रेवणसिध्द मंदिर

रेणावी, ता. खानापूर, जि. सांगली

भारतीय समाजरचनेत स्वतंत्र विचारांची क्रांती निर्माण करणाऱ्या नाथसंप्रदायाचा एकेकाळी मोठा दबदबा होता. नवनाथांच्या गुरुशिष्य परंपरेतील सातवे गुरू नव नारायणातील एक नारायण रेवणसिद्धनाथ यांची अनेक मंदिरे पश्चिम महाराष्ट्रात आहेत. याच रेवणसिद्धांचे एक मंदिर खानापूर तालुक्यातील रेणावी गावाजवळ आहे. गावात रेवणनाथांचे मंदिर असल्यामुळे अठरापगड जातींच्या धार्मिक विविधता असलेल्या या संपूर्ण गावाने मांसाहार वर्ज्य करून गेली कित्येक वर्षे शुद्ध शाकाहाराचा अवलंब केलेला आहे. रेवणनाथास भक्तिभावाने केलेला नवस पूर्ण होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

वामाचारी तंत्रसाधनांविरुद्ध आंदोलन उभे करून भारतीय साधनेचे शुद्धीकरण करणाऱ्या गोरक्षनाथांचाकिमयागारहा ग्रंथ आहे. या ग्रंथावरून धुंडीसूत मालू या कवीने रचलेल्यानवनाथ भक्तिसारग्रंथानुसार नवनाथ हे नवनारायणांचे अवतार आहेत. यातील आठवे नाथ म्हणजे रेवणसिद्धनाथ. ते चमसनारायणाचे अवतार असल्याचे या ग्रंथात म्हटले आहे. लिंगायत शैवांच्या काडसिद्धेश्वर परंपरेनुसार, रेवणसिद्धनाथ हे काडसिद्धेश्वर परंपरेचे संस्थापक आणि पहिले काडसिद्धेश्वर मानले जातात. कोल्हापूरमधील कणेरी येथील मठाची स्थापना त्यांनीच केल्याचे सांगितले जाते. गोरक्षनाथांचा काळ . . १०५० ते ११५० हा आहे. रेवणसिद्धनाथ हे गोरक्षनाथांचे समकालिन असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. ते सहनसारूक नावाच्या शेतकऱ्यास रेवानदीच्या तीरावर सापडले म्हणून त्यांचे नाव रेवण असे ठेवले, असेनवनाथ भक्तिसारा म्हटलेले आहे.

हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर तेराव्या शतकात बांधले असल्याचे सांगण्यात येत असले तरी मूळ मंदिर त्यापूर्वीचे असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. मंदिरातील विविध वास्तू तटबंदी वेगवेगळ्या काळात बांधल्या गेल्या असाव्यात, असे तज्ञांचे मत आहे. रेणावे गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. वाहनतळाच्या बाजुला पूजा साहित्याची अनेक दुकाने आहेत. प्रवेशद्वारासमोर तीन चौथरे त्यावर तीन गोलाकार दीपमाळा आहेत. पुढे भाकणुकीचा मंच आहे. यात्रेच्या वेळी येथे वर्षभराच्या हवामानाचा पिकपाण्यासंदर्भात भविष्य वर्तवतात, त्यास भाकणूक म्हणतात

प्रवेशद्वारासमोर कोरीव दगडात बांधलेल्या चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती बाजूला तुलसी वृंदावन आहे. बाजूला काही प्राचीन समाध्या आहेत. मंदिराला सुमारे २५ फूट उंच दगडी तटबंदी आहे. या तटबंदीत तीन दिशेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दिशेला असलेले मुख्य प्रवेशद्वार उंचावर आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी दोन स्तंभ असलेल्या वज्रपिठावर दंडधारी द्विभुज द्वारपाल आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस व्याघ्र, गजराज कमल फुलांची उठाव शैलीतील नक्षी आहे. भिंतीत दोन्ही बाजूस व्याल शिल्पे आहेत. मंडारकास मध्यभागी चंद्रशिला दोन्ही बाजूला कीर्तीमुखे आहेत. मंडारकावर स्त्री प्रतिमा कोरलेली आहे

प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूस पहारेकरी कक्ष आहेत. त्यातील एका कक्षात विष्णू लक्ष्मी आणि दुसऱ्या कक्षात सरस्वती यांची चित्रे रंगवलेली आहेत. पहारेकरी कक्षात भिंतीत दीपकोष्टके आहेत. पहारेकरी कक्षातून वरील मजल्यावरील नगारखान्यात जाण्यासाठी दगडी पायऱ्या असलेला जीना आहे. नगारखान्यातून सभोवतालच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते. मंदिराच्या तटबंदीतही वर जाण्यासाठी जीना आहे.

प्रवेशद्वारातून आत काही पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणातील एका चौथऱ्यावर पाच लिंग चार योनी अशी अनोखी रचना असलेली शिवपिंडी आहे. या पिंडीच्या बाजूला खाली आणखी एक शिवपिंडी आहे. चौथऱ्याच्या भिंतीवर यमाई महालक्ष्मी देवीच्या काळ्या पाषाणातील प्राचीन मूर्ती आहेत. या चौथऱ्याच्या बाजूला सुमारे तीस फूट उंच गोलाकार दीपमाळ आहे. दीपमाळेच्या चौकोनी पायावर मारुती, वृषभ, गजराज आदी उठाव शैलीतील शिल्पे आहेत. पुढे चार स्तंभ वर छत असलेल्या मुखमंडपात वज्रपिठावर एकापुढे एक अशा दोन नंदीमूर्ती आहेत. नंदीच्या पुढे असलेले गोलाकार पाषाण उचलून कौल लावण्याची पद्धत आहे. मुखमंडपाच्या छतावर चारही कोनांवर मेघडंबरी त्यावर कळस आहेत. मध्यभागी घुमटाकार शिखर आहे. घुमटावर कमलदल नक्षी शीर्षभागी कळस आहे. पुढे मंदिराचा सभामंडप आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारास चार स्तंभांवर तीन कमानी आहेत. तिन्ही कमानींवर कीर्तीमुख शिल्पे आहेत. दर्शनी भिंतीवर शीर्षभागी दोन्ही बाजूस व्याल शिल्पे आहेत

सभामंडपात प्रत्येकी पाच चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. या सभामंडपात उत्सव काळात वापरली जाणारी पालखी छताला टांगलेली आहे. खाली कासव शिल्प यज्ञकुंड आहे. सभामंडपाच्या उजव्या भिंतीवर गणेश शिल्प डाव्या बाजूला जमिनीवर ठेवलेल्या पाटावर चांदीच्या पादुका आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी, ललाटबिंबावर गणपती शिल्प मंडारकावर कीर्तीमुख आहे. प्रवेशद्वारास रजत अच्छादान आहे. गर्भगृहात सहा नक्षीदार स्तंभ आहेत. गर्भगृहात रेवणसिद्धांची स्वयंभू पाषाण मूर्ती आहे. शयनावस्थेतील हा पाषाण बारा ते पंधरा फूट लांब तीन ते चार फूट ऊंच आहे. मूर्तीस चांदीचे डोळे लावलेले आहेत. मूर्तीजवळ रेवणसिद्धांचे शिष्य बसवसिद्ध मारळसिद्ध यांचे पितळी मुखवटे आहेत. मूर्तीजवळ दोन शिवपिंडी चांदीचा त्रिशूल आहे. रेवणसिध्द पाषाणातून सतत पाणी पाझरत असते

प्रत्येक सोमवार, गुरुवार, शनिवार, पौर्णिमा, अमावस्या, एकादशी सर्व सणांच्या दिवशी देवाची पोशाखातील उत्सव मूर्तीची पूजा बांधली जाते. इतर दिवशी पाषाण मूर्तीची पूजा केली जाते. गर्भगृहाच्या छतावर शंकू आकारातील शिखर त्यावर कळस आहे. मंदिराच्या मागील बाजूस एक लहान मंदिर आहे. या मंदिरात मुख्य मंदिरातील गर्भगृहातील पाषाण मूर्तीचा काही भाग नागशिळा आहेत. या मंदिरावरील सात थरांच्या चौकोनी शिखरात चारही बाजूंनी उभा नक्षीपट आहे. त्यावर महादेव, नाग उठाव शैलीतील व्याघ्रशिल्पे आहेत. शीर्षभागी अमलक, त्यावर कळस ध्वजपताका आहे. बाजूला असलेल्या दुसऱ्या मंदिरातील गोमुखातून अखंड पाण्याचा प्रवाह सुरू असतो. गोमुखाच्या बाजूला यक्षमूर्ती समोर नंदी आहे

प्रांगणात तटबंदीलगत नक्षीदार स्तंभांवर कमानी छत असलेल्या ओवऱ्या आहेत. धर्मशाळा म्हणून या वास्तूचा वापर केला जातो. यापैकी एका कक्षात देवस्थान ट्रस्टचे कार्यालय आहे. काही ओवऱ्यांत मंदिराच्या पुजाऱ्यांचे निवासस्थान आहे. एका कक्षात राम, लक्ष्मण, जानकी, हनुमान, विठ्ठल, रखुमाई गरूड मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रांगणात गजपृष्ठ आकारातील छत असलेले खुले सभागृह आहे. याचा वापर सांस्कृतिक कार्यक्रम मंगल कार्यालय म्हणून केला जातो. प्रांगणात रेवणसिद्धांचे शिष्य मरळसिद्ध देवाचे लहान मंदिर आहे. मंदिरात मरळसिद्ध देवाची स्वयंभू पाषाण मूर्ती आहे. या मंदिराच्या बाजूला अष्टकोनी अष्टविनायक मंदिर आहे. या मंदिरात आठ दिशांना गणेशाच्या मूर्ती आहेत. याशिवाय येथे एक लहानसे दत्त मंदिर आहे. या मंदिरातील वज्रपिठावर श्रीदत्तात्रेयांची संगमरवरी मूर्ती आहे. त्यापुढे भिंतीसहीत स्तंभ छत असलेले नवग्रह मंदिर आहे. या मंदिरात मध्यभागी असलेल्या वज्रपिठावर मध्ये सात घोड्यांच्या रथात सूर्य चारही बाजूंना इतर ग्रहांच्या मूर्ती आहेत. वज्रपिठाच्या बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. येथून पुढे प्रांगणात जमिनीखाली असलेले बसवसिद्ध मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या उतरून जावे लागते. गर्भगृहात बसवसिद्धांचा स्वयंभू पाषाण आहे

प्रांगणात पूर्व पश्चिम प्रवेशद्वारांसमोरील नंदीमंडपात नंदी समोर पाषाण पादुका आहेत. पश्चिम प्रवेशद्वारासमोरील दुसऱ्या मंडपात मोडी लिपीतील शिलालेख आहे. बाजूला रेवणसिद्धांचे भक्त साखरे महाराज यांची संजीवन समाधी आहे. प्रांगणाबाहेर मंदिराजवळ भक्त निवासाची नवी आधुनिक सोयींनी युक्त इमारत आहे

महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी देवाचा पालखी सोहळा संपन्न होतो. लघुरुद्र आणि महाअभिषेकाने दिवसाची सुरूवात होऊन दिवसभरात भजन, किर्तन, प्रवचन, जागरण, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परिसरातील गावांतून मिरवणुकीने मंदिराकडे सासनकाठ्या येतात. हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी येतात. श्रावणातील चारही सोमवारी मंदिरात भाविकांची गर्दी असते. यात्रेच्या दिवशी श्रावणातील पहिल्या सोमवारी भाकणुकीचा कार्यक्रम होतो

परिसरातील देवनगर, वासुंबे, साळशिंगे, विटा मूळस्थान आदी ठिकाणी रेवणनाथाचे वास्तव्य होते शेवटी रेणावी येथील या स्थानी त्यांनी समाधी घेतली, असे सांगितले जाते. दररोज पहाटे ते या वेळेत येथे महापुजा होते. पहाटे वाजल्यापासून भाविकांना या मंदिरातील रेवणसिद्धांचे दर्शन घेता येते. सकाळी .३०, सायंकाळी .३० रात्री .३० या वेळेत आरती होते. रात्री १० वाजता भाविकांसाठी मंदिराची दारे बंद होतात.

उपयुक्त माहिती

  • खानापूरपासून १४ किमी, तर सांगलीपासून ६२ किमी अंतरावर
  • खानापूर सांगली येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा
Back To Home