరిగణించబడుతుంది. శివ దర్బారుకు ద్వారపాలకుడిగా భావించే ఈ నంది, మహాదేవుని ముఖ్య గణాలలో ఒకరు. మహాదేవుడు నందికి ఒక వరం ఇచ్చాడు, అదేమిటంటే, ధ్యానంలో ఉన్నప్పుడు భక్తులు తమ కోరికను నీ చెవిలో చెబితే, అది తప్పకుండా నాకు చేరుతుందని. ఆ విధంగా, మహాదేవుడు ధ్యానంలో ఉన్నప్పుడల్లా పార్వతీ దేవి నంది చెవిలో సందేశాన్ని చెప్పేది. అందుకే నేటికీ చాలా మంది భక్తులు తమ కోరికలను
మహాదేవుని పిండి (లింగం) ముందు చెప్పడానికి బదులుగా నంది చెవిలో చెబుతారు. నంది చెవిలో చెప్పిన కోరికను మహాదేవుడు నెరవేరుస్తాడని భక్తుల నమ్మకం. అందుకే మహాదేవుని ఆలయంలోకి ప్రవేశించేటప్పుడు నందిని పూజించడం ఆచారంగా ఉంది.
నందికేశ్వర ఆలయ పురాణం ప్రకారం, నిర్వాంగి గ్రామానికి సమీపంలో శంభు మహాదేవుని మూల స్థానం ఉండేది. ఈ ప్రాంతంలోని పచ్చదనం మరియు తోటల వల్ల మహాదేవుని వాహనమైన నందికి ఈ ప్రాంతం ఎంతో ఇష్టంగా ఉండేది. తరచుగా ఈ నంది తోటల్లోకి మేత కోసం వెళ్లేది. నంది తోటల్లోకి రావడం వల్ల తమ కూరగాయలు నాశనమవుతాయని భయపడి, చాలా మంది దానిని తరిమివేసేవారు. నందికి జరుగుతున్న అవమానాన్ని భరించలేక, మహాదేవుడు నందిని తీసుకుని శిఖర శింగణాపూర్ వెళ్ళిపోయాడు. కానీ నిర్వాంగి ప్రాంతంపై మక్కువతో నంది మళ్లీ మళ్లీ ఈ ప్రాంతానికే వచ్చేది. నందికి ఈ ప్రాంతంపై ఉన్న ప్రేమను చూసి, మహాదేవుడు నిర్వాంగిలోనే నంది నివాసానికి ఏర్పాట్లు చేశాడు. ఈ స్థలమే ఇక్కడి నందికేశ్వర ఆలయం.
మరొక కథనం ప్రకారం, ఈ ప్రాంతంలో ఆక్రమణదారుల విధ్వంసం జరుగుతుండేది. ఒకసారి వారి దృష్టి నందికేశ్వర ఆలయంపై పడింది. ఆక్రమణదారులలో ఒకడు తన చేతిలోని ఆయుధంతో నంది విగ్రహంపై మొదటి దెబ్బ కొట్టాడు. ఆ దెబ్బకు నంది వీపుపై గాయంలాంటి గుంత ఏర్పడి, దాని నుండి రక్తం కారడం మొదలైంది. రాతి విగ్రహం నుండి రక్తం రావడం చూసి ఆక్రమణదారులు భయపడి అక్కడి నుండి పారిపోయారు. ఈ కథకు ఆధారంగా నంది వీపుపై ఎడమ వైపున ఉన్న లోతైన గుంతను చూపిస్తారు. శిఖర శింగణాపూర్ లోని మహాదేవుని దర్శనానికి వెళ్లే ముందు, ఇక్కడి నందిని దర్శించుకున్నాకే ముందుకు వెళ్లాలనేది ఆచారం.
ఈ ఆలయానికి సంబంధించి లిఖితపూర్వక చరిత్ర అందుబాటులో లేకపోయినా, ఇక్కడి అస్పష్టమైన
శాసనాలు మరియు ఆలయ నిర్మాణ శైలిని బట్టి ఇది సుమారు ౮౦౦ ఏళ్ల క్రితం నాటిదని పరిశోధకులు పేర్కొంటున్నారు. భీమా, కర్హా మరియు నీరా నదీ లోయలలో చాళుక్యుల కాలం నుండి ఇటువంటి ఆలయాల నిర్మాణం జరిగిందని ఆధారాలు ఉన్నాయి. వాటిలో పలసదేవ్ లోని పలసనాథ ఆలయంతో ఈ ఆలయానికి పోలికలు ఉన్నాయని చెబుతారు. ఈ ఆలయం వలెనే పురందర్, నారాయణపూర్ మరియు లోణి భాప్కర్ ప్రాంతాలలో కూడా ఇటువంటి నిర్మాణ శైలి కలిగిన ఆలయాలు ఉన్నాయి.
నిర్వాంగి గ్రామానికి కొంత దూరంలో, దట్టమైన చెట్ల మధ్య నందికేశ్వర ఆలయం ఉంది. విశాలమైన ప్రాంగణంలో మధ్యలో ఉన్న ఈ ఆలయం ఓపెన్ మండపం, నంది మండపం, సభా మండపం, అంతరాళం మరియు గర్భాలయం అనే విభాగాలతో నిర్మించబడింది. మూల ఆలయం ముందు ఇటీవల భక్తుల సౌకర్యార్థం ఓపెన్ మండపాన్ని నిర్మించారు. ఈ మండపం ద్వారా నంది మండపంలోకి ప్రవేశిస్తారు. నాలుగు రాతి స్తంభాలు, పైన కప్పు ఉన్న ఈ నంది మండపంలో మధ్యలో భారీ నంది రాతి విగ్రహం ఉంది. నంది మండపానికి ముందు భాగంలో సభా మండపం ప్రవేశ ద్వారం ఉంది. ఈ ప్రవేశ ద్వారం పైన గణేశ విగ్రహం మరియు కింది భాగంలో
ఆయుధధారులైన ద్వారపాలకులు ఉన్నారు. ద్వారబంధాల మీద చెక్కడాలు మరియు కింది భాగంలో స్వాగతించే స్త్రీలు, ఇతర స్త్రీ పురుషుల శిల్పాలు (మ్యూరల్స్) ఉన్నాయి.
ఈ ప్రవేశ ద్వారం గుండా ఆలయ సభా మండపంలోకి (గూఢ మండపం) ప్రవేశిస్తారు. సభా మండపంలో నాలుగు అలంకరించబడిన రాతి స్తంభాలు ఉన్నాయి. ఈ స్తంభాల మధ్యలో తాబేలు శిల్పం ఉంది. సభా మండపంలో గాలి ప్రసరణ కోసం ప్రవేశ ద్వారం పక్కన ఉన్న గోడలలో ప్రత్యేకమైన రాతి జాలీ నిర్మాణం ఉంది. ఈ జాలీలోని చతురస్రాలలో రాతి పూలు ఉన్నాయి. సభా మండపం గోడలలోని దేవకోష్టకాలలో గణపతి మరియు మహాదేవుని విగ్రహాలు ఉన్నాయి. సభా మండపం ప్రవేశ ద్వారం వలెనే గర్భాలయ ప్రవేశ ద్వారం కూడా నిర్మించబడింది. అక్కడ ఉన్న శిల్పాల వలెనే ఇక్కడ కూడా శిల్పాలు ఉన్నాయి. గర్భాలయంలో నేలపై మధ్యలో స్వయంభూ శివలింగం ఉంది. ఇక్కడి సభా మండపంపై చిన్న శిఖరం మరియు గర్భాలయంపై ప్రధానమైన మరియు ఎత్తైన శిఖరం ఉన్నాయి. గర్భాలయంపై ఉన్న శిఖరం కొత్తగా నిర్మించబడింది.
మహాశివరాత్రి మరియు శ్రావణంలోని ప్రతి సోమవారం ఇక్కడ ఉత్సవాలు జరుగుతాయి. ఆలయ జాతర శ్రావణంలోని చివరి సోమవారం జరుగుతుంది. ఇందాపుర తాలూకాలోని పెద్ద జాతరలలో ఇది ఒకటి. ఈ సమయంలో వేలాది మంది భక్తులు దైవ దర్శనం కోసం మరియు మొక్కులు తీర్చుకోవడానికి ఇక్కడికి వస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- ఇందాపుర నుండి ౨౫ కి.మీ, పుణె నుండి ౧౪౦ కి.మీ దూరంలో
- ఇందాపుర మరియు నాటెపుతే నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- ఈ ప్రాంతంలో వసతి మరియు భోజన సౌకర్యాలు లేవు
നന്ദികേശ്വര ക്ഷേത്രം
നിരവാംഗി, താലൂക്ക് ഇന്ദാപൂർ, ജില്ല പൂനെ

ഇന്ദാപൂർ താലൂക്കിൽ നീരാ നദിയുടെ തീരത്ത് സ്ഥിതി ചെയ്യുന്ന നിരവാംഗി ഗ്രാമത്തിലാണ് നന്ദികേശ്വര മഹാദേവന്റെ പുരാതനവും പ്രശസ്തവുമായ ക്ഷേത്രമുള്ളത്. ഇടതൂർന്ന വനപ്രദേശത്തുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രത്യേകത ഇവിടുത്തെ ഭീമാകാരമായ നന്ദി വിഗ്രഹമാണ്. ഈ നന്ദിയിൽ നിന്നാണ് ഈ സ്ഥലത്തിന് നന്ദികേശ്വരൻ എന്ന പേര് ലഭിച്ചത്. ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെ ആരാധനാകേന്ദ്രമായ ഈ ക്ഷേത്രത്തിന് ഏകദേശം എഴുനൂറ് വർഷത്തെ പഴക്കമുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ശ്രാവണ മാസത്തിലെ അവസാന തിങ്കളാഴ്ച നടക്കുന്ന ഉത്സവത്തിന് സംസ്ഥാനത്തിന്റെ വിവിധ ജില്ലകളിൽ നിന്ന് ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദർശനത്തിനായി ഇവിടെ എത്തുന്നു.
മഹാദേവന്റെ വാഹനമായ നന്ദി ഭക്തിയുടെയും ശക്തിയുടെയും പ്രതീകമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ശിവദർബാറിലെ ദ്വാരപാലകനായി കരുതപ്പെടുന്ന ഈ നന്ദി മഹാദേവന്റെ പ്രധാന ഗണങ്ങളിൽ ഒരാളാണ്. മഹാദേവൻ നന്ദിക്ക് ഒരു വരം നൽകിയിരുന്നു; താൻ ധ്യാനമഗ്നനായിരിക്കുമ്പോൾ ഏതെങ്കിലും ഭക്തൻ തന്റെ ആഗ്രഹം നിന്റെ ചെവിയിൽ പറഞ്ഞാൽ അത് തന്നിൽ എത്തിച്ചേരുമെന്ന്. ഇതനുസരിച്ച്, മഹാദേവൻ ധ്യാനമഗ്നനായിരിക്കുമ്പോൾ പാർവതി നന്ദിയുടെ ചെവിയിൽ സന്ദേശങ്ങൾ അറിയിക്കുമായിരുന്നു. അതുകൊണ്ടാണ് ഇന്നും പല ഭക്തരും തങ്ങളുടെ ആഗ്രഹങ്ങൾ
മഹാദേവന്റെ പിണ്ടിക്ക് മുന്നിൽ പറയുന്നതിന് പകരം നന്ദിയുടെ ചെവിയിൽ പറയുന്നത്. നന്ദിയുടെ ചെവിയിൽ പറയുന്ന ആഗ്രഹം മഹാദേവൻ നിറവേറ്റുമെന്നാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം. അതിനാൽ മഹാദേവ ക്ഷേത്രത്തിൽ പ്രവേശിക്കുമ്പോൾ നന്ദിയെ പൂജിക്കുന്നത് പതിവാണ്.
നന്ദികേശ്വര ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം ഇതാണ്: നിരവാംഗി ഗ്രാമത്തിന് സമീപമായിരുന്നു ശംഭു മഹാദേവന്റെ മൂലസ്ഥാനം. ഈ പ്രദേശത്തെ പച്ചപ്പും കൃഷിയിടങ്ങളും കാരണം ശംഭു മഹാദേവന്റെ വാഹനമായ നന്ദിക്ക് ഈ സ്ഥലം വളരെ ഇഷ്ടമായിരുന്നു. പലപ്പോഴും ഈ നന്ദി കൃഷിയിടങ്ങളിൽ മേയാൻ കയറുമായിരുന്നു. നന്ദി കൃഷിയിടത്തിൽ കയറി പച്ചക്കറികൾ നശിപ്പിക്കുമെന്ന് ഭയന്ന് പലരും അതിനെ ഓടിക്കുമായിരുന്നു. നന്ദിയോടുള്ള നിരന്തരമായ അപമാനം സഹിക്കാനാവാതെ മഹാദേവൻ നന്ദിയെയും കൂട്ടി ശിഖർ ശിങ്കണാപ്പൂരിലേക്ക് പോയി. എന്നാൽ നിരവാംഗിയിലെ പ്രദേശം ഇഷ്ടപ്പെട്ടതുകൊണ്ട് നന്ദി വീണ്ടും വീണ്ടും ഈ പ്രദേശത്തേക്ക് വരാറുണ്ടായിരുന്നു. നന്ദിക്ക് ഈ പ്രദേശത്തോടുള്ള സ്നേഹം കണ്ട് മഹാദേവൻ നിരവാംഗിയിൽ തന്നെ നന്ദിക്കായി താമസസൗകര്യം ഒരുക്കി. ഈ സ്ഥലമാണ് ഇവിടുത്തെ നന്ദികേശ്വര ക്ഷേത്രം.
മറ്റൊരു ഐതിഹ്യമനുസരിച്ച്, ഈ പ്രദേശത്ത് അക്രമികൾ നാശം വിതയ്ക്കുകയായിരുന്നു. ഒരിക്കൽ അവരുടെ ശ്രദ്ധ നന്ദികേശ്വര ക്ഷേത്രത്തിൽ പതിഞ്ഞു. ഈ അക്രമികളിൽ ഒരാൾ തന്റെ കൈവശമുണ്ടായിരുന്ന ആയുധം കൊണ്ട് നന്ദിയുടെ വിഗ്രഹത്തിൽ ആദ്യത്തെ വെട്ട് വെട്ടി. ഈ മുറിവ് കാരണം നന്ദിയുടെ പുറത്ത് ഒരു വ്രണം പോലെ കുഴി ഉണ്ടാവുകയും അതിൽ നിന്ന് രക്തം ഒഴുകുകയും ചെയ്തു. ശിലാവിഗ്രഹത്തിൽ നിന്ന് രക്തം വരുന്നത് കണ്ട് അക്രമികൾ ഭയന്ന് അവിടെ നിന്ന് ഓടിപ്പോയി. ഈ കഥയ്ക്ക് തെളിവായി നന്ദിയുടെ പുറത്ത് ഇടതുവശത്തുള്ള ഒരു ആഴത്തിലുള്ള കുഴി കാണിച്ചുതരുന്നു. ശിഖർ ശിങ്കണാപ്പൂരിലെ മഹാദേവനെ ദർശിക്കാൻ പോകുന്നതിന് മുമ്പ് ഇവിടുത്തെ നന്ദിയെ ദർശിച്ചതിന് ശേഷം മാത്രമേ മുന്നോട്ട് പോകാവൂ എന്നാണ് നിയമം.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ രേഖാമൂലമുള്ള ചരിത്രം ലഭ്യമല്ലെങ്കിലും, ഇവിടുത്തെ അവ്യക്തമായ
ശിലാലിഖിതങ്ങളും ക്ഷേത്രത്തിന്റെ വാസ്തുവിദ്യയും വെച്ച് ഇത് ഏകദേശം എണ്ണൂറ് വർഷം പഴക്കമുള്ളതാണെന്ന് പണ്ഡിതന്മാർ അവകാശപ്പെടുന്നു. ഭീമ, കറ, നീരാ നദീതടങ്ങളിൽ ചാലൂക്യ കാലഘട്ടം മുതൽ ഇത്തരം ക്ഷേത്രങ്ങൾ നിർമ്മിക്കപ്പെട്ടിരുന്നു എന്നതിന് തെളിവുകളുണ്ട്. അതിൽ പലസ്ദേവിലെ പലസ്നാഥ് ക്ഷേത്രവുമായി ഈ ക്ഷേത്രത്തിന് സാമ്യമുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തെപ്പോലെ തന്നെ പുരന്ദർ, നാരായൺപൂർ, ലോണി ഭാപ്കർ എന്നീ പ്രദേശങ്ങളിലും ഇത്തരം വാസ്തുശൈലിയിലുള്ള ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്.
നിരവാംഗി ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് അല്പം മാറി ഇടതൂർന്ന മരങ്ങൾക്കിടയിലാണ് നന്ദികേശ്വര ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. വിശാലമായ മുറ്റത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന തുറന്ന മണ്ഡപം, നന്ദി മണ്ഡപം, സഭാ മണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ്. മൂലക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ അടുത്ത കാലത്തായി ഭക്തരുടെ സൗകര്യാർത്ഥം തുറന്ന രീതിയിലുള്ള മണ്ഡപം നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. ഈ മണ്ഡപത്തിലൂടെ നന്ദി മണ്ഡപത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. നാല് കൽത്തൂണുകളും അതിനു മുകളിൽ മേൽക്കൂരയുമുള്ള ഈ നന്ദി മണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് ഭീമാകാരമായ നന്ദിയുടെ ശിലാവിഗ്രഹമുണ്ട്. നന്ദി മണ്ഡപത്തിന് അഭിമുഖമായി സഭാ മണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടമുണ്ട്. ഈ കവാടത്തിന്റെ ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതി വിഗ്രഹവും താഴെയായി
ആയുധധാരികളായ ദ്വാരപാലകരുമുണ്ട്. കവാടത്തിന്റെ തൂണുകളിൽ കൊത്തുപണികളും താഴെയായി സ്വാഗതം ചെയ്യുന്ന സ്ത്രീകളുടെയും പുരുഷന്മാരുടെയും ശില്പങ്ങളുമുണ്ട്.
ഈ കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്രത്തിന്റെ അടച്ചിട്ട സഭാ മണ്ഡപത്തിലേക്ക് (ഗൂഢമണ്ഡപം) പ്രവേശിക്കാം. സഭാ മണ്ഡപത്തിൽ നാല് കൊത്തുപണികളുള്ള കൽത്തൂണുകളുണ്ട്. ഈ തൂണുകളുടെ മധ്യഭാഗത്ത് ആമയുടെ ശില്പമുണ്ട്. സഭാ മണ്ഡപത്തിൽ വായുസഞ്ചാരത്തിനായി കവാടത്തിന് സമീപമുള്ള ഭിത്തികളിൽ പ്രത്യേക കൽജാലികാ ഘടനയുണ്ട്. ഈ ജാലികയിലെ ചതുരങ്ങളിൽ കൽപ്പൂക്കളുണ്ട്. സഭാ മണ്ഡപത്തിന്റെ ഭിത്തികളിലുള്ള ദേവകോഷ്ഠങ്ങളിൽ ഗണപതിയുടെയും മഹാദേവന്റെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. സഭാ മണ്ഡപത്തിന്റെ കവാടം പോലെ തന്നെയാണ് ഗർഭഗൃഹത്തിന്റെ കവാടവും. അവിടെയുള്ള ശില്പങ്ങൾ പോലെ തന്നെ ഇവിടെയും ശില്പങ്ങളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ തറയിൽ മധ്യഭാഗത്തായി സ്വയംഭൂ ശിവലിംഗമുണ്ട്. ഇവിടുത്തെ സഭാ മണ്ഡപത്തിന് മുകളിൽ ചെറിയ ശിഖരവും ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിൽ പ്രധാനവും ഉയരമുള്ളതുമായ ശിഖരവുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിലുള്ള ശിഖരം പുതുതായി നിർമ്മിച്ചതാണ്.
മഹാശിവരാത്രിയിലും ശ്രാവണ മാസത്തിലെ എല്ലാ തിങ്കളാഴ്ചകളിലും ഇവിടെ ഉത്സവങ്ങൾ ആഘോഷിക്കുന്നു. ശ്രാവണ മാസത്തിലെ അവസാന തിങ്കളാഴ്ചയാണ് ക്ഷേത്രത്തിലെ ഉത്സവം. ഇന്ദാപൂർ താലൂക്കിലെ വലിയ ഉത്സവങ്ങളിൽ ഒന്നാണിത്. ഈ സമയത്ത് ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദൈവത്തെ ദർശിക്കാനും നേർച്ചകൾ നിറവേറ്റാനും ഇവിടെ എത്തുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ഇന്ദാപൂരിൽ നിന്ന് ൨൫ കി.മീ, പൂനെയിൽ നിന്ന് ൧൪൦ കി.മീ അകലെ
- ഇന്ദാപൂർ, നാതേപുതേ എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
ನಂದಿಕೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ
ನಿರವಂಗಿ, ತಾ. ಇಂದಾಪುರ, ಜಿ. ಪುಣೆ

ಇಂದಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ನೀರಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ನಿರವಂಗಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಂದಿಕೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ಪ್ರಾಚೀನ ಮತ್ತು ಪ್ರಸಿದ್ಧ ದೇವಾಲಯವಿದೆ. ದಟ್ಟವಾದ ಅರಣ್ಯದ ನಡುವೆ ಇರುವ ಈ ದೇವಾಲಯದ ವಿಶೇಷತೆಯೆಂದರೆ ಇಲ್ಲಿನ ಬೃಹತ್ ನಂದಿಯ ವಿಗ್ರಹ. ಇದೇ ನಂದಿಯಿಂದಾಗಿ ಈ ಸ್ಥಳವು ಭಕ್ತರಲ್ಲಿ ನಂದಿಕೇಶ್ವರ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿರುವ ಈ ದೇವಾಲಯವು ಸುಮಾರು ೭೦೦ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ ಕೊನೆಯ ಸೋಮವಾರದಂದು ಇಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಜಾತ್ರೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದ ವಿವಿಧ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ.
ಮಹಾದೇವನ ವಾಹನವಾದ ನಂದಿಯು ಭಕ್ತಿ ಮತ್ತು ಶಕ್ತಿಯ ಸಂಕೇತವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಶಿವ ದರ್ಬಾರದ ದ್ವಾರಪಾಲಕನೆಂದು ನಂಬಲಾದ ಈ ನಂದಿಯು ಮಹಾದೇವನ ವಿಶೇಷ ಗಣಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬನಾಗಿದ್ದಾನೆ. ಮಹಾದೇವನು ನಂದಿಗೆ ವರವೊಂದನ್ನು ನೀಡಿದ್ದನು; ಅದೇನೆಂದರೆ, ತಾನು ಧ್ಯಾನಮಗ್ನನಾಗಿದ್ದಾಗ ಯಾವುದೇ ಭಕ್ತನು ತನ್ನ ಇಷ್ಟಾರ್ಥವನ್ನು ನಿನ್ನ ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದರೆ, ಅದು ತನಗೆ ತಲುಪುತ್ತದೆ ಎಂದು. ಅದರಂತೆ, ಮಹಾದೇವನು ಯಾವಾಗಲೆಲ್ಲಾ ಧ್ಯಾನಮಗ್ನನಾಗಿರುತ್ತಿದ್ದನೋ, ಆಗ ಪಾರ್ವತಿಯು ನಂದಿಯ ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಸಂದೇಶವನ್ನು ಹೇಳುತ್ತಿದ್ದಳು. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಇಂದಿಗೂ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ತಮ್ಮ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು
ಮಹಾದೇವನ ಪಿಂಡಿಯ ಮುಂದೆ ಹೇಳುವ ಬದಲು ನಂದಿಯ ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತಾರೆ. ನಂದಿಯ ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದ ಇಷ್ಟಾರ್ಥವನ್ನು ಮಹಾದೇವನು ಪೂರೈಸುತ್ತಾನೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಆದ್ದರಿಂದಲೇ ಮಹಾದೇವನ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸುವಾಗ ನಂದಿಯ ಪೂಜೆಯನ್ನು ತಪ್ಪದೇ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ.
ನಂದಿಕೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ನಿರವಂಗಿ ಗ್ರಾಮದ ಸಮೀಪ ಶಂಭು ಮಹಾದೇವನ ಮೂಲ ಸ್ಥಾನವಿತ್ತು. ಈ ಪ್ರದೇಶದ ಹಸಿರು ಮತ್ತು ತೋಟಗಳಿಂದಾಗಿ ಶಂಭು ಮಹಾದೇವನ ವಾಹನವಾದ ನಂದಿಗೂ ಈ ಪರಿಸರ ಬಹಳ ಇಷ್ಟವಾಗಿತ್ತು. ಅನೇಕ ಬಾರಿ ಈ ನಂದಿಯು ಇಲ್ಲಿನ ತೋಟಗಳಲ್ಲಿ ಮೇಯಲು ನುಸುಳುತ್ತಿತ್ತು. ನಂದಿಯು ತೋಟಕ್ಕೆ ನುಗ್ಗುವುದರಿಂದ ತರಕಾರಿಗಳು ಹಾಳಾಗುತ್ತವೆ ಎಂಬ ಭಯದಿಂದ ಅನೇಕರು ಅದನ್ನು ಓಡಿಸುತ್ತಿದ್ದರು. ನಂದಿಗೆ ಆಗುತ್ತಿದ್ದ ನಿರಂತರ ಅವಮಾನವನ್ನು ಸಹಿಸಲಾಗದೆ, ಮಹಾದೇವನು ನಂದಿಯನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ಶಿಖರ ಶಿಂಗಣಾಪುರಕ್ಕೆ ಹೋದನು. ಆದರೆ ನಿರವಂಗಿಯ ಪರಿಸರ ಇಷ್ಟವಾಗಿದ್ದರಿಂದ, ಈ ನಂದಿಯು ಅಲ್ಲಿಂದ ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಇದೇ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಬರುತ್ತಿತ್ತು. ನಂದಿಗೆ ಈ ಪ್ರದೇಶದ ಮೇಲಿರುವ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಕಂಡು, ಮಹಾದೇವನು ನಿರವಂಗಿಯಲ್ಲಿಯೇ ಈ ನಂದಿಗಾಗಿ ವಾಸಸ್ಥಾನವನ್ನು ಕಲ್ಪಿಸಿದನು. ಈ ಸ್ಥಳವೇ ಇಲ್ಲಿನ ನಂದಿಕೇಶ್ವರ ದೇವಾಲಯವಾಗಿದೆ.
ಮತ್ತೊಂದು ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಆಕ್ರಮಣಕಾರರಿಂದ ಧ್ವಂಸ ಕಾರ್ಯ ನಡೆಯುತ್ತಿತ್ತು. ಒಮ್ಮೆ ಅವರ ಕಣ್ಣು ನಂದಿಕೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ಮೇಲೆ ಬಿತ್ತು. ಈ ಆಕ್ರಮಣಕಾರರಲ್ಲಿ ಒಬ್ಬನು ತನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿದ್ದ ಆಯುಧದಿಂದ ನಂದಿಯ ವಿಗ್ರಹದ ಮೇಲೆ ಮೊದಲ ಪ್ರಹಾರ ಮಾಡಿದನು. ಈ ಗಾಯದಿಂದಾಗಿ ನಂದಿಯ ಬೆನ್ನಿನ ಮೇಲೆ ಗಾಯದಂತಹ ತಗ್ಗು ಉಂಟಾಗಿ ಅದರಿಂದ ರಕ್ತ ಹರಿಯತೊಡಗಿತು. ಕಲ್ಲಿನ ವಿಗ್ರಹದಿಂದ ರಕ್ತ ಬರುವುದನ್ನು ಕಂಡು ಆಕ್ರಮಣಕಾರರು ಭಯಭೀತರಾಗಿ ಅಲ್ಲಿಂದ ಓಡಿಹೋದರು. ಈ ಕಥೆಗೆ ಆಧಾರವಾಗಿ ನಂದಿಯ ಬೆನ್ನಿನ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಆಳವಾದ ತಗ್ಗು ಪ್ರದೇಶವನ್ನು ತೋರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಶಿಖರ ಶಿಂಗಣಾಪುರದ ಮಹಾದೇವನ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೋಗುವ ಮುನ್ನ ಇಲ್ಲಿನ ನಂದಿಯ ದರ್ಶನ ಪಡೆದು ನಂತರವೇ ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕೆಂಬ ನಿಯಮವಿದೆ.
ಈ ದೇವಾಲಯದ ಲಿಖಿತ ಇತಿಹಾಸ ಲಭ್ಯವಿಲ್ಲದಿದ್ದರೂ, ಇಲ್ಲಿನ ಅಸ್ಪಷ್ಟ
ಶಾಸನಗಳು ಮತ್ತು ದೇವಾಲಯದ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಇದು ಸುಮಾರು ೮೦೦ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದು ಎಂದು ಸಂಶೋಧಕರು ಪ್ರತಿಪಾದಿಸುತ್ತಾರೆ. ಭೀಮಾ, ಕರಹಾ ಮತ್ತು ನೀರಾ ನದಿ ಕಣಿವೆಗಳಲ್ಲಿ ಚಾಲುಕ್ಯರ ಕಾಲದಿಂದಲೂ ಇಂತಹ ದೇವಾಲಯಗಳ ನಿರ್ಮಾಣವಾಗುತ್ತ ಬಂದಿದೆ ಎಂಬುದಕ್ಕೆ ಪುರಾವೆಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಪಳಸದೇವದ ಪಳಸನಾಥ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಈ ದೇವಾಲಯವು ಹೋಲುತ್ತದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದೇವಾಲಯದಂತೆಯೇ ಪುರಂದರ, ನಾರಾಯಣಪುರ ಮತ್ತು ಲೋಣಿ ಭಾಪಕರ್ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಇಂತಹ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯ ದೇವಾಲಯಗಳಿವೆ.
ನಿರವಂಗಿ ಗ್ರಾಮದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಮತ್ತು ದಟ್ಟವಾದ ಮರಗಳ ನಡುವೆ ನಂದಿಕೇಶ್ವರ ದೇವಾಲಯವಿದೆ. ವಿಶಾಲವಾದ ಅಂಗಳದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯು ತೆರೆದ ಮಂಟಪ, ನಂದಿ ಮಂಟಪ, ಸಭಾ ಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹವನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದೆ. ಮೂಲ ದೇವಾಲಯದ ಮುಂದೆ ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ತೆರೆದ ಮಂಟಪವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಮಂಟಪದಿಂದ ನಂದಿ ಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಿದೆ. ನಾಲ್ಕು ಕಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳು, ಅದರ ಮೇಲೆ ಮೇಲ್ಛಾವಣಿ ಹೊಂದಿರುವ ಈ ನಂದಿ ಮಂಟಪದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಬೃಹತ್ ನಂದಿಯ ಕಲ್ಲಿನ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ನಂದಿ ಮಂಟಪದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಸಭಾ ಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ವಿಗ್ರಹ ಮತ್ತು ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ
ಶಸ್ತ್ರಧಾರಿ ದ್ವಾರಪಾಲಕರಿದ್ದಾರೆ. ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಕೆತ್ತನೆಗಳು ಮತ್ತು ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಸ್ವಾಗತಕಿಯರು, ಇತರ ಸ್ತ್ರೀ ಮತ್ತು ಪುರುಷರ ಉಬ್ಬು ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ.
ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ದೇವಾಲಯದ ಒಳಭಾಗದ ಸಭಾ ಮಂಟಪಕ್ಕೆ (ಗೂಢಮಂಟಪ) ಪ್ರವೇಶಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸಭಾ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಸುಂದರವಾದ ಕಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳಿವೆ. ಈ ಕಂಬಗಳ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಆಮೆಯ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಸಭಾ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಗಾಳಿಯಾಡಲು ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ಗೋಡೆಗಳಲ್ಲಿ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಕಲ್ಲಿನ ಜಾಲರಿಯ ರಚನೆಯಿದೆ. ಈ ಜಾಲರಿಯಲ್ಲಿರುವ ಚೌಕಗಳಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ಹೂವುಗಳಿವೆ. ಸಭಾ ಮಂಟಪದ ಗೋಡೆಗಳಲ್ಲಿರುವ ದೇವಕೋಷ್ಠಗಳಲ್ಲಿ ಗಣಪತಿ ಮತ್ತು ಮಹಾದೇವನ ವಿಗ್ರಹಗಳಿವೆ. ಸಭಾ ಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಂತೆಯೇ ಇಲ್ಲಿನ ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ರಚನೆಯಿದೆ. ಅಲ್ಲಿರುವ ಶಿಲ್ಪಗಳಂತೆಯೇ ಇಲ್ಲೂ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ನೆಲದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಸಭಾ ಮಂಟಪದ ಮೇಲೆ ಸಣ್ಣ ಶಿಖರ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲೆ ಮುಖ್ಯ ಹಾಗೂ ಎತ್ತರದ ಶಿಖರವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲಿನ ಶಿಖರವನ್ನು ಹೊಸದಾಗಿ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ.
ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಮತ್ತು ಶ್ರಾವಣದ ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರ ಇಲ್ಲಿ ಉತ್ಸವಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ದೇವಾಲಯದ ಜಾತ್ರೆಯು ಶ್ರಾವಣದ ಕೊನೆಯ ಸೋಮವಾರ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಇಂದಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಪ್ರಮುಖ ಜಾತ್ರೆಗಳಲ್ಲಿ ಇದೂ ಒಂದಾಗಿದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದೇವರ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಇಂದಾಪುರದಿಂದ ೨೫ ಕಿ.ಮೀ, ಪುಣೆಯಿಂದ ೧೪೦ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಇಂದಾಪುರ ಮತ್ತು ನಾತೆಪುತೆಯಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
নন্দিকেশ্বর মন্দির
নিরওয়াঙ্গি, তা. ইন্দাপুর, জি. পুণে

ইন্দাপুর তালুকায় নীরা নদীর তীরে অবস্থিত নিরওয়াঙ্গি গ্রামে নন্দিকেশ্বর মহাদেবের এক প্রাচীন ও বিখ্যাত মন্দির রয়েছে। ঘন বনভূমির মাঝে অবস্থিত এই মন্দিরের বিশেষত্ব হলো এখানকার বিশাল নন্দী মূর্তি। এই নন্দীর নামানুসারেই এই স্থানটি ভক্তদের কাছে নন্দিকেশ্বর নামে পরিচিত। হাজার হাজার ভক্তের শ্রদ্ধার কেন্দ্রবিন্দু এই মন্দিরটি প্রায় সাতশো বছরের পুরনো বলে কথিত আছে। শ্রাবণ মাসের শেষ সোমবারে এখানে আয়োজিত যাত্রার সময় রাজ্যের বিভিন্ন জেলা থেকে হাজার হাজার ভক্ত দর্শনের জন্য এখানে আসেন।
মহাদেবের বাহন নন্দী ভক্তি ও শক্তির প্রতীক হিসেবে বিবেচিত হন। শিব দরবারের দ্বারপাল হিসেবে পরিচিত এই নন্দী মহাদেবের বিশেষ গণদের মধ্যে অন্যতম। মহাদেব নন্দীকে বর দিয়েছিলেন যে, ধ্যানমগ্ন অবস্থায় কোনো ভক্ত যদি তার মনের ইচ্ছা তোমার কানে বলে, তবে তা আমার কাছে পৌঁছে যাবে। সেই অনুযায়ী, মহাদেব যখনই ধ্যানমগ্ন থাকতেন, তখন পার্বতী নন্দীর কানে বার্তা দিতেন। তাই আজও অনেক ভক্ত তাদের ইচ্ছা
মহাদেবের লিঙ্গের সামনে বলার পরিবর্তে নন্দীর কানে বলেন। ভক্তদের বিশ্বাস, নন্দীর কানে বলা ইচ্ছা মহাদেব পূর্ণ করেন। তাই মহাদেব মন্দিরে প্রবেশের সময় অবশ্যই নন্দীর পূজা করা হয়।
নন্দিকেশ্বর মন্দিরের কিংবদন্তি হলো, নিরওয়াঙ্গি গ্রামের কাছে শম্ভু মহাদেবের মূল স্থান ছিল। এই এলাকার সবুজ বনানী ও ক্ষেতের কারণে শম্ভু মহাদেবের বাহন নন্দীরও এই এলাকাটি খুব পছন্দ ছিল। প্রায়ই এই নন্দী ক্ষেতের ফসল খেতে ঢুকে পড়ত। নন্দী ক্ষেতে ঢুকে ফসল নষ্ট করবে এই ভয়ে অনেকে তাকে তাড়িয়ে দিত। নন্দীর ক্রমাগত অপমান সহ্য করতে না পেরে মহাদেব নন্দীকে নিয়ে শিখর শিংণাপুরে চলে যান। কিন্তু নিরওয়াঙ্গির এলাকাটি ভালো লাগায় এই নন্দী সেখান থেকে বারবার এই এলাকায় ফিরে আসত। নন্দীর এই এলাকার প্রতি ভালোবাসা দেখে মহাদেব নিরওয়াঙ্গিতেই এই নন্দীর থাকার ব্যবস্থা করেন। এই স্থানটিই হলো এখানকার নন্দিকেশ্বর মন্দির।
অন্য একটি কিংবদন্তি অনুযায়ী, এই এলাকায় আক্রমণকারীদের দ্বারা ধ্বংসলীলা চলছিল। একবার তাদের নজর পড়ে নন্দিকেশ্বর মন্দিরের ওপর। এই আক্রমণকারীদের মধ্যে একজন তার হাতের অস্ত্র দিয়ে নন্দীর মূর্তিতে প্রথম আঘাত করে। এই আঘাতের ফলে নন্দীর পিঠে ক্ষতের মতো গর্ত তৈরি হয় এবং সেখান থেকে রক্ত বের হতে থাকে। পাথরের মূর্তি থেকে রক্ত বের হতে দেখে আক্রমণকারীরা ভয় পেয়ে সেখান থেকে পালিয়ে যায়। এই গল্পের প্রমাণ হিসেবে নন্দীর পিঠের বাম দিকে একটি গভীর গর্ত দেখানো হয়। শিখর শিংণাপুরে মহাদেব দর্শনে যাওয়ার আগে এখানকার নন্দীর দর্শন করে তারপর এগিয়ে যাওয়ার রীতি রয়েছে।
এই মন্দিরের লিখিত ইতিহাস উপলব্ধ না থাকলেও, এখানকার অস্পষ্ট
শিলালিপি ও মন্দিরের স্থাপত্যশৈলী দেখে গবেষকদের দাবি যে এটি প্রায় আটশো বছরের পুরনো। ভীমা, কর্হা ও নীরা নদীর উপত্যকায় চালুক্য আমল থেকেই এই ধরনের মন্দির নির্মাণের প্রমাণ পাওয়া যায়। তার মধ্যে পলসদেবের পলসনাথ মন্দিরের সাথে এই মন্দিরের সাদৃশ্য রয়েছে বলে বলা হয়। এই মন্দিরের মতোই পুরন্দর, নারায়ণপুর ও লোণী ভাপকর এলাকায় এই স্থাপত্যশৈলীর মন্দির রয়েছে।
নিরওয়াঙ্গি গ্রাম থেকে কিছুটা দূরে এবং ঘন ঝোপঝাড়ের মধ্যে নন্দিকেশ্বর মন্দির অবস্থিত। প্রশস্ত প্রাঙ্গণের মাঝখানে অবস্থিত এই মন্দিরের গঠন হলো খোলা মণ্ডপ, নন্দীমণ্ডপ, সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ। মূল মন্দিরের সামনে সাম্প্রতিককালে ভক্তদের সুবিধার জন্য খোলা মণ্ডপ তৈরি করা হয়েছে। এই মণ্ডপ থেকে নন্দীমণ্ডপে প্রবেশ করা যায়। চারটি পাথরের স্তম্ভ, তার ওপর হস্ত ও ছাদযুক্ত এই নন্দীমণ্ডপের মাঝখানে বিশাল নন্দীর পাথরের মূর্তি রয়েছে। নন্দীমণ্ডপের সামনের দিকে সভামণ্ডপের প্রবেশদ্বার। এই প্রবেশদ্বারের ললাটবিম্বে গণেশ মূর্তি ও নিচের দিকে
অস্ত্রধারী দ্বারপাল রয়েছে। দ্বারশাখায় নকশা ও নিচের দিকে স্বাগতিকা, অন্যান্য নারী ও পুরুষের ভাস্কর্য (মিউরাল) রয়েছে।
এই প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের বদ্ধ সভামণ্ডপে (গূঢ়মণ্ডপ) প্রবেশ করা যায়। সভামণ্ডপে চারটি নকশাদার পাথরের স্তম্ভ রয়েছে। এই স্তম্ভগুলোর মাঝখানে কচ্ছপের ভাস্কর্য রয়েছে। সভামণ্ডপে বাতাস চলাচলের জন্য প্রবেশদ্বারের পাশের দেয়ালে বৈশিষ্ট্যপূর্ণ পাথরের জালি রয়েছে। এই জালির বর্গাকার অংশে পাথরের ফুল রয়েছে। সভামণ্ডপের দেয়ালের দেবকোষ্ঠে গণপতি ও মহাদেবের মূর্তি রয়েছে। সভামণ্ডপের প্রবেশদ্বারের মতোই এখানকার গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের গঠন। সেখানে থাকা ভাস্কর্যের মতোই এখানেও একই ধরনের ভাস্কর্য রয়েছে। গর্ভগৃহের মেঝেতে মাঝখানে স্বয়ংভূ শিবলিঙ্গ রয়েছে। এখানকার সভামণ্ডপের ওপর ছোট শিখর এবং গর্ভগৃহের ওপর প্রধান ও উঁচু শিখর রয়েছে। গর্ভগৃহের শিখরটি নতুন করে তৈরি করা হয়েছে।
মহাশিবরাত্রি ও শ্রাবণের প্রতি সোমবারে এখানে উৎসব পালিত হয়। মন্দিরের যাত্রোৎসব শ্রাবণের শেষ সোমবারে হয়। ইন্দাপুর তালুকায় বড় যাত্রার মধ্যে এই যাত্রাও অন্তর্ভুক্ত। এ সময় হাজার হাজার ভক্ত দেবতার দর্শন ও মানত পূরণের জন্য এখানে আসেন।
প্রয়োজনীয় তথ্য
- ইন্দাপুর থেকে ২৫ কিমি, আর পুণে থেকে ১৪০ কিমি দূরত্বে
- ইন্দাপুর ও নাতেপুতে থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকার ও খাওয়ার সুবিধা নেই
ਨੰਦਿਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ
ਨਿਰਵਾਂਗੀ, ਤਹਿਸੀਲ ਇੰਦਾਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪੁਣੇ

ਇੰਦਾਪੁਰ ਤਹਿਸੀਲ ਵਿੱਚ ਨੀਰਾ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਵਸੇ ਨਿਰਵਾਂਗੀ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਨੰਦਿਕੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੰਦਰ ਹੈ। ਸੰਘਣੀ ਵਨਸਪਤੀ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇੱਥੇ ਮੌਜੂਦ ਨੰਦੀ ਦੀ ਵਿਸ਼ਾਲ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸੇ ਨੰਦੀ ਦੇ ਨਾਮ ‘ਤੇ ਇਹ ਸਥਾਨ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਵਿੱਚ ਨੰਦਿਕੇਸ਼ਵਰ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਇਹ ਮੰਦਰ ਲਗਭਗ ਸੱਤ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਾਵਣ ਮਹੀਨੇ ਦੇ ਆਖਰੀ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਇੱਥੇ ਲੱਗਣ ਵਾਲੇ ਮੇਲੇ ਦੌਰਾਨ ਰਾਜ ਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਜ਼ਿਲ੍ਹਿਆਂ ਤੋਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਸਵਾਰੀ ਨੰਦੀ ਨੂੰ ਭਗਤੀ ਅਤੇ ਸ਼ਕਤੀ ਦਾ ਪ੍ਰਤੀਕ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਿਵ ਦਰਬਾਰ ਦਾ ਦਰਬਾਨ ਮੰਨਿਆ ਜਾਣ ਵਾਲਾ ਇਹ ਨੰਦੀ ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਖਾਸ ਗਣਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਹੈ। ਮਹਾਦੇਵ ਨੇ ਨੰਦੀ ਨੂੰ ਵਰ ਦਿੱਤਾ ਸੀ ਕਿ ਧਿਆਨਮਗਨ ਹੋਣ ਵੇਲੇ ਜੇਕਰ ਕੋਈ ਭਗਤ ਆਪਣੀ ਇੱਛਾ ਤੇਰੇ ਕੰਨ ਵਿੱਚ ਕਹੇਗਾ ਤਾਂ ਉਹ ਮੇਰੇ ਤੱਕ ਪਹੁੰਚ ਜਾਵੇਗੀ। ਇਸ ਅਨੁਸਾਰ, ਜਦੋਂ ਵੀ ਮਹਾਦੇਵ ਧਿਆਨਮਗਨ ਹੁੰਦੇ ਸਨ, ਪਾਰਵਤੀ ਨੰਦੀ ਦੇ ਕੰਨ ਵਿੱਚ ਸੁਨੇਹਾ ਦਿੰਦੀ ਸੀ। ਇਸ ਲਈ ਅੱਜ ਵੀ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਪਣੀਆਂ ਇੱਛਾਵਾਂ
ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਪਿੰਡੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਬੋਲਣ ਦੀ ਬਜਾਏ ਨੰਦੀ ਦੇ ਕੰਨ ਵਿੱਚ ਕਹਿੰਦੇ ਹਨ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਆਸਥਾ ਹੈ ਕਿ ਨੰਦੀ ਦੇ ਕੰਨ ਵਿੱਚ ਕਹੀ ਗਈ ਇੱਛਾ ਮਹਾਦੇਵ ਪੂਰੀ ਕਰਦੇ ਹਨ। ਇਸ ਲਈ ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਦੇ ਸਮੇਂ ਨੰਦੀ ਦੀ ਪੂਜਾ ਜ਼ਰੂਰ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਨੰਦਿਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਦੀ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਨਿਰਵਾਂਗੀ ਪਿੰਡ ਦੇ ਨੇੜੇ ਸ਼ੰਭੂ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਮੂਲ ਸਥਾਨ ਸੀ। ਇਸ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਹਰਿਆਲੀ ਅਤੇ ਖੇਤਾਂ ਕਾਰਨ ਸ਼ੰਭੂ ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਸਵਾਰੀ ਨੰਦੀ ਨੂੰ ਵੀ ਇਹ ਇਲਾਕਾ ਪਸੰਦ ਸੀ। ਕਈ ਵਾਰ ਇਹ ਨੰਦੀ ਇੱਥੋਂ ਦੇ ਖੇਤਾਂ ਵਿੱਚ ਚਰਨ ਲਈ ਵੜ ਜਾਂਦਾ ਸੀ। ਨੰਦੀ ਦੇ ਖੇਤ ਵਿੱਚ ਵੜਨ ਨਾਲ ਆਪਣੀਆਂ ਸਬਜ਼ੀਆਂ ਦੇ ਨੁਕਸਾਨ ਹੋਣ ਦੇ ਡਰੋਂ ਕਈ ਲੋਕ ਉਸਨੂੰ ਭਜਾ ਦਿੰਦੇ ਸਨ। ਨੰਦੀ ਦਾ ਲਗਾਤਾਰ ਅਪਮਾਨ ਸਹਿਣ ਨਾ ਕਰਦਿਆਂ ਮਹਾਦੇਵ ਨੰਦੀ ਨੂੰ ਲੈ ਕੇ ਸ਼ਿਖਰ ਸ਼ਿੰਗਣਾਪੁਰ ਚਲੇ ਗਏ। ਪਰ ਨਿਰਵਾਂਗੀ ਦਾ ਇਲਾਕਾ ਪਸੰਦ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇਹ ਨੰਦੀ ਉੱਥੋਂ ਵਾਰ-ਵਾਰ ਇਸੇ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਆਉਂਦਾ ਸੀ। ਨੰਦੀ ਦਾ ਇਸ ਇਲਾਕੇ ਪ੍ਰਤੀ ਪਿਆਰ ਦੇਖ ਕੇ ਮਹਾਦੇਵ ਨੇ ਨਿਰਵਾਂਗੀ ਵਿੱਚ ਹੀ ਇਸ ਨੰਦੀ ਲਈ ਰਹਿਣ ਦਾ ਪ੍ਰਬੰਧ ਕੀਤਾ। ਇਹ ਸਥਾਨ ਹੀ ਇੱਥੋਂ ਦਾ ਨੰਦਿਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਹੈ।
ਦੂਜੀ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ, ਇਸ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਹਮਲਾਵਰਾਂ ਦੁਆਰਾ ਤਬਾਹੀ ਮਚਾਈ ਜਾ ਰਹੀ ਸੀ। ਇੱਕ ਵਾਰ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਨਜ਼ਰ ਨੰਦਿਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ‘ਤੇ ਪਈ। ਇਨ੍ਹਾਂ ਹਮਲਾਵਰਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਨੇ ਆਪਣੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਫੜੇ ਹਥਿਆਰ ਦਾ ਪਹਿਲਾ ਵਾਰ ਇਸ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ‘ਤੇ ਕੀਤਾ। ਇਸ ਵਾਰ ਨਾਲ ਨੰਦੀ ਦੀ ਪਿੱਠ ‘ਤੇ ਜ਼ਖ਼ਮ ਵਰਗਾ ਟੋਆ ਪੈ ਗਿਆ ਅਤੇ ਉਸ ਵਿੱਚੋਂ ਖੂਨ ਵਗਣ ਲੱਗਾ। ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਵਿੱਚੋਂ ਨਿਕਲਦਾ ਉਹ ਖੂਨ ਦੇਖ ਕੇ ਹਮਲਾਵਰ ਡਰ ਗਏ ਅਤੇ ਉੱਥੋਂ ਭੱਜ ਗਏ। ਇਸ ਕਥਾ ਦੇ ਆਧਾਰ ਵਜੋਂ ਨੰਦੀ ਦੀ ਪਿੱਠ ‘ਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਡੂੰਘਾ ਟੋਆ ਦਿਖਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਿਖਰ ਸ਼ਿੰਗਣਾਪੁਰ ਵਿਖੇ ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਜਾਣ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਇੱਥੋਂ ਦੇ ਨੰਦੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਕੇ ਹੀ ਅੱਗੇ ਜਾਣ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਹੈ।
ਭਾਵੇਂ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਲਿਖਤੀ ਇਤਿਹਾਸ ਉਪਲਬਧ ਨਹੀਂ ਹੈ, ਪਰ ਇੱਥੋਂ ਦੇ ਅਸਪਸ਼ਟ
ਸ਼ਿਲਾਲੇਖ ਅਤੇ ਮੰਦਰ ਦੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਤੋਂ ਮਾਹਿਰਾਂ ਦਾ ਦਾਅਵਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਲਗਭਗ ਅੱਠ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਹੈ। ਭੀਮਾ, ਕਰਹਾ ਅਤੇ ਨੀਰਾ ਨਦੀ ਦੀਆਂ ਘਾਟੀਆਂ ਵਿੱਚ ਚਾਲੂਕਿਆ ਕਾਲ ਤੋਂ ਹੀ ਅਜਿਹੇ ਮੰਦਰਾਂ ਦੇ ਨਿਰਮਾਣ ਦੇ ਸਬੂਤ ਮੌਜੂਦ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਪਲਸਦੇਵ ਦੇ ਪਲਸਨਾਥ ਮੰਦਰ ਨਾਲ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਸਮਾਨਤਾ ਦੱਸੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਵਾਂਗ ਹੀ ਪੁਰੰਦਰ, ਨਾਰਾਇਣਪੁਰ ਅਤੇ ਲੋਨੀ ਭਾਪਕਰ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਅਜਿਹੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਵਾਲੇ ਮੰਦਰ ਹਨ।
ਨਿਰਵਾਂਗੀ ਪਿੰਡ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰ ਅਤੇ ਸੰਘਣੀ ਝਾੜੀਆਂ ਵਿੱਚ ਨੰਦਿਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਵਿਸ਼ਾਲ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਖੁੱਲ੍ਹਾ ਮੰਡਪ, ਨੰਦੀ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਾਲੀ ਹੈ। ਮੂਲ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਹਾਲ ਹੀ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸਹੂਲਤ ਲਈ ਖੁੱਲ੍ਹੇ ਰੂਪ ਦਾ ਮੰਡਪ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਮੰਡਪ ਵਿੱਚੋਂ ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਚਾਰ ਪੱਥਰੀਲੇ ਥੰਮ੍ਹਾਂ, ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਹੱਥ ਅਤੇ ਛੱਤ ਵਾਲੇ ਇਸ ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਨੰਦੀ ਦੀ ਵਿਸ਼ਾਲ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ
ਸ਼ਸਤਰਧਾਰੀ ਦਰਬਾਨ ਹਨ। ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਚੌਖਟਿਆਂ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਅਤੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਸਵਾਗਤ ਕਰਨ ਵਾਲੀਆਂ, ਹੋਰ ਔਰਤਾਂ ਅਤੇ ਮਰਦਾਂ ਦੇ ਉਭਰੇ ਹੋਏ ਚਿੱਤਰ (ਮਿਊਰਲਜ਼) ਹਨ।
ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੰਦਰ ਦੇ ਬੰਦ ਸਭਾ ਮੰਡਪ (ਗੂੜ੍ਹ ਮੰਡਪ) ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਚਾਰ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਪੱਥਰੀਲੇ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਕੱਛੂਕੁੰਮੇ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਹਵਾ ਦੇ ਆਉਣ-ਜਾਣ ਲਈ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨਾਲ ਵਾਲੀਆਂ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਪੱਥਰੀਲੀ ਜਾਲੀ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਇਸ ਜਾਲੀ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਚੌਰਸ ਖਾਨਿਆਂ ਵਿੱਚ ਪੱਥਰੀਲੇ ਫੁੱਲ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਬਣੇ ਖਾਨਿਆਂ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਅਤੇ ਮਹਾਦੇਵ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਵਾਂਗ ਹੀ ਇੱਥੋਂ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਉੱਥੇ ਮੌਜੂਦ ਮੂਰਤੀਆਂ ਵਾਂਗ ਹੀ ਇੱਥੇ ਵੀ ਉਹੀ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਵਿਚਕਾਰ ਸਵੈਯੰਭੂ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਉੱਤੇ ਛੋਟਾ ਸ਼ਿਖਰ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਉੱਤੇ ਮੁੱਖ ਅਤੇ ਉੱਚਾ ਸ਼ਿਖਰ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਉੱਤੇ ਬਣਿਆ ਸ਼ਿਖਰ ਨਵਾਂ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ।
ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਅਤੇ ਸਾਵਣ ਦੇ ਹਰ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਇੱਥੇ ਉਤਸਵ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮੰਦਰ ਦਾ ਮੇਲਾ ਸਾਵਣ ਦੇ ਆਖਰੀ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇੰਦਾਪੁਰ ਤਹਿਸੀਲ ਦੇ ਵੱਡੇ ਮੇਲਿਆਂ ਵਿੱਚ ਇਸ ਮੇਲੇ ਨੂੰ ਸ਼ਾਮਲ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਭਗਵਾਨ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਅਤੇ ਆਪਣੀਆਂ ਮਾਨਤਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਲਈ ਇੱਥੇ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਇੰਦਾਪੁਰ ਤੋਂ ੨੫ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਪੁਣੇ ਤੋਂ ੧੪੦ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਇੰਦਾਪੁਰ ਅਤੇ ਨਾਤੇਪੁਤੇ ਤੋਂ ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
-
जर्सेश्वर महादेव मंदिर सांगरूण, ता. हवेली, जि. पुणे
अधिक माहितीJarsheshwar Mahadev Temple Sangrun, Taluka Haveli, District Pune
View Detailsजर्शेश्वर महादेव मंदिर संगरून, तालुका हवेली, जिला पुणे
विवरण देखें -
शिरकाई देवी मंदिर शिरकोली, ता. वेल्हे (राजगड), जि. पुणे
अधिक माहितीShirkai Devi Temple Shirkoli, Velhe (Rajgad), Distt. Pune
View Detailsशिरकाई देवी मंदिर शिरकोली, वेल्हे (राजगढ़), जिला। पुणे
विवरण देखें -
धारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगड रस्ता, पुणे
अधिक माहितीDhareshwar Mahadev Temple Dhayari, Sinhagad Road, Pune
View Detailsधारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगढ़ रोड, पुणे
विवरण देखें
